वास्तूशास्त्रावरील माहिती सिद्ध साधना या ग्रंथातून घेतली आहे.
महर्षी व्यासरचित मुख्य १८ पुराणांपैकी ऐकून ९ पुराणात मिळून एक संपूर्ण वास्तुशास्त्र सांगण्यात आले आहे, या ग्रंथात त्यातीलच अंतर्रचना विषयक माहिती देण्यात येत आहे.
प्रथमतः वास्तूच्या दिशा व दिशांचे स्वामीग्रह –
पूर्व - श्रीसूर्य , श्रीइंद्र |
अग्नेय - श्रीशुक्र , श्रीचंद्र |
दक्षिण - श्रीमंगल, श्री यम |
नैरुत्य - श्री राहू, श्री निवृत्ती |
पश्चिम - श्रीशनी, श्रिवरुण |
वायव्य - श्रीकेतू . श्री कुबेर |
उत्तर - श्रीबुध, श्री जलदेवता |
ईशान्य - बृहस्पती , श्रीरुद्र |
वास्तूतील देवघर -
स्वयंपाक घरात ईशान्य कोन्यात असावे. ईशान्येचे देवघर मात्र बांधलेल्या ओट्यावर नसावे. ईशान्येस ओटा बंधने किंवा अन्य कोणतीही उंच किंवा वजनदार वस्तू ठेवली तर मुलांची प्रगती व कुटुंबियांचे आरोग्य यात प्रतिकूलता निर्माण होत असते.
प्रथमतः कुटुंब प्रमुख किंवा ज्याच्या वावाने वास्तू असेल त्यांच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहाची स्थिती पाहूनच देओघर बनविणे डोळसपणाचे ठरेल , उदाहरण - मनुष्याचे आरोग्य सुस्थितीत राहण्यासाठी जशी रोग प्रतिकारक शक्ति महत्वाची असते त्या नुसारच वास्तूचे सोख्य लाभण्यासाठी सुयोग्य देवघर अत्यंत महत्वाचे असते.
कुंडलीत सर्वग्रहापेक्षा सुर्य बलवान असेल तर देवदार चे देवघर बनवून घ्यावे, चंद्र बलवान असता म्हॆसुर चंदनाचे बनवावे, मंगल बलवान असता सागवानाचे देवघर बनवावे, बुध बलवान असता हिरव्या ग्रेनाईटचे बनवावे, गुरु बलवान असता देवदारचे देवघर बनवावे, शुक्र बलवान असता संगमरवर (मार्बल) शुभ्र पांढरे देवघर बनवावे, शनि बलवान असता शिसमचे देवघर बनवावे, देवघर कोणतेही असो पण त्यावर शिखर ( कळस ) नसावे, ग्रेनाईट, मार्बल हे देवघर पक्के बांधून करू नये, तर उचलाउ (रेडीमेड ) असावे.
देवघरातील मूर्ती -
श्रीगणेश . श्रीदुर्गा , श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती , श्री लक्ष्मीनारायण , श्री राधाकृष्ण, श्री शिव-नंदी, श्री बाळकृष्ण , श्री सद्गुरुपादुका, श्री दत्तात्रेय, श्री हनुमान, यासर्व किंवा यापैकी मूर्ती, सवत्सधेनुमुर्ती, अष्टधातू, श्री यंत्र, श्री नवनाथ यंत्र, श्री नवग्रह यंत्र , श्री वास्तूदोषनाशक यंत्र, हि यंत्रे असावीत , तसेच - दक्षिणावर्तिशंख, वाजणारा शंख, कर्णमधुर नादयुक्त घंटा हे सर्व असावे. गोघृत नंदादीप, तिलतैलदिप , धुपारती, कर्पुरारती व देवपूजेसाठी चांदी किंवा तांब्याची ताम्हणे, पळी , पंचपात्रे, हळद-कुंकू-भस्म-अक्षता याकरिता पंचपाळे, सुगंधीपांढरे चंदनखोड, रक्तचंदनखोड व कुरुंदी सहाण हे सर्व देवघराजवळच ठेवता येईल अशी व्यवस्था असावी.
