" भक्ती "
भक्ती म्हणजे काय...?
किती साधी सोपी सरळ
व्याख्या आहे पहा....💐
भक्ती जेंव्हा " अन्नात " शिरते ..
तेंव्हा तीला " प्रसाद " म्हणतात..
आणि भक्ती जेंव्हा " भुकेत " शिरते तेंव्हा तीला " उपवास " असे म्हणतात.
भक्ती जेंव्हा पाण्यात शिरते तेंव्हा तीला " तीर्थ " संबोधतात आणि
भक्ती जेंव्हा " प्रवासाला " निघते
तेंव्हा तीला " यात्रा " असे म्हणतात.
भक्ती जर का " संगीतात " शिरली तर आपण तिला " भजन / कीर्तन " असे म्हणतो...
आणि हीच भक्ती जर का " लोकसंगीतात " शिरली तर त्याला "भारूड " म्हणतात..
भक्ती जेंव्हा " माणसात " प्रकटते तेंव्हा " माणूसकी " निर्माण होते
आणि हीच भक्ती जर " घरात " शिरली तर त्या घराच " मंदिर " होत.
भक्ती जर का शांतपणे " मनाच्या गाभाऱ्यात " शिरली तर त्याला " ध्यान " असे म्हणतात आणि भक्ती जर का " कृतीत " उतरली तर तिला " सेवा " असे म्हणतात...
🙏🏻💐🙏🏻
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"