🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
*परमार्थातील विश्वास.....*
गंगेच्या तीरावर एक कुष्ठरोगी विव्हळ अवस्थेत बसून तिथे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक साधु महंतांना हात जोडून गया-वया करून हा दुर्धर रोग बरा करण्यास विणवित होता प्रत्येक जण त्याला टाळून पुढे जात होते अचानक एक सिद्धपुरुष त्या ठिकाणी आले त्यांनी त्याची अवस्था जाणून घेऊन त्याला एक उपाय सुचवला आणि घोषणा केली की आपल्या पैकी कोणी पुण्यवंत असेल त्याने या महारोग्यास आलिंगन (मिठी) दिले असता याचा आजार बरा होईल पण एक गोष्ट अशी की आलिंगन देणारा जर पापी असेल तर हा रोग त्याला जडेल. ही घोषणा ऐकून सगळेच लांब गेले सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत असंख्य साधक महंत सामान्यजण त्या गंगे मधे स्नान करून गेले पण या कुष्ठरोग्याला आलिंगन द्यायची कोणाचीच हिम्मत झाली नाही शेवटी एक साधा माणूस गावाकडचा कोण्या एका कीर्तनकराने कीर्तनात सांगितलं की गंगा ही पाप नाशीनी आहे गंगेत एकदा आंघोळ केली की सगळं पाप धुवून जात म्हणून गंगे मधे स्नान करण्यास आला होता या कुष्ठरोग्यांच्या जवळून जात असता शेवटची विनवणी म्हणून त्याने या माणसालाही विनंती केली आणि तो गावाकडचा भोळा भाबडा मनुष्य या गोष्ठी साठी तय्यार झाला.
तो गंगेत गेला स्नान केलं आणि बाहेर आला भगवंताचं नाव घेतलं आणि त्या कुष्ठरोग्याला मिठी मारली बघ्यांची गर्दी तर होतीच तिथे सगळे आता काय होणार म्हणून चिंतीत होते आणि आश्चर्य कि त्या माणसाने मिठी मारताच त्या कुष्ठरोग्यांच्या आजार एकदम बरा झाला आणि तो पूर्वीसारखा तेजस्वी दिसू लागला आणि हा गावाकडचा मनुष्य सुद्धा होता तसाच राहिला. बघ्यांच्या गर्दीमधून काही प्रश्न आले कि हे कसं काय साधलं ? याच उत्तर तेच या दृष्टांताचा सिद्धांत समजूया.
तो गावंढळ मनुष्य म्हणाला मला एका कीर्तनातून समजलं कि गंगा हि पापनाशिनी आहे गंगेमध्ये स्नान केले असता माझे सर्व पाप धुवून जातील आणि त्या प्रमाणे मी गंगेत स्नान केलं माझा या गोष्टीवर इतका विश्वास होता कि संतांनी सांगितलंय गंगा पाप नाशिनी आहे ज्या अर्थी मी गंगेमध्ये स्नान केलं त्या अर्थी खचितच माझं पाप नाहीस झालं असणार हा धृढ विश्वास होता माझ्या मनामध्ये आणि म्हणून मी त्याला न भीत आलिंगन दिल.
वास्ताविक इतर हजारो जणांनी तिथे गंगे मध्ये स्नान पाप नाशासाठी केलं होत पण ते करत असतानाही त्या पारमार्थिक कृतीमध्ये त्यांना संकोच होता त्या गोष्टीवर त्यांचा पूर्ण विश्वास नव्हता हा असला अविश्वासी परमार्थ करण्यात तरी काय अर्थ आहे.. म्हणून भगवंतावर, नामावर, विश्वास हि परमार्थाची पहिली पायरी आहे ती चुकवू नका
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त....!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"