कुटुंब प्रमुखाच्याच कुंडलीतील ( वरीलप्रमाणे ) बलवान ग्रहानुसार मूर्ती असाव्यात सुर्य , मंगल बलवान असता तांब्याच्या मूर्ती, चंद्र बलवान असता चांदीच्या मूर्ती , बुध बलवान असता - पारद मूर्ती , गुरु बलवान असता - पितळी मूर्ती, शुक्र बलवान असता - स्पटिक मूर्ती, शनि बलवान असता - स्पटिक मूर्ती, याप्रमाणे होईल तर अनुभूती व सर्वार्थाने संपूर्ण अनुकुलता अनुभवास येणे निश्चितच असते.
कासव कोणत्याही स्वयंभू ऐतिहासिक मंदिरात कासवाची स्थापना केलेली दिसून येतेच, त्याचे कारण श्री विष्णूच्या दशावतारातील एक अवतार म्हणजे कूर्मावतार होय, अर्थात कासव हे धन समृद्धीचे कारक म्हणून हजारो वर्षापूर्वीच सिद्ध झालेले आहे. आजहि आपण प्रत्यक्षात पाहतो कि ज्या मंदिरात कुर्म स्थापना असते त्या मंदिरास देणगी स्वरूपातून अमाप धन रोजच येत असते, धन समृद्धी असेल तरच भौतिक जीवन सुद्धा समृद्ध असेल हे सांगावे लागणार नाही, हे कासव देवघरात देव्हाऱ्यात अगदी पुढच्या बाजूस पाण्यात ठेवणे आवशक असते कारण पाणी हे चंद्राचे प्रतिक असून चंद्र ग्रह हा वाहन , वास्तू माता , आपले सर्वच नातेसंबंध व आपल्या मनाचा कारक ग्रह आहे. कासव ( संथगती ) हा प्राणी प्रामुख्याने जलचर असून सुद्धा उभयचर ( पाण्यात सुद्धा, पृथ्वीवर सुद्धा जगुशकतो) असल्याचे दिसून येते,हा प्राणी श्री शनि ग्रहाचे प्रतिक असून शनि हा लक्ष्मी पुत्र आहे व आपल्या देहाचा ( शरीराचा ) कारक आहे. म्हणून शरीर व मन हे निरंतर एकत्र असतील तरच खरे मनुष्य जीवन होय, नाही तर शरीर हे जप - तप-पूजा पाठ करीत राहील अन त्याचवेळी मन मात्र नको ते उपद्वयाप करीत बाहेर बाहेरच भटकत राहील आणि मग ती कसली देवपूजा ? कसले जप-तप म्हणावे ?
सारांश - कासव स्थापनेमुळे आर्थिक व पुरेपूर कौटुंबिक सुख मिळणे दिवसेंदिवस सुलभ होत जाते.
कुंडलीत चंद्र शुभस्थितित असेल तर मोठ्यात मोठ्या दक्षिणावर्ति (उजवा) शंख देव्हाऱ्यात सतत पाण्याने भरून ठेवावा, रोज देवपुजेपुर्वी शंखातील पाणी (तीर्थ) आदरपूर्वक एखाद्या पात्रात काढून ठेवावे, व देवपूजेसाठी त्या शंखात कापूरमिश्रित पूजेकरिता पाणी भरावे व शंखाने ( फक्त सुर्य सोडून ) सर्वच देवांना जलाभिषेक करावा, धूप-दीप- नेंवेद्य हे सर्व कांही देव यथास्थानी स्थापन करून समर्पित करावे, शंखात परत दुसरे कर्पूर मिश्रित पाणी भरून यथास्थानी आडणीवर शंख स्थापन करून त्यावर तुलसीदल व जाई जुई मोगरा यापैकी सुगंधी पांढरी फुले वाहून शंखासह सर्वच देवांना साष्टांग नमस्कार घालून ज्ञात वा अज्ञात पणे घडलेल्या अपराधाबद्दल क्षमा मागावी. पूजेपूर्वीच (कालचे) शंखातील काढून ठेवलेले तीर्थ घरातील सर्वच लहान वा मोठ्यांनी श्रद्धेने घ्यावे, हेच प्रामाणिक गंगाजल, गंगोदक, गंगेचे तीर्थ , व मनः शांतीचे अमोघ व अमृतौषध होय, हे रोज घेतल्याने त्या कुटुंबात कसलाच आजार कदापि प्रवेश करूच शकणार नाही.
