सुप्रभात !
साडेसाती आपल्याला राशीला सुरू होतं आहे असे नुसते म्हटलं रे म्हटलं लोकांची घाबरगुंडी उडते.का उडते घाबरगुंडी ? याचा कधी कोणी विचार केला आहे का ?
एक तर सर्वात पहिले म्हणजे शनिदेव हे अंत्यत द्यायाळू आहेत,न्याय देवता आहे आणि ही त्यांची नेमणूक भगवान शंकर यांनी केली आहे. म्हणून शनी देवता याला कर्मफलदाता, न्याय प्रिय देवता आहे.
शनी देवता आपण जी काही कर्म करतो त्यानुसार आपल्याला चांगली आणि वाईट फळं देतं असतो.आफण मग जर चांगली कामे केली तर शनी देव नक्की प्रसन्न होतात.शनी देव जेव्हा प्रसन्न होतात तेंव्हा भरभरून देतात आणि जेव्हा नाराज होतात तेंव्हा त्याला कष्टाची कामे करून त्याला सन्मार्गाने नेऊन त्यांची प्रगती घडवून आणतात.
साडेसाती चांगली किंवा वाईट ही आपण आजपर्यंत केलेल्या कर्मावर ठरते.शनी देवाला लाडी, लबाडी, फसवणूक,अन्याय सहन होत नाही.
तेव्हा चांगली कामे करत राहा,पण कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी.मदत मागितली तर जरूर करावी.घरातील ज्येष्ठ मंडळींच्या सेवा करा.
अधूनमधून थोडसं दान करण्याची सवय लावा.उपाशी पोटी कोणी असेल तर त्याला पुरेसे पाणी, अन्न मात्र ताजं खायला द्या, शिळ्या पोळ्या,भात कोणालाही खायला देऊ नका.
तुम्ही केलेल्या तुमच्या कर्माचा हिशोब सगळ्या देवांकडे आहे.साडेसती फक्त तुम्हाला तुमच्या कामात प्रामाणिकपणा,आपलं कोण परक कोण,व्यक्तीचा खरा रंग,चेहरा तुम्हाला शनी देवता जेव्हा जेव्हा तुम्हाला साडेसाती येते तेव्हा दाखवतात.
चांगले कर्म करतो तेव्हा शनी देवता नक्की प्रसन्न होतात आणि वाईट काम केले तर त्याची जी काही शिक्षा असेल तर भोगावीच लागेल. मी पणा, अहंकार, गर्व, सतत चिडचिड पणा यापासून दूर राहा आणि शांत स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करत राहा.
शनी देवता तुम्ही जेवढी चांगली कामे करत राहिल्यास तुम्हाला एक चांगले उच्च पदावर नेऊन ठेवतील आणि जर वाईट काम केले तर एका क्षणाचा विलंब न होता तुम्ही जे काही आजपर्यंत गोळा केले आहे अर्थात ते वाईट मार्गाने कमावून जर आणले असेल तर त्याची विल्हेवाट एका सेकंदात लावून तुम्हाला कंगाल करतात हे पण ध्यानात ठेवा.
हसण्यावारी ही पोस्ट घेऊ नका.
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"