शुक्रवार १९ एप्रिल २०१९ चैत्र पौर्णिमा - श्री हनुमान प्रकट उत्सव आणि श्रीगुरु श्रीपादराजांचे जन्मनक्षत्र चित्रा हा विशेष योग.
श्रीगुरु श्रीपादराजांचे ममत्व व हनुमंतरायाचे भक्तीवात्सल्य पिता पुत्र स्वरूप. कारण दोघेही भारद्वाज गोत्रांचे.
म्हणून हनुमंतरायाचे प्रकटीकरण श्रीपादराजांच्या मूळ तत्वांमध्ये अंशात्मक असले तरी पोर्णिमेच्या - १६ कलांनी सुशोभित आहे.
श्रीपादप्रभूंचा अवतार म्हणजे ऐश्वर्यसंपन्न दत्तात्रेयांचा कुटुंबवत्सल अवतार.
श्रीगुरुनी चित्रा नक्षत्रावर सूर्योदयसमयी अवतार घेणे हा एक मंगल योग.
चित्रा नक्षत्राचे स्वरूप अग्नीतत्वाचे व त्याचा अधिपती मंगळ. म्हणून श्रीपादप्रभू श्रीसिद्धिविनायक दत्तात्रेय आहेत.
कर्माचे अमंगलत्व भग्न होऊन मंगल कर्मच शिल्लक राहावे व चांगल्या कर्माना चांगले फळ मिळावे हे साध्यकार्य चित्रा नक्षत्र करत असते.
श्रीपादप्रभूंच्या गुरुतत्वाबरोबरच .. त्यांच्या श्रीविनायकतत्वासमोर मंगळ व केतू ....आणि शिवतत्वासमोर शनिमहाराज व राहू नतमस्तक होत असतात.
या दिवशी श्रीपादप्रभूंची उपासना खालील पद्धतीने करू शकता .
१) खालीलपैकी कुठलाही श्रीगुरुजप ( कमीत कमी १०८ वेळा )
ll श्रीपादराजम शरणं प्रपद्ध्ये ll
ll दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ll
ll दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीमद नृसिंहसरस्वती दिगंबरा श्री दत्तात्रेय दिगंबरा ll
🌼🍃🌼🍃🌼🍃🌼🍃🌼🍃🌼
🌷 श्रीपाद श्रीवल्लभ १०८ नामावली 🌷
🌼🍃🌼🍃🌼🍃🌼🍃🌼🍃🌼
ॐ श्रीपाद राजाय नम:
ॐ श्रीपाद गुरुवे नम:
ॐ श्रीपाद दिगंबराय नम:
ॐ श्रीपाद पीठांपूरप्रकटाय नम:
ॐ श्रीपाद पीठांपूरनित्यविहाराय नम:
ॐ श्रीपाद पीठांपूरसूक्ष्मविहाराय नम:
ॐ श्रीपाद मुक्तविहाराय नम:
ॐ श्रीपाद बापानाचार्यप्रियाय नम:
ॐ श्रीपाद राजमांबा अन्नप्रियाय नम:
ॐ श्रीपाद वेंकटश्रेष्टी संवादप्रियाय नम:
ॐ श्रीपाद कुक्कुटेश्वरदत्ताय नम:
ॐ श्रीपाद कालाग्नीशामनदत्तस्वरुपाय नम:
ॐ श्रीपाद सुमतीदेवीनंदनाय नम:
ॐ श्रीपाद मातृपितृपुण्य प्रकटाय नम:
ॐ श्रीपाद बापनाचार्य यज्ञप्रसादाय नम:
ॐ श्रीपाद गणेशस्वरुपाय नम:
ॐ श्रीपाद मुक्तहस्तदायकाय नम:
ॐ श्रीपाद लीलाधारणाय नम:
ॐ श्रीपाद कर्मज्ञानप्रदायकाय नम:
ॐ श्रीपाद सद्बुद्धिप्रदायकाय नम:
ॐ श्रीपाद चित्तस्वरूपाय नम:
ॐ श्रीपाद अहंविनाशाय नम:
ॐ श्रीपाद भक्तह्रदय निवासाय नम:
ॐ श्रीपाद भक्तकल्याणकारकाय नम:
ॐ श्रीपाद भक्तसंकट निवारणाय नम:
ॐ श्रीपाद भक्तसहजदर्शनाय नम:
ॐ श्रीपाद भक्तकामनापूर्तीकारकाय नम:
ॐ श्रीपाद भक्तमार्गदर्शनाय नम:
ॐ श्रीपाद भक्तसहजप्रकटनाय नम:
