शरीर सोडण्याची वेळ असह्य वेदनादायी असते.'अंते मति, सा गतिः' पृथ्वीतलावर आपण जन्म घेतल्यापासूनच्या दृक-श्राव्य
ध्वनिफितींचे मुद्रण मृत्यूनंतरच्या जगात सादर होऊन पुढील गतीचा निवाडा होणार असतो.म्हणून आपल्याला सोन्यासार-
खी मनुष्य योनी मिळाल्यावर परमेश्वराच्या नियमांप्रमाणे वाग
णे फार महत्वाचे असते.अलिकडे मी माझ्या कुलदैवताच्या
दर्शनाला कोळे नरसिंहपूरला गेलो होतो.अत्यंत जागृत असे ते
ज्वालानरसिंहांचे मंदिर आहे.कराडपासून जवळच पेठ नाका
येथून रस्ता आहे.ज्यांचे कुलदैवत नरसिंह आहे त्यांनी तर तेथे
अवश्य जावे.नीतीश भारद्वाज ह्या अभिनेत्याचे मूळ आडनाव
उपाध्ये आहे.हिंदी चित्रनगरीसाठी त्यांनी नामांतर केले.त्याना-
ही मी सर्व समजाऊन सांगीतल्यावर ते नरसिंहपूरला आणि
बदामीला बनशंकरींच्या दर्शनाला गेले व त्यांचे आयुष्यच बदलले.मी नरसिंहपूरचे पुजारी श्री कुलकर्णी यांच्या घरी बसलो होतो तेथे मला एक बाई मधुन मधुन किंचाळताना दिसल्या.त्या मृत्युशय्येवर होत्या आणि थोड्याच वेळेत त्या जाणार हे डाॅक्टरांनी सांगीतले होते.त्यांना काहीतरी दिसून त्या
दचकुन घाबरत होत्या.शास्त्रकार सांगतात की माणूस आयुष्य-
भर जी जी पापे करतो ती सर्व अंतकाली त्याला दिसू लागतात
आणि तीव्र दुःख होऊन तो घाबरू लागतो.अंतःकाली तो बेशुध्दावस्थेत गेलेला वाटतो पण त्यावेळी त्याच्या अंतर्चक्षुपुढे
संपूर्ण जीवनपट सरकत असतो.जीवात्मा कितीही महान असो,
त्या प्रत्येकाला शरीर सोडते वेळी आपल्या समग्र जीवनाचा
चित्रपट पहावाच लागतो.प्रभू रामचंद्रांच्या पीताश्रीनाही मृत्यु-
शय्येवर श्रावण बाळ आपल्या बाणाने विध्द होऊन शेवटची पळे मोजताना दिसला होता आणि त्याचे माता पिता दशरथाना
'पुत्र विरहाने मृत्यु होईल ' असा शाप देताना दिसले आणि बेशुध्दावस्थेत असलेल्या दशरथराजानी हृदयभेदी किंकाळी फोडली.अंतःकाळी अशा प्रकारचे पाप-स्मरणात्मक दुःख होऊ
नये म्हणून नीतिमय व अनासक्त जीवन व्यतीत करावे आणि पूर्वकर्मांप्रमाणे प्राप्त झालेले जीवन समाधानाने जगत शुभ
कर्मे करीत रहावे.आपापली कर्तव्ये एकनिष्ठेने करत राहिले तर
प्रारब्धाची अर्धी लढाई आपण जिंकतो.शिवाय पुण्यकर्मे, उपासना चालू ठेवली तर मुक्तीकडे वाटचाल होत रहातेच.
मित्रमैत्रिणींनो प्रत्येक क्षणाला सावध राहून कर्मे केल्यास अंतः
काळाची भीती नाहीशी होते.कोर्टात पिंज-यात उभे राहिल्यावर
फार जपून बोलावे लागते कारण प्रत्येक शब्दाची नोंद होते,
तसेच प्रत्येक कर्माची नोंद होते व मृत्युपश्चातल्या जगात ते
पुरावे सादर होतात.आणि तेथे सोडवायला कोणीही नसतो,
आपल्या कर्मांवाचून......तस्मात् होशियाsssर......🙏🙏🙏
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"