Wednesday, March 20, 2019

तिळ तर्पण विधी

*‼तिळ तर्पण विधी‼*
*नमस्कार!*
**पितरदोष*.. ह्यासंदर्भात श्रीससद्गुरु
कृपेने तिळतर्पण विधी देत आहे. हा विधी घरातील
सर्वात *थोर म्हणजे मोठ्या पुरुष व्यक्तीने करायचा आहे**
*ज्याचे वडिल हयात (जिवंत ) नाहीत अश्या पुरुष व्यक्तीनेच दररोज तद हयात अगदी मरेपर्यंत करायचा आहे.* ह्याचा उपयोग / सकारात्मक फायदा असा
कि घराण्यातील मृतात्म्यास मुक्तीचा मार्ग सोपा होणे
त्यांना सद्गती लाभले व त्यांचे कृपाशिर्वाद मिळण्यास
मदत होते. घराण्यातिल सर्व कुटुंबियांना त्याचा फायदा
लाभतो.. मनःपूर्वक सकारात्मक दृष्टिने श्रद्धापूर्वक हा
बिनपैशाचा बिनात्रासाचा सहज सोपा परंतु अत्यंत
प्रभावी तिळतर्पण वीधी करावा.. *🌹तिळतर्पण विधी🌹*.. प्रथम ताम्हण पळी पात्र घेणे.
पळीपात्रात स्वच्छ निर्मळ पाणी घेणे, चिमूटभर काळे पांढरे तिळ घेणे. 
🌹घरात जर गड़गापूरचे भस्म
असल्यास ते चिमूटभर पाण्यात घेणे.नसल्यास काही हरकत नाही. 
🌹सर्वप्रथम श्रीगणेश, श्री कुलदैवत श्रीकुलस्वामिनी व श्रीसद्गुरुंचे स्मरण करुन तर्पणास
सुरवात करावी. 
*🌹आसनावर दक्षिणेकडे तोंड करुन बसणे🌹*.... सर्वप्रथम उजव्या हातात तिन पळी तिळमिश्रित पाणी घेणे. गायत्री मंत्र म्हणने..व समोरुन
पाणी खाली ताम्हणात सोडताना..
 *!!ॐ श्री देवता तर्पण स्वाहा !!* 
असे म्हणावे.. पुन्हा हातात तिन पळी तिळमिश्रित पाणी घेऊन गायत्री मंत्र म्हणावा व ताम्हणात पाणी खाली सोडताना करंगळीच्या बाजूने
पाणी खाली सोडताना... *!! ॐ श्री ऋषी तर्पण स्वाहाः**
! असे म्हणावे. 
त्यानंतर पुन्हा तिन पळी
तिळमिश्रीत पाणी घेऊन पाणी खाली ताम्हणात
सोडताना अंगठयावरुन पाणी खाली सोडताना !!
*ॐ श्री पितर तर्पण स्वाहाः !!** असे म्हणावे... हि वरिल क्रिया तिन वेळा करावी. त्यानंतर ३ वेळा !!
*ॐ नमः शिवाय !!** म्हणावे.
 *🌹२८ वेळा !! ॐ श्री
पितरभ्यो नमः !! म्हणून पुन्हा ३ वेळा !! ॐ नमःशिवाय !! म्हणावे* .. 
मग शेवटी थोड्स मोठ्याने *नवनाग स्तोत्र म्हणावे*... (फक्त हे नवनाग स्तोत्र सकाळ
संध्याकाळी घरातिल सर्वांनी म्हटले तर उत्तमच). !!

          *नवनाग स्तोत्र* 
श्री अनंत वासुकी शेषं पद्मनाभंच कंबलम् 
 शंखपालं धृतराष्ट्रम् तक्षकं कालियं तथा !!
एतानी नवनामानी नागानांच महात्मनाम! सायंकाले
पठे नित्यं प्रातःकाले विशेषताः ! तस्य विषभयं नास्ती सर्वत्र विजयी भवेत !! ३ वेळा ॐ नमः शिवाय म्हणुन
आसनावरुन उठावे...उठताना आसन लगेचच उचलुन
बाजुला घडी घालुन ठेवावे.व ताम्हणातलं तर्पणाचे
पाणी तुळसीला किंवा पिंपळाला अथवा वड/ बेलाच्या
झाडाला अर्पण करने..सूर्यदर्शन करने. 
*शुभंम् भवतु!*

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"