Wednesday, March 20, 2019

तुम्हाला कोण आनंदात ठेवतं ?*

*तुम्हाला कोण आनंदात ठेवतं ?*

एकदा एका वक्त्याने श्रोत्यांमधील एका महिलेला   विचारले ,
*" तुमचा नवरा तुम्हांला आनंदात ठेवतो का ?"*

तिच्या शेजारी बसलेल्या पतीच्या चेहऱ्यावर हसू उमटले . तो आत्मविश्वासाने पत्नीकडे बघू लागला . त्याला पूर्ण खात्री होती , की ती " हो " असंच म्हणेल . कारण तिने लग्न झाल्यापासून कधीच काहीही तक्रार केलेली नव्हती .... !!

*पण त्याच्या बायकोने स्पष्ट आवाजात उत्तर दिलं , " नाही "* 
 *ती म्हणाली , " माझा नवरा नाही ठेवत मला आनंदात !! "*

*तिच्या पतीला हे अनपेक्षित होतं . तेवढ्यात ती पुढे म्हणाली , " मला माझ्या नवऱ्याने आनंदात ठेवले नाही , मी स्वत:च आनंदात राहते ....!! "*

*" मी आनंदी असावं की नाही याच्याशी त्याचा काहीच संबंध नाही . माझा आनंद पूर्णपणे माझ्यावरच अवलंबून आहे . "*

*" कुठल्याही परिस्थितीत , आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी मी आनंदीच राहते . जर माझा आनंद कुणा दुसऱ्यावर , एखाद्या वस्तूवर किंवा विशिष्ट परिस्थितीवर अवलंबून राहिला तर ते माझ्यासाठीच कठीण होऊन बसेल ."*

*" आयुष्यातली प्रत्येक गोष्ट सतत बदलत असते .… !! माणसं , संबंध , आपलं शरीर , हवामान , आपले ऑफिसातले बॉस , सहकारी मित्र ,आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य .… !! ही यादी न संपणारी आहे ."*

*" त्यामुळे काहीही झालं तरी आपण आनंदी राहायचं हे मीच ठरवायला हवं ना .... ? माझ्याकडे खूप काही असलं काय किंवा काहीच नसलं काय , मी आनंदीच असते .... !! "*

*" मला कुठे बाहेर जायला मिळालं काय किंवा घरात बसून राहावं लागलं काय , मी आनंदीच राहीन .... !! "*
*मी श्रीमंत असले काय किंवा गरीब राहिले काय , मी आनंदीच असेन .... !!"*

*माझं लग्न झालेलं असलं तरी लग्ना आधीही मी आनंदीच होते .... !!*
*कारण मी आनंदी आहे ती माझ्या स्वत:मुळे .... !!"*

*" माझं जगणं दुसऱ्या कुणापेक्षा जास्त चांगलं आहे म्हणून मी आयुष्यावर प्रेम करते असं नाही , तर आनंदात राहायचं हे मी स्वत:च ठरवलं असल्यामुळे मी आनंदी आहे ....!! "*

*" माझ्या आनंदाची संपूर्ण जबाबदारी मीच घेतली असल्यामुळे माझ्याबरोबर जगणाऱ्या कुणालाही मला आनंदी ठेवण्याचं ओझं बाळगावं लागत नाही . त्यामुळे माझ्याशी बोलताना , वागताना त्यांना अतिशय मोकळेपणा जाणवतो ....!! "*

*आणि यामुळेच मी इतकी वर्ष आनंदात संसार करू शकले . तुमचा आनंद कधीही दुसऱ्या कुणाच्या हाती जाऊ देऊ नका ....!! "*

*वातावरण चांगलं नसलं तरी आनंदी राहा .… !! आजारी असलात तरी आनंदी राहा .… !! कठीण परिस्थितीत , पैसे नसले तरी आनंदी राहा .… !! कुणी तुम्हांला दुखावलं , कुणी तुमच्यावर प्रेम करत नसलं , अगदी तुम्ही किती मौल्यवान आहात हे ठरवू शकत नसलात , तरी आनंदी राहा .... !!*

*तुम्ही स्त्री , पुरुष कुणीही , कितीही वयाचे असा .… !! असाच विचार करायला हवा .... !!  नाही का .... ?*

*😀आनंदी राहा , आनंदात जगा .... !!😃*
       🙏धन्यवाद 🙏

डॉ. विकास निकम
जिवन विकास केंद्र
जळगाव  ९८५०४८४७२२

🙏🌹🙂🙏🌹🙂🙏

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"