Wednesday, March 20, 2019

परमेश्वर पहायचा नाही, ऐकायचा नाही, फक्त असा अनुभवायचा

गाढ झोपेतही हृदयाचे स्पंदन चालू रहाणे,
श्वासोछ्वास चालू रहाणे,
पचनक्रिया चालू रहाणे,
खाल्लेल्या अन्नाचे रक्त निर्माण होणे,
पृथ्वीतलावर पाणी निर्माण होणे,
शरीरांतर्गत सर्व इंद्रियांनी शिस्तपूर्वक कामे करणे,
अंतराळांतील प्रत्येक ग्रहगोलांनी भ्रमणकक्षा सांभाळणे,
फुलांमध्ये सौरभ निर्माण होणे,
बीजातून वृक्ष निर्माण होणे,
बाळाच्या जन्माआधी मातेच्या स्तनात दूध निर्माण होणे,
पिलासाठी आधीच चा-याची सोय निर्माण होणे,
एवढ्याशा स्वरयंत्रातून अब्जावधी वेगवेगळे ध्वनी निर्माण होणे
दोन डोळे,दोन कान, एक नाक,दोन ओठ यातून निर्माण होणा-
र्या अवयवांतून एवढ्या विविधता निर्माण होणे,
मेंदूत लक्षावधी आठवणी मुद्रित होणे,
एकदा चालू झालेले हृदय शंभर वर्षे सुध्दा दिवसरात्र अविश्रांत
स्पंदत रहाणे,
बोललेल्या स्वरांचे ऐकणा-याच्या मेंदूत बरोबर अर्थ उमजणे,
सर्वत्र परमेश्वराची सत्ता जाणवते.परमेश्वर पहायचा नाही, ऐकायचा नाही, फक्त असा अनुभवायचा.अहंकार सोडून,निग- र्वी होऊन आणि निःशंकपणे.🙏

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"