वाटे मज माझे भस्म व्हावे....श्री दत्त अंगी चर्चिले जावे...
वाटे मज मी कृष्णेचे जल व्हावे..श्री दत्त अंगी स्नपन व्हावे..
वाटे मज मी चंदन ते व्हावे....श्री दत्त पादुकांवरी लेपले जावे..
वाटे मज मी जपमाळ व्हावे...श्री दत्त नाम मजवरी जपले जावे.
वाटे मज मी षडशास्त्र व्हावे...श्री दत्त हस्ते मी सतत रहावे....
वाटे मज मी वेद ते व्हावे....श्री दत्त पदांशी श्वान होऊन रहावे...
वाटे मज मी कामधेनु व्हावे..श्री दत्त संकल्पे सेवेत रहावे...
वाटे मज मी औदुंबर व्हावे...श्री दत्त छायास्वरूप व्हावे.....
प्रभू निरंतर मी तव दास असावे..श्री दत्तकृपा हेचि वरदान द्यावे..
!! ॐ नमो भगवते श्री दत्तात्रेयाय !!
!! ॐ नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम: !!
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"