हे सविस्तर पण थोडक्याच शब्दात यामुळे सांगितले आहे - " जैसा करम वैसा जनम " हे संत कबीरदासांचे अमृत वाचन होय.या दक्षिणावर्ति शंखासच श्री लक्ष्मी शंख म्हणतात, हे तर समृद्धीचे अचूक साधन होय.
आता वास्तूतील फोटो व इतर शोभेच्या वस्तुसंदर्भात थोडेसे पाहू.
कोणत्याही देवी-देवतांचे फोटो हे दक्षिण भिंतीवर लाऊ नयेत, आणि मृत व्यक्तीचे- पूर्वज इत्यादी फोटो दक्षिण भिंतीशिवाय अन्यत्र लाऊ नयेत ( खरे तर मृत व्यक्तींचे फोटो न लावणे हितकारक होय ) श्री दुर्गामातेचे फोटो फक्त पूर्व भिंतीशिवाय अन्यत्र लाऊ नयेत, श्री महाकालीचे फोटो फक्त उत्तर भिंतीवरच लावावेत, श्री हनुमानाचे फोटो उत्तर व पश्चिम भिंतीवरच लावावेत. या शिवाय इतर देवी- देवतांचे फोटो दक्षिण भिंतीशिवाय इतरत्र कोठेही लावण्यास हरकत नाही. नदी, सरोवर, समुद्र इ. जलाशयासह असणाऱ्या देवांचे फोटो फक्त उत्तर आणि पूर्व भिंतीवरच लावावेत.
शोभेच्या प्रतीकात्मक वस्तु प्रकारात पशु, पक्षी, ताजमहाल, फिल्मी नट नट्या हे वास्तूत ठेवल्याने वास्तूची शुभफले नाहीशी होऊन शास्त्रशुद्ध बांधलेली वास्तुसुद्धा अशुभ फले देऊ लागते. म्हणून असे अनुचित काहीही छंद घेऊ नयेत, श्रीकृष्ण व अर्जुन यांचा रणांगणातील महाभारत कालीन फोटो किंवा प्रतीकात्मक मूर्ती, रामायण ग्रंथ, पांडवप्रताप, महाभारत ग्रंथ हे घरात ठेऊ नयेत, आणूच नयेत. रोज प्रातः काली - व्यंकटेश सुप्रभातम, श्री विष्णू सहस्त्रनाम , श्री देवी स्तोत्रे, श्रीसूक्त , लक्ष्मी सुक्त, श्री शिवतांडव स्तोत्र इ. संस्कृत वेद मंत्र यांच्या सीडी जरूर लावाव्यात म्हणजे या वेदमंत्रध्वनी लहरी संपूर्ण वास्तुमधील नकारात्मक ( प्रतिकूल- अनिष्टकारक ) उर्जा तत्काळ बाहेर काढून टाकतात. वास्तूतील रोजच्या दिवसाचा श्री गणेशा अत्यंत महत्वाचा असतो, म्हणून प्रातः कालीच टी.व्ही. वरील बातम्या ( चहाड्या ) वेगेरेंना महत्व देणे खचितच गेंर ठरणार म्हणणे चुकीचे नव्हे. कौटुंबिक मालिकेच्या नावाखाली रडक्या, द्वेष भावनेने, कपटबुद्धीने सजविलेल्या मालिका किंवा सुनेने सासरच्यांना कोर्टात खेचणे, अटक करविणे, अशा स्वरूपाच्या भारतीय संस्कृतीला कलंकित करणाऱ्या मालिका, हत्या, दरोडे, अपहरण , भुताटकी , फसवणूक , प्रधान मालिकांची सध्या सुगी जरी असली, तरी आपल्याला मात्र त्याच्याशी काही देणे घेणे तर मुळीच नाही, म्हणून ( पुढे जे जे होणार बुद्धीसुचे तदनुसार ) अशा त्याज्य गोष्टींचा मनातून त्याग करणे हीच सुज्ञता ठरणार.
