Monday, May 13, 2019

सद्गुरू श्री शंकर महाराज

सद्गुरू श्री शंकर महाराज

जन्म: अंदाजे १८००, मंगळवेढे (पंढरपूर), उपासनी कुटुंबात 
कार्यकाळ: साधारणपणे  १८०० ते १९४७ 
स्पर्शदिक्षा: श्री स्वामी समर्थ अक्कलकोट
समाधी: पुणे येथे, धनकवडी, 

" पंढरी जळेपर्यंत आम्हाला आराम करायचाय " असं सांगून अक्कलकोट स्वामी आपल्या भक्तांची जवाबदारी आपल्या लाडक्या शिष्यावरती सोपवून निजानंदी निमग्न झाले. तो शिष्योत्तम म्हणजेच सद्गुरू श्री शंकर महाराज.

श्री शंकर महाराज अलौकिक, सिद्ध, महान योगी होते,ज्ञानी होते ,अवधूत होते आणि अवलियाही होते. अष्टसिद्धी त्यांना वश होत्या. त्यांची जगावर पूर्ण सत्ता होती आणि आजही आहे.

शंकर महाराजांनी आपल्या भक्तांवरती आईच्या ममतेने माया केली,त्यांची दुःखे दूर केली, प्रपंच सांभाळून परमार्थात गती कशी करावी हे समजावून सांगितले.

सदगुरू शंकर महाराज म्हणत असत मी आणी माझा गुरु वेगळा नाही. " श्री स्वामी समर्थ " हा माझ्या गुरुचा जप आहे. त्यांचे नाम घेतले की मला ते पोहोचते. स्वामी समर्थांना सदगुरु शंकर महाराज " मालक " म्हणत असत.

पुण्याचे डॉक्टर धनेश्वर महाराजांचे अंतरंग  शिष्य होते पण त्यांना महाराजांच्या वयाबद्दल संदेह होता. त्यांनी महाराजांची परवानगी घेऊन त्यांच्या काही मेडिकल टेस्ट करून घेतल्या. त्या टेस्टचा रिझल्ट आल्यावर डॉक्टराना भोवळ आली. कारण रिझल्ट मध्ये महाराजांचे वय १५२ वर्षे आले.

महाराजांच्या अनेक भक्तांची जन्म आणि मृत्यूची तारीख १३ आहे. महाराजांना १३ हा अंक विशेष प्रिय आहे. याचा अर्थ सांगताना महाराज सांगत असत; " सब कुछ तेरा, कुछ नही मेरा " हे जीवन व तुझे सारे ऋणानुबंध तुझेच आहेत. तू तुझ्या मागील जन्माचा कर्मभोग घेऊन आला आहेस. तो तुला भोगलाच पाहिजे. कर्मभोगातून मोकळा झाल्याशिवाय तुला ईश्वर प्राप्ती होणार नाही."

महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक आणि महाराजांचे निस्सीम भक्त कै. प्र. के. अत्रे यांचा जन्म १३ ऑगस्ट १८९८ रोजी झाला. त्यांच्या मृत्यूपूर्वी महाराजांनी त्यांच्या दारावर १३ वेळा थाप मारून त्यांना मृत्यूची चाहूल दिली होती. त्यांना १३ जून १९६९ रोजी देवाज्ञा झाली आणि ते महाराजांच्या चरणी विलीन झाले. पाथर्डीच्या माधवनाथ बाबाना समाधीनंतर ५४ वर्षानंतर पावागडचा डोंगर चढताना महाराज भेटले. त्यांनी माधवनाथांना पाच हॉटेलमध्ये चहा पाजला. प्रत्येक वेळी हॉटेलचे बिल १३ रुपये झाले. हॉटेलचे बिल देताना महाराज १०० ची नोट देत असत पण उरलेले पैसे परत घेत नसत.

वैशाख शुद्ध अष्टमी शके १८६९ म्हणजे २४ एप्रिल १९४७ सोमवार या दिवशी  श्री शंकर महाराजांनी महासमाधी घेतली .तत्पूर्वी आपल्या भक्तांच्या प्रेमाखातर तब्बल ३ वेळा आपल्या महासमाधीचा दिवस महाराजांनी पुढे ढकलला होता.

कार्तिक शुद्ध अष्टमीला प्रगट झालेली चैतन्याची ज्योत वैशाख शुद्ध अष्टमीला चैतन्यस्वरूपात विलीन झाली.

संपवूनी आपूला अवतार | निजधामा गेले निरंतर | भक्त झाले पोरके | अवघी जनता शोकाकुल झाली | सर्व भक्तमंडळी हळहळली. 😥

श्री शंकर महाराजांना साष्टांग दंडवत 🙏🙏

संतवर्य श्री योगिराज प्रभु शंकरमहाराज !
वंदन करुनी चरणि अर्पितो भक्तीचा साज !!

अतर्क्यलीला, अगाध महिमा, अमर्याद करणी !
सदैव आम्ही नतमस्तक हो, आपल्याच चरणी. !!

धरले आम्ही भावे तुमचे, जगी घट्ट चरण ! 
सोडणार कधि नाही आम्ही, आले जरी मरण !!

नित्य घडावे स्मरण नि पूजन, देहच रंगावा !
शंकर महाराजांचा जयजयकार मुखी व्हावा !!

!! अनंत कोटि ब्रह्माण्ड नायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद सद्गुरु श्री शंकर महाराज की जय !! 🙏🙏

!! श्री स्वामी समर्थ महाराज की जय !! 🙏🙏

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"