## काहि .. घरगुति..उपाय..
मूळव्याध🌼. अर्धा लिंबू घेऊन त्यावर सैंधव मीठ भूरभुरावे व ते चोखून घ्यावे. सलग १० ते १५ दिवस
दिवसातून ४-५ वेळा हा प्रयोग केल्यास मूळव्याध नाहिशि होते.
मूत्रखडा🌼 . दगडि पाला( कंबरमोडिचा) मिठाच्या पाण्याने धुवून त्याचा रस काढावा. सलग १५ दिवस सूर्यास्तानंतर व सूर्यास्तापूर्वि अश्या २ वेळी प्रत्येकि २ चमचे हारस प्यावा. वर्षातून एकदा सलग १५ दिवस हा प्रयोग करावा. मूतखड्याचा त्रास कायमचा दूर होतो.
रोज एक ग्लास ताक नेमाने घेतल्यास मूतखड्याचा त्रास होत नाही.
कोठा साफ होण्यासाठि🌼.. सिताफळाचि ४ पाने किंवा आंब्याचे एक पान मिठाच्या पाण्याने धुवून खावे. त्याने पोट साफ होते.
दातांच्या बळकटिसाठि🌼.. पेरूचि १०.१२. पाने तांब्याभर पाण्यात घालून त्यात १ चमचा मीठ, व ४,५ लवंगा घालून उकळावे. ते पाणि कोमट झाल्यावर गाळून घेउन त्यामध्ये दोन वेळा तुरटि फिरवावि. व त्या पाण्याने खळखळुन चूळ भरावि. यामुळे हिरड्यातून रक्त येणे किंवा दात दुखणे व सेंन्सेटिविटि थांबते.
हिरड्या फुगल्यास🌼.. मोरावळा घेउन त्याचे तुकडे करावेत व ते तांब्याभर पाण्यात उकळावे. ते पाणि गाळून घेउन थोडे गरम असतानाच त्याने खळखळून चूळ भरावि. नंतर लगेच साध्या पाण्याने चूळ भरावि.
गालगुंड🌼.. उंबराच्या झाडाचा चीक काढून त्याचा लेप गालावर लावून ठेवावा. गालगुंड बरे होताच तो लेप
आपोआप निघून जातो. त्याआधि काढण्याचा प्रयत्न करूनहि तो निघत नाही.
टकलावर केस येण्यासाठि🌼.. सकाळि आंघोळ झाल्यावर लसणाचि पाकळि चूरडून त्याचा रस टकलावर लावून सावलित सुकू द्यावा. हा प्रयोग 2 महिने करावा.
केस येण्यास सुरवात होते.
.......... (2).. कांद्याचा रस रात्रि केसांना लावून डोक्याला टोपि लावून झोपावे. या प्रयोगाने केस गळती थांबते.
स्पाँडिलिटिस व मणक्यांचे विकार🌼.. काळ्या खारकांचि २ चमचे पावडर दूधात शिजवून. कोमट झाल्यानंतर. त्यात एक चमचा तूप घालून रोज सकाळचि न्याहरि म्हणून हे मिश्रणच घ्यावे. इतर काहिहि खाउ नये.
यामूळे १५ दिवसात मणक्यातिल गँप भरून निघते.
त्वचेला खाज येते🌼.. दर तीन महिन्यातून एकदा सलग १० दिवस तुरटिच्या पाण्याने आंघोळ करावी।
कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ करावि
.. कडुलिंबाचा रस घ्यावा, कोरफड व तुळशिचा रस घ्यावा.
..🌼🌼🌼....
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"