अनघा स्वामी रुपी भगवान दत्तात्रेय
श्री अनघा स्वामीचे रूप भगवान दत्तात्रेयांचे गृहस्थ रूप मानले जाते. श्री अनघा दत्तात्रेय रूप, ब्रह्मा-विष्णु-महेश यांचे संयुक्त रूप आहे. त्याच प्रकारे श्री अनघा देवी या श्री अनघा लक्ष्मी रुपी महाकाली-महासरस्वती-महालक्ष्मी यांचे संयुक्त रूप आहे. श्री अनघा लक्ष्मी सहित श्री अनघा दत्तात्रेयांची पूजा सामान्यत: गृहस्थ जीवनात येणाऱ्या सांसारिक प्रश्नांच्या निवारण हेतु तथा भौतिक सुखशांतिसाठी केली जाते. कुमारी कन्येच्या लग्नहेतुने देखील केली जाते. श्री अनघाष्टमी व्रत बहुला अष्टमी (मार्गशीर्ष वद्य अष्टमी) दिवशी करतात.
मंत्र: "ॐ श्री अनघा लक्ष्मी सहित श्री अनघा दत्तात्रेयाय नमः"
किंवा "ॐ श्री अनघा देवी सहित ॐ श्री अनघा स्वामीने नमः"
किंवा "ॐ श्री अनघा लक्ष्मी दत्तात्रेयाय नमः"
त्यासाठी हेतुपूर्वक या मंत्राचा जप करू शकतात. सामान्यत: अनघा अष्टमी व्रत पूजाविधान "श्री लक्ष्मी – श्री विष्णु" संयुक्त-पञ्च उपचार किंवा षोडश उपचार पूजा सारखे आहे.
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"