आता स्वयंपाक घरासाठी उचित काय ते पाहू.
स्वयंपाक गृह हे एकून वास्तूच्या आग्नेय कोणासच असावे. कोपऱ्यातच वर छतालगत एक छोटासा नारंगी किवा लाल बल्ब सतत चालू ठेवावा, किचन ओट्यावर नेहमीसाठी थोडे सुद्धा पाणी ठेऊ नये. किचन ओट्यावरच आग्नेय कोनात एक छोटासा सेल्फ लावून त्यात सर्व प्रकारचा सुखामेवा वेग वेगळा काचेच्या बरण्यात भरून नेहमीसाठी ठेवणे अत्यंत शुभप्रद असते, याच सेल्फलगत तसाच सेल्फ दक्षिण भिंतीवर लावून त्यात काचेच्याच बरण्यात सुंठ, मिरी, लवंग, वेलची , तेजपान , दगडफूल, राम्पात्री किवा जायपत्री , दालचिनी , जायफळ , हळदकोंभ , जिरे , शाहजीरे , ओवा , बडीसोप हे सर्व (साबूत ) भरून ठेवणे म्हणजे अत्यंत लाभदायक अनुभवास येणारे होय.
स्वयंपाक गृहातच दक्षिण भिंतीस - डाळी, गव्हाचे पीठ, तांदूळ इ. ( स्वयंपाकाचे साहित्य साठा ) लावणे अत्यंत शुभ असते. लाकडी कपाटे पूर्व भिंतीस व लोखंडी कपाटे पश्चिम भिंतीस , फ्रीज पश्चिम भिंतीस ठेवणे शुभ, पूर्ण कुटुंबियांचे जेवण (शक्यतो एकत्रच) स्वयंपाक घरातच होणे शुभ असते. पिण्याचे पाणी उत्तरेस असावे, गोडे तेल व तूप हे एकाच ठिकाणी ठेऊ नयेत. आठवड्यातून एक दिवस तरी स्वयंपाक गृहातील फारशी थोडे मीठ मिश्रित पाण्याने पुसून घेणे हे प्रतिकूलता नाशक असते. वाशिंग मशीन वास्तूच्या उत्तर भागात ठेवावी, पाण्याचा भरपूर साठा उत्तरेस ( जमिनीतील हौद व टाकी ) असावा. स्नानगृह व शौचालय हे उत्तरेस मध्यभागी असणे शुभ, ईशान्य कोण पूर्ण मोकळा किवा बोअरवेल घेतल्यास शुभ होय. तुलसी वृंदावन एकूण वास्तूच्या उत्तर भागातच शुभ होय. वास्तूच्या पश्चिम भिंतीवर भव्य मोठा एक धनुर्धारी रामचंद्रांचा फोटो अवश्य लावावा. आता चक्की , मिक्सर या सारख्या उपकरणांना पश्चिम दिशा शुभ होय. बाथरूम मध्ये माळ्यावर काचेच्या मोठ्या कुंड्यात खडे मीठ नेहमीसाठी ठेवावे.
आता शयनकक्ष ( बेडरूम ) या संदर्भात थोडे पाहू.
कुटुंब प्रमुखांचे शयन कक्ष एकून वास्तूच्या नेऋउत्य कोनात असावे, शयन कक्षात एक मीटर पेक्षा अभिक पाणी ठेऊ नये, जलाशयाचे पोस्टर चित्रे कदापि लाऊ नयेत, पश्चिम व दक्षिण भिंतीवर फक्त पहाड पर्वतांचे पोस्टर लावणे अत्यंत शुभ होय. बदकांचा नर मादी जोडा असलेले चित्र शुभ असते, शयन कक्षात स्पटिक ( असली ) बॉल जास्तीत जास्त प्रमाणात ठेवणे उत्तम अविवाहित पण विवाहयोग्य मुलींचे व येणाऱ्या पाहुण्यांचे शयन कक्ष वायव्येस असावे. वृद्ध व्यक्तींचे शयन कक्ष पश्चिमेस असावे ( जागे अभावी - एकाच हॉलमध्ये सुद्धा त्या त्या दिशेस प्राधान्य द्यावे ) बोक्सदिवाण मध्ये अंथरून पांघरून या व्यतिरिक्त काही हि ठेऊ नये हा नियम सर्वांसाठीच लक्ष्यात ठेवावा.