ॐ श्रीपाद भक्तजन्म देयकाय नम:
ॐ श्रीपाद भक्तपूर्वसंचितशुद्धाय नम:
ॐ श्रीपाद भक्तरमणाय नम:
ॐ श्रीपाद भक्तउपदेशाय नम:
ॐ श्रीपाद भक्तजन्मरहस्य प्रदायकाय नम:
ॐ श्रीपाद ब्रह्मांडस्वरूपाय नम:
ॐ श्रीपाद स्वरुप- अवर्णनाय नम:
ॐ श्रीपाद शिवशक्ती स्वरुपाय नम:
ॐ श्रीपाद नृसिंहसरस्वती अवताराय नम:
ॐ श्रीपाद स्वामीसमर्थ अवताराय नम:
ॐ श्रीपाद मधुमतीयोग स्वरूपाय नम:
ॐ श्रीपाद सहजानंद स्वरूपाय नम:
ॐ श्रीपाद नाम प्रकटनाय नम:
ॐ श्रीपाद भक्तकृपाकारकाय नम:
ॐ श्रीपाद कोमलपादपूज्यनीय नम:
ॐ श्रीपाद अर्धनारीनटेश्वरा स्वरूपाय नम:
ॐ श्रीपाद महालक्ष्मी स्वरूपाय नम:
ॐ श्रीपाद महासरस्वती स्वरूपाय नम:
ॐ श्रीपाद महाकाली स्वरूपाय नम:
ॐ श्रीपाद वेंकट स्वरूपाय नम:
ॐ श्रीपाद नवनाथ गुरुवे नम:
ॐ श्रीपाद नवकोटनारायण प्रियाय नम:
ॐ श्रीपाद गोदुग्धप्रियाय नम:
ॐ श्रीपाद कर्मज्ञान बोधकाय नम:
ॐ श्रीपाद वेदपठण प्रियाय नम:
ॐ श्रीपाद ब्राह्मणसंघ मार्गदर्शनाय नम:
ॐ श्रीपाद जातीभेद निवारणाय नम:
ॐ श्रीपाद ज्ञानसागराय नम:
ॐ श्रीपाद दिक्षा देयकाय नम:
ॐ श्रीपाद दत्तरूप दर्शनाय नम:
ॐ श्रीपाद पीठांपूरसंस्थानदत्ताय नम:
ॐ श्रीपाद गर्वहरणाय नम:
ॐ श्रीपाद अहंबुद्धीनाशाय नम:
ॐ श्रीपाद पुण्यात्मामार्गदर्शनाय नम:
ॐ श्रीपाद मृत्यूघटिका निवारणाय नम:
ॐ श्रीपाद मोक्षदायकाय नम:
ॐ श्रीपाद मोहबंधनाय नम:
ॐ श्रीपाद विषयवासना दग्धीताय नम:
ॐ श्रीपाद गर्भज्योती स्वरूपाय नम:
ॐ श्रीपाद सिद्धी करणाय नम:
ॐ श्रीपाद सिद्धी धारकाय नम:
ॐ श्रीपाद सिद्धी देयकाय नम:
ॐ श्रीपाद भक्तबंध कारकाय नम:
ॐ श्रीपाद देवदेवता प्रियाय नम:
ॐ श्रीपाद चरित्रकोश देयकाय नम:
ॐ श्रीपाद सृष्टीस्वरूपाय नम:
ॐ श्रीपाद उग्रभाव स्वरूपाय नम:
ॐ श्रीपाद उग्रनेत्र अग्नीभस्मकारकाय नम:
ॐ श्रीपाद सिद्धमंत्र स्वरूपाय नम:
ॐ श्रीपाद प्रेमपाश बंधनाय नम:
ॐ श्रीपाद भूतभविष्यवर्तमान कालस्थिराय नम:
ॐ श्रीपाद संजीवनपादुका स्वरूपाय नम:
ॐ श्रीपाद योगिनी रमणाय नम:
ॐ श्रीपाद चैतन्य स्वरूपाय नम:
ॐ श्रीपाद मनकवडा पूर्णदायका नम:
ॐ श्रीपाद संसारसौख्य प्रदायकारक नम:
ॐ श्रीपाद नित्यस्मरणाय नम:
ॐ श्रीपाद नित्यचिंतनाय नम:
ॐ श्रीपाद नित्यपूजनीय नम:
ॐ श्रीपाद देहकारकाय नम:
ॐ श्रीपाद शुभचिन्ह दर्शनाय नम:
ॐ श्रीपाद हलवाप्रियाय नम:
ॐ श्रीपाद कुरवपूरसिध्द कार्याय नम:
ॐ श्रीपाद जीवसृष्टीप्रदायकारकाय नम:
ॐ श्रीपाद योगीराजाय नम:
ॐ श्रीपाद योगसाधकाय नम:
ॐ श्रीपाद योगरमणाय नम:
ॐ श्रीपाद अनघास्वरूपाय नम:
ॐ श्रीपाद अनघादेवीप्रियाय नम:
ॐ श्रीपाद गायत्रीमंत्रस्वरूपाय नम:
