*।। मानसहोळी ।।*
*॥ Mind Holi ॥*
कराया साजरा ।
होलिकेचा सण ।
मनाचे स्थान ।
निवडीले ।।
To celebrate Holi, I choose mind as a place.
ऐसे ते स्थान ।
साधने सरावले ।
भक्तीने शिंपिले ।
केले सिद्ध ।।
I wash that place with sadhana and then sprinkle with my devotion.
त्या स्थानी खळगा ।
समर्पणाचा केला ।
त्यात उभा ठेला ।
अहंकार एरंड ।।
In that place I made a hole of surrender and in that i buried my ego
रचलीया तेथे।
लाकडे वासनांची ।
इंद्रीयगोवऱ्याची ।
रास भली ।।
I put their wood of my desires and arranged all my senses
गुरुकृपा तैल ।
रामनाम घृत ।
अर्पिले तयात ।
ऐसे केले ।।
I put Guru's blessing as oil, Ram chanting as Ghee.
रेखिली भोवती ।
सत्त्कर्म रांगोळी ।
भावरंगाचे मेळी ।
शोभिवंत ।।
Surrounding that I drew my good deeds And my compassion as a decoration.
वैराग्य अग्नीसी ।
तयाते स्थापिले ।
यज्ञरूप आले ।
झाली कृपा ।।
I establish my detachment to fire and ignite the Yajdnya.
दिधली तयाते ।
विषय पक्वान्नाहुती ।
आणिक पुर्णाहूती ।
षड्रिपु श्रीफळ।।
I put all my materialist desires and Coconut as my shatripu.
झाले सर्व हुत ।
वैराग्य अग्नीत ।
जाणावया तेथ ।
नूरले काही ।।
I surrender everything, nothing is mine. To realise that I was not there.
वाळ्या म्हणे जनी ।
व्हावी ऐसी होळी ।।
जेणे मुक्तीची दिवाळी।
अखंडित ।।
Jana says, Holi should be like this Where you can get continuous liberation as a Diwali..
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"