Tuesday, August 27, 2019

ज्योतिष शास्त्रामधील गण

ज्योतिष शास्त्रामधील गण.

ज्योतिष शास्त्रानुसार मनुष्य योनीची तीन गणांमध्ये विभागणी केली गेली आहे. 
 मनुष्य गण, देव गण आणि राक्षस गण. गणांचा संबंध स्वभावाशी जोडला गेला आहे. वधू-वरांचे गण कोणते आहेत त्यानुसार त्यांना गुणमिलन करताना गुण दिले जातात. या गणांबाबत थोडक्यात जाणून घेउया.

देव गण : 

सुंदरों दान शीलश्च मतिमान् सरल: सदा। अल्पभोगी महाप्राज्ञो तरो देवगणे भवेत्।। 
अर्थात : दानी, बुद्धिमान, सरळ हृदयी, अल्पाहारी व विचाराने श्रेष्ठ अश्या व्यक्तीचा देवगण असतो.

मनुष्य गण : 

मानी धनी विशालाक्षो लक्ष्यवेधी धनुर्धर:। गौर: पोरजन ग्राही जायते मानवे गणे।
अर्थात : मनुष्य गणामध्ये उत्पन्न  व्यक्ती मानी, धनवान, विशाल नेत्र असलेली, धनुर्विद्या जाणणारी, उत्तम नेम असलेली, गौर वर्ण, नगरवासियाना वश करणारी असते.

राक्षस गण : 

उन्मादी भीषणाकार: सर्वदा कलहप्रिय:। पुरुषो दुस्सहं बूते प्रमे ही राक्षसे गण।
अर्थात : राक्षस गण मध्ये उत्पन्न झालेले बालक उन्मादयुक्त, भयंकर स्वरूप, भांडखोर, प्रमेह रोगाने पीड़ि‍त कटु वचन बोलणारा असे म्हटले जाते.

ज्योतिष शास्त्रानुसार देव गण आणि मनुष्य गणातील लोक सामान्य असतात. तर राक्षस गणाच्या व्यक्तींमध्ये काही विशिष्ट नैसर्गिक गुण असतात. त्यामुळे राक्षस गणाच्या व्यक्तींना वातावरणातील नकारात्मक शक्तींची ताबडतोब आणि प्रखर जाणीव होते. या शक्तींचा वातावरणातील प्रभाव राक्षस गणाच्या व्यक्तींवर जास्त पडत असल्यामुळेच त्यांना भूत किंवा आत्म्यांचं दर्शन घडतं. मात्र या वातावरणामुळेच राक्षस गणाच्या व्यक्तींमध्ये काही क्षमता विकसित होतात, ज्यामुळे या व्यक्तींना अमानवी गोष्टींची भीती वाटत नाही. राक्षस गणाचे लोक साहसीदेखील असतात. कुठल्याही विपरीत परिस्थितीत ते घाबरून जात नाहीत. या व्यक्तींना त्यामुळेच भूत किंवा आत्म्यांकडून त्रास होत नाही. केवळ अनुभव येतो.

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"