-:- *गुरु चे महत्व* -:-
🙏जय गुरुदेव🙏
"""""""""""""""""""""""""
-:- *गुरु एक तेज आहे.* गुरूंचे एकदा आगमन झाले की मनातील संशयरूपी अंधःकार कुठल्याकुठे पळून जातो.
-:- *गुरु म्हणजे एक असा मृदंग* आहे की ज्याच्या एका झंकाराने अनाहत नाद ऐकू यायला सुरुवात होते.
-:- *गुरु म्हणजे असे ज्ञान* की ज्याची प्राप्ती झाल्याबरोबर मनातील भयाची सगळी भावनाच लोप पावते.
-:- *गुरु ही एक अशी दीक्षा आहे* की ज्याला गुरुदीक्षा प्राप्त झाली तो हा भवसागर तरून गेलाच म्हणून समजा.
-: *गुरु ही एक अशी नदी आहे* जी सतत आपल्या प्राणांतून वाहत असते.
-:- *गुरु म्हणजे असा सत् चित् आनंद आहे* जो आम्हाला आमची खरी ओळख करून देतो.
-:- *गुरु म्हणजे एक बासरी* आहे जिच्या नुसत्या मंजुळ आवाजानेच आपले मन आणि शरीर आत्मानंदात मग्न होऊन जाते.
-:- *गुरु म्हणजे केवळ अमृतच*. ह्या अमृताच्या सेवनाने तहान कायमची आणि पूर्णपणे शमते.
-:- *गुरु म्हणजे एक अशी कृपाच* असते जी केवळ कांही भाग्यवान आणि सत्पात्री शिष्यांनाच प्राप्त होते आणि काहींना अशी कृपा मिळूनही ती मिळालेली त्यांना समजत नाही.
-:- *गुरु कुबेराचा अक्षय्य खजिनाच आहे* आणि त्या खजिन्याचे मोल होऊच शकत नाही.
-:- *गुरू म्हणजे एक प्रसाद आहे*. ज्याच्या भाग्यात असेल त्याला कांहीच मागण्याची इच्छाउरत नाही.
NG
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"