Tuesday, April 23, 2019

कुष्मांडा देवी

🚩*कुष्मांडा देवी*  🚩

                                            स्कंद पुराणात या देवीचे वर्णन केदार खंडात कुष्मांडा देवीचा उल्लेख आहे. हे मंदिर कु मंडी  गावात आहे.हे स्थान केदारनाथाच्चया मार्गावरून रुद्रप्रयाग पुढे मंदाकिनी नदीच्या डाव्या भागात उंच अशा पर्वत शिखरावर आहे. या पर्वतावर नाना प्रकारच्या फुलांची अवर्णनीय  अशी शाेभा असते. सूर्या प्रयाग ,तिलवाडा येथून मंदिरापर्यंत मोटारीचा मार्ग सडक आहे. मंदिराच्या उत्तरेस चौखंबा हिमालय,  दक्षिणेस सूर्या प्रयाग  पूर्वेस कार्तिक स्वामी मंदिर ,व पश्चिमेस काेलदेव पर्वत आहे .याच पर्वतावर कुमारशेण देवाचे मंदिर आहे .या मंदिराच्या पिछाडीस पठारावर हिरवेगार शेतीचे दृश्य नयन मनोहर असे भासते या ठिकाणी मंदाकिनीच्या उजव्या तटकावर  अगस्तींची मंदिर आहे .हरिद्वारच्या वरील भागात देवी "भूमी "म्हणूनच ओळखतात. या ठिकाणी पण त्यांनी   दैत्यानी प्रभाव गाजवण्याचा प्रयत्न यथावकाश केलेला आहे. येथील शिला नावाच्या मंदिरात शिव मानतात आणि हे स्थान कांची कामकोटी म्हणून प्रसिद्ध आहे. या स्थानाचे महत्त्व विशेष असे आहे.  की एक दिवस शंकर पार्वती क्रीडा करीत होते . त्या वेळेस पार्वतीने शंकराच्या डोळ्यात पाहिले  ते परावर्ती तीन स्थानांचे दर्शन झाले. ते तीनही स्थान सूर्य, सोम, व अग्नि स्वरूप  होते . त्यांच्या डोळ्यात डोकावण्याने  भूतलावर सर्वत्र अंधार पडला सूर्याचा लोप झाल्याने ब्राह्मणाचे ब्रह्मकर्म थांबले .अग्नीला पण आपले कार्य करणे जमेना विश्वाचे अपरिमित नुकसान झाले. भगवान शिव त्यामुळे रागावले त्या अपराधा करिता  त्यांनी पार्वतीस  पृथ्वीवर जाऊन तप करण्याची आज्ञा दिली .त्या सूचनेनुसार पार्वतीने "कंपा "नदीजवळ कांची येथे आंब्याच्या झाडाखाली तप आरंभले तेथे एक वालुका महेश लिंग तयार करून तेथे तप  आरंभले या तापात दीर्घ काळ व्यक्तीत झाला. भगवान शंकर तेथे परीक्षा घेण्यासाठी तेथे पार्वती तप करीत होती तेथेच एका नदीचा उगम आरंभला  ती मात्र शिवलिंग पूजेत निमग्न होती. पाणी वाढत होते शेवटी शिवलिंग वाहून जात असताना पार्वती ते कवटाळून धरले. रक्षण केले लिंग  व तिच्या शरीरावरून पाणी वाहत गेले. आेघ वाहत हाेता. पार्वती देवीवा  देह त्या पाण्याने शुद्ध झाला. त्यानंतर पार्वती पुन्हा ध्यानमग्न झाली दृढ निश्चयाने ती तेथे बसली नंतर शंकरांनी ती माया येथे  संपवली. पाणी वाहणे संपले पार्वतीस त्यांनी उठवले आणि पार्वतीसह कैलासास गेले.तेथे जे वालुकामय लिंग होते .ते आजही तेथे आहे .चांदीचे आवरण बसवलेले आहे तेथे जलाभिषेक करीत नाही तर केवळ सुगंधी द्रव्यांचा उपयोग करतात ज्या वृक्षाखाली पार्वतीने तप केले तो वृक्षा आजपण आहे. असे मानतात .या वृक्षांचे वैशिष्ठ म्हणजे त्या वृक्षांपासून विविध स्वादांचे आम्रफल मिळतात. दुसऱ्या एका कथेनुसार महिषासुर युद्ध करीत असता तेथे मिनासुर व कामसुर तेथे आले देवीने पाय पकडून त्यांना दूर फेकून दिले ते जेथे पडले त्या जागेत देवी प्रकट झाली आणि त्यांनी वर मागितला की आमच्या स्मृती करिता पण येथे वास म्हणून देवी प्रकट झाली तो भाग काची  व मदुरा दोन्हीकडील आहे. (चंडिका पुराण).

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"