Wednesday, July 10, 2019

केव्हा साधना करू नये आणि नामस्मरण करु नये

.... चालत्या वाहनात साधना करू नये , नामस्मरण करावे . रु प्रवासात अभंग म्हणावेत ; आरती , स्तोत्र इत्यादी म्हणू नयेत. साधनेत नाम घेतले तर चालते पण मानसपूजा करू नये . short cut मारू नयेत . स्नान करताना आरती म्हणू नये . पुस्तकांचा अभ्यास विषय नीट समजून घेऊन करावा . जमेल तसा महामंत्राचा मानसिक जप अखंड करावा . काहीही विचारायचे असल्यास आपल्या सद्गुरूंशिवाय दुसरीकडे जाऊ नये . हा उचित अभिमान आहे . कोणाकडेही भीक मागू नये . आपले बाप ( सद्गुरू ) सर्वसमर्थ आहेत . काही न मागता स्तोत्र म्हटले तर देवतांना आनंद होतो . नाही तर त्या देवताही सावकाराप्रमाणे लेन - देन करून मोकळ्या होतात . आपल्या बापाला ( सद्गुरुंना ) सर्व कळते . ते सर्वप्रकारे आपल्याला सांभाळतात . भगवंतांचे अखंड स्मरण ठेवावे . आपण जे करतो आहेत ते आपल्या सद्गुरुंना आवडेल काय ? याचा विचार करून वागावे. आपली प्रत्येक वृत्ती भगवंतांकडे जाण्यायोग्य असली पाहिजे . जे झाले ते आपल्याच कर्मामुळे झाले अशा विचाराने राहावे . पायांना लागलेली वाळू काढण्यासाठी किती वेळा समुद्रात जाणार ? ती पुसून टाकावी . प्रपंचाचा विचार किती करणार ? तो झटकून टाकवा . अखंड आनंद हा केवळ सद्गुरुंपाशीच असतो. 
- श्रीवामनराज ( कृपायोग व गुरुभक्तिविषयक मराठी त्रैमासिक )

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"