आता इतर शेष भाग.
विद्यार्थी दशेतील मुला मुलींच्या शेक्षणिक साहित्याचे वह्या पुस्तके कपाट त्यांच्या अभ्यास कक्षात उत्तर किवा पूर्व भिंतीस असावे. अभ्यासाचे वेळी त्यांचे तोंड पूर्वेस असावे. झोपण्याच्या गादी पलंग यावर बसून अभ्यास कदापि करू नये.
कुणाच्याही सांगण्यावरून वस्तु दोष दूर करण्यासाठी म्हणून कोठेही तोड फोड मुळीच करू नये, तसे केल्याने वस्तुभंग दोष निर्माण होतो आणि हा दोष दूर करण्यासाठी उपाय मात्र एक सुद्धा नसतो म्हणून पूर्ण सावधान असावे.
बांधकामात निर्माण झालेल्या एक एक दोषास अनेकानेक प्रामाणिक उपाय आहेत व अशाच उपायाने वास्तूस पूर्ण अनुकूल करून घेता येते. वास्तूच्या मुख्य प्रवेश द्वारावर ( चोकटीच्या वरील बाजूस ) मध्यभागी आतून एक व बाहेरून एक असे दोन क्ष्वेतार्क गणपती स्थापन केल्याने वास्तू शुभ फले देवू लागते.
आता सर्वच प्रकारची वास्तूत निरंतर समृद्धी देणाऱ्या वास्तू संग्रहाविषयी पाहू.
क्ष्वेतार्क गणेश, जास्तीत जास्त असली स्पटिक शुभ प्रतीकात्मक वस्तू, श्री वास्तुदोषनिवारक यंत्र, श्री यंत्र , पिरामिड, करजोडी , काळी हळद, दक्षिणावर्तिशंख, वाजणारा शंख, कवडी , गोमती चक्रे, सिद्ध पारद, वास्तु देवता यंत्र व फोटो, विश्वकर्मा फोटो, स्वस्तिक, लघु नारळ , काळीकपर्दिका ( कवडी ) , एकीक रत्ने , लकी बांबू, इंद्रजाल वनस्पती , नवग्रह यंत्र , अष्टलक्ष्मी यंत्र , पारदशिवलिंग-नंदी, स्पटिकशिवलिंग-नंदी, विविध रुद्राक्ष, हवन योग्य समिधांचा संग्रह हे सर्व वास्तूत संपूर्ण समृद्धी कारक असतात.
उत्त्तर व पूर्व अंगणात छोटी छोटी फुल झाडे, जाई जुईवेली , हिरवळ असणे शुभकारक असते. या सिद्ध साधना प्रथम भागात फक्त साधक व्यक्तींच्या जीवनात साधने करिता अनुकुलता लाभावी या दृष्टीनेच प्रयत्न करण्यात आलेला आहे. म्हणून वास्तु ( इमारत ) विषयक माहितीस प्राधान्य दिले नसून अंतर रचणेलाच प्रामुख्याने महत्व दिले असून या प्रकरणास स्वस्थ चित्ताने समजून घेऊन सुधारणा करत राहिल्यास वास्तु असेल तशीच सुद्धा शुभ फले देत राहील हे तर अनुभवानेच पटण्यासारखे आहे. वास्तूत वारंवार हवन होत राहील तर वेगळी कसलीच धावपळ करण्याची वेळच येत नसते, हवन हि एक अत्यंत त्वरित फलदाईनी पूजा असून या संधर्भात अचूक जान हि तेवढीच अनिवार्य आहे. अन्यथा याचे त्वरितच परिणाम भोगणे भाग पडते , म्हणून जिज्ञासू साधकांनी हवन विज्ञान ( अचूक पद्धती) प्रथमतः समजून घेणे सुज्ञतेचे लक्षण होय. या ग्रंथात साधनेच्या प्रारंभिक माहितीलाच महत्व देणे इष्ट ठरेल म्हणून हवन पद्धती यामध्ये देणे उचित मुळीच ठरणार नाही.
