🙏🕉️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री नवनाथ महाराज की जय 🕉️🙏
जरा परखडच -६
मी माझं काही निरिक्षणे आपल्या समोर मांडतो आहे. आध्यात्मिक गोष्टी ब-याच लोकांना " फ्री" हव्या असतात. पण एक लक्षात घ्या की या संसारात काहीच "फ्री" नाही. आजकाल अध्यात्म हे एका प्रकारचे मनोरंजन/ एण्टरटेन्टमेन्ट सारखं झालं आहे. फक्त माहिती मिळवून किंवा चर्चा करून काही होत नाही. प्रवचने, किर्तने इत्यादी फक्त , मी किती धार्मिक किंवा श्रद्धावान आहे हे दाखवण्यासाठी वापरलं जातं आहे.
कृती/कर्म केल्याशिवाय काहीच होणार नाही. नुसते पुरणपोळी कशी बनवायची हे जाणून आणि पुरणपोळीचे वर्णन ऐकून पुरणपोळी खाण्याचा आनंद आणि समाधान लाभेल कां?
आहे त्याच परिस्थितीत रहायचे कां ?
आपली परिस्थिती मान्य आहे कां ?
आपली परिस्थितीत सकारात्मक बदल करायला आपण काय करतो आहे?
सर्वात अगोदर या प्रश्र्नांची उत्तरे शोधायला हवेत.
संकल्प, इच्छा आणि अपेक्षा यात फारच मोठे अंतर आहे. आपण दृढ संकल्प केला व त्यावर योग्य कृती केली की बदल व्हायला सुरवात होते. जर आपल्यात सामर्थ्य कमी असेल तर सामर्थ्यवान व्यक्तींची मदत घ्यावी. फक्त अपेक्षा किंवा इच्छा केल्याने परिस्थिती बदलत नाही.
तक्रार करून किंवा रडून काहीच बदल होणार नाही.
🙏🕉️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री नवनाथ महाराज की जय 🕉️🙏
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"