ॐ श्रीपाद भास्करउपासनाकारकाय नम:
ॐ श्रीपाद मोहमायास्वरूपाय नम:
ॐ श्रीपाद कुलदेवतास्वरूपाय नम:
ॐ श्रीपाद सृष्टीमूलस्वरूपाय नम:
ॐ श्रीपाद दत्तमूर्तीस्वरूपाय नम:
ॐ श्रीपाद कलियुगमुक्तीदायकाय नम:
ॐ श्रीपाद गुरूमाउली स्वरूपाय नम:
ॐ श्रीपाद ओंकारस्वरूपाय नम:
ॐ श्रीपाद जपनाम अदृश्यव्यक्तरुपाय नम:
🌷🌷ll श्रीपादराजम शरणम प्रपद्धे ll 🌷🌷
🌼🍃🌼🍃🌼🍃🌼🍃🌼🍃🌼
२) सिद्धमंगलस्तोत्राचे पठण १२ वेळा
३) श्रीपादचरितामृतामधील अध्याय १४ - दत्तदास यांचा खालील दत्तचरित्र भाग ५३ वेळा पठण करावा.
------------------------------------------------------------------
पूर्व युगात अनसूया व अत्रिमहर्षी या परम पावन दांपत्याला एका पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. त्याचेच नाव दत्तात्रेय असे ठेवले होतेे. तेच परमज्योती दत्तात्रेय सध्या या कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ या रुपाने पीठिकापुरममध्ये अवतरले. त्या महाप्रभूंचे आज उपनयन झाले. उपनयनानंतर दिव्य तेजस्वी असे आपले प्रभू अधिकच तेज:पुंज दिसू लागले. अशा दीनजन उद्धारक असणाऱ्या प्रभूंचे नित्य मांगल्य होउ दे.
-----------------------------------------------------------------
४ ) श्रीगुरु जलाभिषेक
आपल्या कडील देवघरात श्री गणेश मूर्ती असतेच किंवा श्री दत्तात्रेय, श्री स्वामीसमर्थ मूर्ती
असल्यास
" ll दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीमद नृसिंहसरस्वती दिगंबरा श्री दत्तात्रेय दिगंबरा"
या १०८ वेळा श्रीगुरुउद्घोषाने मूर्तीवर जलाभिषेक करू शकता.
संध्याकाळी श्रीपादराजांच्या आवडीचे श्रीरुद्रपठण करू शकता किंवा मोबाइल अँप द्वारे ऐकू शकता.
५) श्रीगुरूंच्या श्रीपादचरितामृतचे पारायण चित्रा नक्षत्र ते हस्त नक्षत्र ( २७ नक्षत्र - साधारण २७ दिवस - दररोज २ अध्याय) असे ही करू शकता. प्रत्येक अध्यायाच्या सुरवातीस व शेवटी सिद्धमंगल स्तोत्र पठणाचे महत्व आहे.
कालावधी : शुक्रवार १९ एप्रिल - बुधवार १५ मे
स्त्रियांना अडचणीचे ५ दिवस सोडून २२ दिवसात पारायण जमू शकते.
===================================
सकाळी किंवा संध्याकाळी जमेल तसे श्रीगुरु श्रीपादराजांच्या आवडीचे गायीचं दूध-साखर / पोळी , दहीभात , हलवा ( सत्यनारायणाचा प्रसाद) नेवैद्य म्हणून अर्पण केले तरी चालेल.
*ll नमो गुरवे वासुदेवाय ll*
*ll दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ll*
*ll श्रीपादराजम शरणं प्रपद्ध्ये ll*
************************
************************
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"