देव्हार्यात एकाच देवतेच्या दोन दोन तिन तिन मूर्ती नसाव्यात, फोटो सुद्धा डबल नसावेत, घरातील देव्हार्यामध्ये मृत व्यक्तींचा फोटो ठेवू नये. देव्हारा हा शक्यतो पूर्व भिंतीला असावा म्हणजे पूजा करताना आपले तोंड हे पूर्वेला येईल ,
देव्हारा नियमित पणे स्वच्छ करावा , देव हे वस्रावर असावेत , आपल्या घरी देव्हाऱ्यात कुलदेवतेची मूर्ती ,
प्रतिमा असावीच असावी . सर्वात मागे मध्यभागी कुलदेवता प्रतिमा आणि त्या समोर मध्यभागी गणपती
व गणपतीच्या डाव्या बाजूस देवी मूर्ती म्हणजे लक्ष्मी / अन्नपूर्णा / दुर्गा इत्यादी आणि
उजव्या बाजूस देव मूर्ती म्हणजे बाळकृष्ण इत्यादी…
देवघरात शंख असावा , पण तो छोटा पूजेचा शंख असावा , वाजविण्याचा मोठा शंख देव्हाऱ्यात ठेऊ नये , बाजूला ठेवावा .
देवाच्या डाव्या म्हणजे आपल्या उजव्या बाजूला शंख असावा आणि देवाच्या उजव्या म्हणजे आपल्या डाव्या बाजूस घंटी असावी ..
पूजेचे साहित्य —
अक्षता, हळद, कुंकू, गंध, फुले, तुळशी, दूर्व, बेल, उदबत्ती, निरांजन, कापूर,वस्त्र,फळं,नारळ, विडा, नैवेद्य व पंचामृत (दूध, दही, तूप, मध आणि साखर, मध नसेल तर थोडा गूळ)
वापरती भांडी –
तांब्या, भांडे,(पंचपात्र),पळी ताम्हण, अभिषेकपात्र,निरांजन, समई ( विषेश प्रसंगी ) घंटा.
पूजेचे साहित्य कसे असावे ?
सर्व पूजेची भांडी तांब्या , पितळेची – शक्य तर चांदीची असावी. स्टेनलेस स्टीलची अथवा प्लॅस्टिकची नसावी.
गंध –
चंदनाचे उगाळतात. त्यात कधी केशर घालतात. करंगळी जवळच्या बोटाने (अनामिकेने) देवाला गंध लावावे.
सहाणेवर गंध उगाळून तो प्रथम दुसऱ्या तबकडीत घेऊन गंध लावावा . देवासाठी गंध हातावर उगाळू नये .
अक्षता –
धुतलेल्या अखंड तांदुळांना थोडेसेच कुंकु लावून त्या अक्षता वाहाव्या.
शाळिग्राम आणि शंख यांना अक्षता वाहू नयेत.
शंख नेहमी पाण्याने भरून ठेवावा , दुसऱ्या दिवशी ते पाणी कृष्णावर / देवांवर स्नान म्हणून अर्पण करावे .
हळद – कुंकू याखेरीज गुलाल आणि बुक्काही (काळा/ पांढरा अबीर ) पूजा साहित्यात असावा.
गणपतीला शेंदूर, विठ्ठलाला बुक्का (काळा अबीर ) वाहण्याची वहिवाट आहे.
फुले –
ऋतुकालोद्भभव पुष्पे म्हणजे त्या त्या ऋतूत येणारी ताजी आणि सुवासिक फुले देवाला वाहावी.
जाई, जूई, कण्हेर, मोगरा, जास्वंदी चाफा, कमळे, पारिजातक, बकुळ, तर वगैरे फुले सर्व देवांना चालतात.
विष्णुला – चाफा, मोगरा, जाई, कुंद वगैरे फुले आवडतात.
शंकराला – पांढरा कण्हेर, कुंद, धोतरा इ. पांढरी फुले वाहतात.
