देव अनुभवा लागतो
काही गोष्टीच अशा असतात की जाऊ म्हणतासुध्दा मनातून जाता जात नाहीत. ही पण अशीच गोष्ट.
हे घडलंय एक प्रसिध्द शल्य विशारद डाॅ शैलेश मेहता यांच्या बाबतीत. * *वर्ल्ड फेमस काॅर्डिऑलाॅजिस्ट.* अहमदाबाद, राजकोट,बडोदा इथे सुसज्ज होस्पिटल्स हाताखाली अनेक डॉक्टर्स,स्टाफ. केवळ
अपाॅईंटमेंट साठी दीड दोन महिने आधी फोन करावा लागतो, असतात बडोद्याला.
*डाॅक्टर सांगताहेत आपल्या मित्राला - -*
मित्रा! २१ डिसेंबर रोजी एक कपल बडोद्याला माझ्या रूग्णालयात आले, बरोबर ६ वर्षाची एक छोटी मुलगी. केस पेपर तयार होताच माझ्या डाॅक्टरनी छोट्या मुलीला तपासलं. सर्व तपासण्या,चाचण्यांचे रिपोर्ट मी पाहताच मुलीच्या आई वडिलांना बोलावून त्यांना माझं मत सांगितले. *मुलीच्या हार्ट मध्ये*
*प्रॉब्लेम आहे*. ऑलरेडी आजार फार पुढच्या स्टेजला असल्याने तातडीने ऑपरेट करावं, अन्यथा जास्तीत जास्त ३ महिने. पण असल्या *ऑपरेशनमध्येही survival rate is only 30 %*. आई आणि बाबा दोघांचेही डोळे पाणावले.
देवाला हात जोडून ती मला म्हणाली, डाॅक्टर आपण ऑपरेशन करा. मी मुलीला अॅडमिट करायला सांगून procedures पूर्ण करण्यास
सांगितले.
दुसरेच दिवशी काही अत्यावश्यक चाचण्या,
आणि नंतर ६ दिवसांनी ऑपरेशन.
६ वर्षाची ती निरागस मुलगी म्हणाली
"डाॅ आजोबा! मला एक प्रश्न विचारायचाय. सर्वजण म्हणतात माझी open heart surgery आहे". डाॅक्टर लगेचच उत्तरले "बेबी काळजी करू नको. तुला काहीच दुखणार नाही, मी छान औषधे देईन".
*पण आजोबा मला म्हणायचेय तुम्ही माझं हृदय ओपन करणार? मग ऑपरेशन नंतर मला सांगाल का माझ्या हृदयातला देवबाप्पा कसा दिसत होता? मला रोज मम्मी अंगारा लावून सांगते की ईथे बाप्पा आहे. त्याच्यावर विश्वास ठेव. ईवलंस बोट छातीवर डावीकडं टेकवत ती मला म्हणाली*.
मित्रा तुला माहित आहे, *मी जराही भावना प्रधान नाही रोज किमान ८/९ हृदयांचे मीच ऑपरेशन करतो. रोज माझे हे हात शब्दशः रक्तानं भरलेले असतात*. पण मी गडबडलो. कसेबसे म्हणालो ok sure. मनांत आलं -हे सुंदर शिल्प १५ /२० मिनिटानी असेल नं ?
ऑपरेशन सुरू झालं. हार्ट लंग मशीन ऑन झाले. त्याच्यावरचा ग्राफ खाली वर होऊ लागला. पण १५ मिनिटाच सर्व संपलं. बी.पी. low होउ लागलं.पल्स कमी व्हयला लागल्या. हृदयात रक्तच येत नव्हते. सगळं संपलं.
मला त्या बेबीचे शब्द आठवले. "डाॅ आजोबा! माझी मम्मी म्हणते, माझ्या हृदयात बाप्पा रहातो. तुम्ही सांगाल, तो कसा दिसतो ते?" माझे डोळे भरून आले, समोरचं काहीही दिसेना. मी भावविवश झालो, *देवा !बेबी आणि तीची आई ह्यांच्या* *विश्वासाप्रमाणं खरच तू हृदयांत असशील तर,आता तूच कांही करू शकतोस* .
माझं स्किल, प्रयत्न सर्व संपून गेलेत. निग्रहाने मी ऑर्डर्स दिल्या .make machine off. Remove my spects, gloves. सिस्टरनी माझा चष्मा काढला. भरलेले डोळे पुसले. पण बेबीचे प्रश्न उभेच होते समोर.
मनांत विचार आला -देवा खरच तू हिच्या हृदयात...
डाॅक्टरss ! असिस्टंट डॉक्टर जवळपास किंचळला. *blood is comming*
*doctor blood is coming* .हार्ट मशीन सुरू
करा. सिस्टर, माझे ग्लोव्हज् स्पेक्ट. संपूर्ण ऑ. थिएटर electrify झाले. पुढील ४.३० तास
operation सुरू होतं. आणि *ऑपरेशन successful* .चेहरे आनंदले. मी खूष. पण मित्रा! आता मी वेगळ्या चिंतेत आहे. त्या
बेबीनं उद्या मला विचारलं, *डाॅ आजोबा! माझ्या हृदयातल्या बाप्पाला पाहिलत?*
मी अश्रद्ध मी काय सांगू?
मित्र म्हणाला
डाॅक्टर तुम्ही तीला सांगा, *बेबी, देव अग बघायचा नसतो*, *तो अनुभवायचा असतो*.
डाॅ. मेहतांच्या चेहर्यावर समाधान पसरल्याचं मला जाणवलं. पण त्यानंतर एक बदल झाल्याचं मला जाणवलं. डॉक्टर मेहतांच्या ऑ.
थिएटरमध्ये एक फोटो लावला गेलाय. असू दे कोणतेही ऑपरेशन, डाॅक्टर फोटोसमोर मिनिटभर उभे रहातात, हात जोडून म्हणतात - परमेश्वरा मी लहान माणूस, माझं कौशल्य मी पणाला लावीनच पण तुझं लक्ष असू दे !
डाॅक्टर शैलेश मेहता म्हणतात *"बेबी मुळे मी सुसंस्कृत झालो*
*आपण काहीच करत नाही आपण फक्त निमित्त असतो सर्वच विश्व तोच चालवतो तो म्हणजेच ईश्वर*
🙏धन्यवाद 🙏
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"