यक्षने धर्मराजाला विचारलेले प्रश्न.
1 ).देवपूजेपेक्षा श्रेष्ठ सेवा कोणती. ?
उत्तरः आईवडीलांची सेवा ही अधिक श्रेष्ठ.
2) उघड शत्रूपेक्षा अधिक घातक कोण?
उत्तरः कृतघ्न मित्र अधिक घातक.
3 ) गृहस्थाश्रमाचे खरे वैभव कोणते?
उत्तरः त्यागशील आणि सद्गुणांची पत्नी.
4)सर्वात मोठे आश्चर्य कोणते?
उत्तरः आपल्या डोळ्यांसमोर रोज अनेक माणसे मरताना दिसतात, पण आपण मात्र अमर आहोत असे अनेकांना वाटते, हे मोठे आश्चर्य.
5) मानवाचा सर्वात मोठा शत्रू कोणता?
उत्तरः क्रोध राग हा .
6) पृथ्वीपेक्षा गौरवास्पद काय?
उत्तरः आई.
7) गवतापेक्षा संख्येने अधिक कोण?
उत्तरः चिंता - काळजी.
8 ) एकाने काय करावे? दोघांनी काय करावे? तिघांनी काय करावे? चौघांनी काय करावे?
उत्तरः एकाने तप करावे. दोघांनी अध्ययन करावे. तिघांनी चर्चा वा चौघांनी प्रवास.
9) माणसाचा खरा मित्र कोण?
उत्तरः पत्नी
10 ) मरणाराचा मित्र कोण?
उत्तरः सत्कृत्य.
11 ) माणसाला अतिशय सुख देणारी वस्तू कोणती?
उत्तरः त्याचे शील ,चारित्र्य वा वागणे.
12 ) सर्वात श्रेष्ठ धन कोणते.?
उत्तरः विद्याधन
13) सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता?
उत्तरः कोणाला पीडा होईल असे न वागणे हा सर्व श्रेष्ठ धर्म आहे.
14 ) कोणेशी केलेली तडजोड टिकून राहाते?
उत्तरः सज्जनाशी.
15) कशाचा त्याग केला असता मनुष्य प्रिय होतो?
उत्तरः अहंकाराचा .
16) मेलेले राष्ट्र कोणते?
उत्तरः ज्यात अराजक यादवी आहे ते.
17) श्रेष्ठ दिशा कोणती?
उत्तरः सत्पुरुष ज्या दिशेने जातात ती.
18 ) दया म्हणजे काय?
उत्तरः सर्वांनी सुखी असावे असे वाटणे ही दया.
19) जिंकायला कठिण असा शत्रू कोणता?
उत्तरः क्रोध.
20) दुष्टता कोणती?
उत्तरः दुसरे व्यक्तीचे दोष दाखविणे.
21) आनंदात कोण राहातो?
उत्तरः कर्ज नाही तो.
22) आपण कोणत्या मार्गाने जावे?
सज्जन ज्या मार्गाने जातात त्या.
।।हरी ॐ तत्सत् जय गुरुदेव दत्त ।।
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"