गणपतीला – गुलाब, जास्वंद वगैरे तांबडी फुले प्रिय असतात. गणपतीला दूर्वा वाहातात. गणपतीला तुळस वाहण्याची प्रथा नाही.
गणपतीला रक्तचंदनाचे गंध आणि शेंदूर प्रिय असतो.
देवीला सर्व सुवासिक फुले चालतात.
पाने –
विष्णु, विठ्ठल, शाळिग्राम या देवतांना तुळस, शंकराला बेल तर गणपतीला दूर्वा वाहातात.
धूप –
देवाला उदबत्ती ओवाळून तिचा धूप देवावर दरवळेल अशी ठेवावी. सुगंध दरवळावा.
अगरबत्ती देव्हाऱ्याच्या आत मध्ये ठेवू नये , बाहेर बाजूला ठेवावी .
दिप –
निरांजन ओवाळून ते देवाच्या उजव्या बाजूस ठेवावे. देवाजवळील समईंची ज्योत दक्षिणेकडे करू नये.
समईत एक दोन पाच सात अशा ज्योती (वाती) असाव्या. तीन नसाव्या.
देवाच्या उजव्या म्हणजे आपल्या डाव्या बाजूस तुपाचा दिवा असावा आणि
देवाच्या डाव्या म्हणजे आपल्या उजव्या बाजूस तेलाचा दिवा असावा .
वाती या जोड वाती असाव्यात म्हा जे दोन वाती एकत्र करून केलेली एक वात ..
नैवैद्य –
रोजच्या पूजेत देवाना पंचामृताचा नैवैद्य दाखवितात.
दूध, पेढे, फळे आणि पक्वाने नैवेद्यात सर्व देवांना चालतात.
विशेष प्रसंगी गणपतीला मोदक किंवा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य,
देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवितात.
फळे –
देवाला कच्ची फळें वाहू नयेत.
पक्व फळाचे देठ देवाकडे करून ठेवावीत.
तांबूल –
म्हणजे विड्यांची पाने आणि त्यावर सुपारी खारीक खोबरे बदाम इत्यादी ठेवावे.
पानाचे देठ देवाकडे करावेत. विड्यावर यथाशक्ती दक्षिणा ठेवावी.
तसेच ड्रायफ्रुट्स सुद्धा असल्यास उत्तम .
नमस्कार –
दोन्ही हात जोडून देवाला नमस्कार करावा. साष्टांग नमस्कार घालावा.
आरती –
देवाला आरती ओवाळताना देवावर प्रकाश पडेल अशी ओवाळावी.
आवाज सौम्य असावा , किंचाळू नये. आर्ततेने म्हंटली जाते ती आरती हे लक्षात घ्यावे .
प्रदक्षिणा –
देवाला प्रदक्षिणा घालावी. अथवा स्वतःभोवती प्रदक्षिणा घालावी.
गणपतीला एक, सूर्याला दोन , शंकराला तीन, विष्णूल चार, पिंपळाला सात,
आणि मारुतीला अकरा अशा प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे.
हात जोडून आणि तोंडाने नामघोष करीत प्रदक्षिणा घालव्यात.
किंवा सर्वाना समान तीन किंवा पाच प्रदक्षिणा कराव्यात ..
प्रार्थना –
देवाला नमस्कार करून भक्तिभावाने प्रार्थना करावी. प्रार्थना आणि सर्व पूजा
एकाग्र चित्ताने शांतपणे मनःपूर्वक करावी. देवाजवळ व्यावहारिक गोष्टी मागू नयेत
किंवा त्याला सांकडे , नवस घालू नये. फक्त त्याची कृपा मागावी.
देवाच्या कृपेनेच सर्व गोष्टी यशस्वी होतात.
देवपूजेचे महत्त्व —
प्रत्येक माणासाला जीवनात सुख समाधान आणि शांती प्राप्त व्हावी म्हणून देवपूजा हे एक उत्तम साधन आहे.
हल्लीच्या संघर्षमय व तणावपुर्ण जीवनात आणि आपल्या दैनंदिन कार्यक्रमात देवपूजेसाठी
आपणाला जास्त वेळ मिळत नाही. तरीही वेळात वेळ काढून देवपूजा करणे आवश्यक आहे.
