वर्षातून एकदाच होते या शिवलिंगाचे दर्शन, दूर होतो कालसर्प दोष
काशीमध्ये 100 फूट आडामध्ये असे एक शिवलिंग आहे, ज्याचे वर्षातून फक्त एकदाच नागपंचमीच्या सात दिवसांपूर्वी दर्शन होते. दुसऱ्या दिवशी येथे पूर्ण पाणी भरून जाते. हे शिवलिंग शेषनागचे अवतार महर्षी पतंजिली यांनी स्थापित केलेल्या नागकुंआ येथे आहे. या आडामध्ये पाणी कुठून येते हे आजही एक रहस्य आहे. या संदर्भात सांगण्यात येथे की, याचा जीर्णोद्धार सवंत् 1 मध्ये कोणत्या तरी राजाने केला होता. या हिशोबाने याचा काळ जवळपास 2074 वर्ष जुना आहे. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणाविषयी खास माहिती सांगत आहोत.
वर्षभर पाण्याखाली असते शिवलिंग- मंदिराचे पुजारी तुलसी पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार 'महर्षी पतंजली यांनी तपश्चर्या करण्यासाठी या आडाचे निर्माण केले होते. या ठिकाणी त्यांनी स्थापित केलेले एक शिवलिंग असून हे जमिनीपासून 100 फूट खाली आहे.' पूजा आणि दर्शन वर्षातून एकदाच नागपंचमीच्या सात दिवस अगोदर होते. त्यानंतर वर्षभर हे शिवलिंग पाण्यामध्ये असते. याच ठिकाणी महर्षी पतंजली यांनी आपले गुरु पाणिन यांच्या सोबत महत्त्वपूर्ण ग्रंथांची रचना केली. यामध्ये महाभाष्य, चरक संहिता, पतंजली योग दर्शन हे मुख्य आहेत.शिवलिंग दर्शनाने दूर होतो कालसर्प दोष- पुजारी पांडे यांनी सांगितले की, या शिवलिंग दर्शनाने कालसर्प दोष दूर होतो. अकाल मृत्यूचे कारण नष्ट होते.
- राहू आणि केतूने पीडित व्यक्तीला येथे पूजा केल्याने खूप लाभ आणि फायदा होतो. येथील पाणी घरामध्ये शिंपडल्याने सर्पभय राहत नाही.चारही बाजूला पायऱ्या आहेत. खाली उतरण्यासाठी दक्षिण दिशेकरून 40 पायऱ्या, पश्चिमेकडून 37 तसेच पूर्व आणि उत्तरेकडून 60-60 पायऱ्या आहेत. या व्यतिरिक्त शिगलींगापर्यंत जाण्यासाठी 15 पायऱ्या आहेत.
यामधील पाणी काढण्यासाठी दोन-दोन पंप लावले जातात.
!! श्री गुरुदेव दत्त!!
. 🙏 🙏. 🙏 🙏. 🙏
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"