🙏 !! जय श्री राम !! 🙏
एक साधू रस्त्याने चालले असता त्याना खूप तहान लागली पुढे गेले तर एका कुंभाराच घर लागल साधू तिथे गेले आणि पाणी मागितले त्यानेही त्या साधूंना आदर पूर्वक नमस्कार करून पाणी दिल पाणी पित असताना अचानक त्यांच लक्ष बाजूस ठेवलेल्या मडक्यावर गेल एका बाजूला भला मोठा मडक्यांचा ढीग लावला होता पण एक मडक वेगळ ठेवल होत त्या साधूंनी त्याला विचारल का रे बाबा इतकी मडकी एका बाजूस आणि ते एकच मडक वेगळ का रे बाबा ठेवल आहेस तेंव्हा तो म्हणतो महाराज ते मडक खराब आहे त्याला गळती लागली आहे आणि कोणी घेत नाही म्हणून वेगळ ठेवल आहे
साधू त्याच्याकडे त्या मडक्याची मागणी करतो तो कुंभार त्याला म्हणतो महाराज अहो हव असेल तर चांगल घेऊन जा फूटक मडक नेऊन काय फायदा ते म्हणले देणार असशिल तर हेच दे नाहीतर चाललो मी नाईलाजस्तव तो ते मडक त्यांना देऊन टाकतो
ते साधू त्या मडक्याला स्वछ धुतात आणि आणून आपल्या मंदिरातील शिवलिंगावर बांधून ठेवतात परिणाम काल पर्यंत कोणा कोपर्यात खितपत पडलेल निरुपयोगी ते मडक आज साधू च्या सहवसाने, संत समागमाने आज देव कार्य करू लगाल होत देवाच्या सनिध्यात होत लोक यायची त्या शिवशंकरांच्या पिंडी वर डोक ठेवल की त्या मडक्याला डोक लावायचे आणि त्यांच मन प्रसन्न व्हायच त्याच ही दर्शन घेऊ लागले
जर एक मातीच मडक साधू च्या सहवासात त्याच्या जीवनाचा जगण्याचा मार्ग बदलत असेल तर आपण तर मनुष्य योनित आहोत आपण संतांच्या सहवासात का घडणार नाही ?
म्हणून संगत ही सज्जनाची धरावी दुर्जंनाच्या संगतीत काय होत हे सांगतो
जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात
ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला ! कुसंगे नाडला साधू तैसा !!
एक हिरा घ्या आणि त्याला ऐरनीवर ठेवा वरुन घनाचे घाव घाला तो एक तर ऐरणीला छेद करतो नाहीतर घानला इतका कडक असणारा हिरा त्याला जर एका डब्बिमध्ये एका ढेकणाच्या संगतीत रात्रभर ठेवला ना तर सकाळपर्यंत त्याच पाणी होत
म्हणून संगत ही सज्जनाची करावी दुर्जंनाच्या संगतीत आपल नुकसानाच होत
पितामह भीष्मसारखे लोक कारणासारखे लोक दुर्योधनाच्या संगतीत त्याची सात दिल्याने लयास गेले उलट पांडव श्री कृष्ण भगवंताच्या सनिध्यात आले आणि कल्याणरूप पावले .
*IIश्रीराम जयराम जय जय राम II* 🙏🌷🙏
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"