यथाशक्ती, यथाज्ञानाने व मिळतील त्या उपचारांनी मनोभावे देवपूजा केली तर मनाला शांती मिळते,
घरातील वातावरण पवित्र व प्रसन्न होते, आणि आपापली कामे करायला उत्साह मिळतो.
देवपूजा करणाऱ्यांना एक प्रकारचे विशेष सामर्थ्य येत असते, वाणीला तेज चढते,
अंगीकृत कार्याला यश येते आणि इतरांचाही उत्साह वाढतो , आनंद होतो.
देवपूजेमुळे शारीरिक, मानसिक आणि आचरणातील दोष दूर होतात.
आत्मिक बळ वाढते. आत्मा हाच खरा परमात्मा आहे.
तो संतुष्ट असला तरच जीवनाचे सार्थक होते.
आपल्य कुटुंबास देवघरातील देवांची पूजा एकजणच करतो.
बाकीचे कुटूंबीय स्नानानंतर देवाला फुले, अक्षता वाहून देवाला
नमस्कार करतात. आपल्या नित्यक्रमातुन थोडासा वेळ काढून
पूजेनंतर जप करावा. पोथी वाचावी. गीतेचा अध्याय, गुरुचरित्र,
गजानन विजय यासारख्या आपल्या आराध्य देवतेची कथा,
पोथी यांचे वाचन करावे. जेवढे शक्य असेल तेवढे करावे …
अधिकस्य अधीकम् फलम् .. असे म्हटलेच आहे.
अशा प्रकारे जप, पोथी-वाचन, देवदर्शन आणि व्रते, पूजा, स्तोत्रे,
प्रार्थना वगैरे उपानसनेचे प्रकार आहेत.
त्यांच्यामुळे मन प्रसन्न होऊन मनोरथ पूर्ण होतात.
देवपुजा करण्याचे प्रकार —
१ मानसपूजा
२ मुर्तीपूजा
मुर्तीपुजा करताना म्हणजे नेहमी प्रमाणे पूजा करताना
देवाची मुर्ती किंवा प्रतीमा किंवा सुपारी , नारळ किंवा टाक ह्यांची पूजा केली जाते.
ही पूजा करताना दोन प्रकारे करतात
१ पंचोपचार पूजा
व
२ षोडशोपचार पूजा
१ पंचोपचारी पूजा Panchopchari Puja –
यामध्ये पुढील उपचारांनी देवाची पूजा केली जाते :
(१) गंध (२) पुष्प (३) धूप (४) दीप (५) नैवेद्य
२ षोडशोपचार पूजा ShodShopchari Puja –
यामध्ये पुढील उपचारांनी देवाची पूजा केली जाते :
(१) आवाहन (२) आसन (३) पाद्य (४) अर्ध्य (५) आचमन
(६) स्नान (७) वस्त्र अथवा यज्ञोपवीत (८) गंध (९) पुष्प
(१०) धूप (११) दीप (१२) नैवेद्य (१३) फल (१४) तांबूल
(१५) दक्षिणा (१६) प्रदक्षिणा .
देवाला वरील सर्व उपचार करताना विशिष्ट मंत्र स्तोत्र येत असल्यास उत्तम ,
नसेल येत तर निदान त्या त्या देवतेचे नाम मंत्र तरी म्हणावे .
अभिषेक करताना त्या त्या देवतेचे स्तोत्र , मंत्र म्हणावेत .
उदा .- गणपती पूजा करताना गणेश स्तोत्र किंवा गणेश मंत्र ,
विष्णू पूजा करताना विष्णू स्तोत्र / व्यंकटेश स्तोत्र /
विष्णू सहस्त्र नाम स्तोत्र इत्यादी इत्यादी ..
आणि मानसपूजा हि सश्रद्ध अंतःकरणाने / मनाने करायची असते ..
वरील सर्व साहित्य व उपचार हे मनानेच देवाला अर्पण करायचे असते .
मानासपूजेमध्ये एकाग्रचित्त अंतःकरण आणि सश्रद्ध भाव असणे जरूरी आहे .
मानसपूजा हिच श्रेष्ठ सांगितली गेली आहे ..
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"