Tuesday, March 19, 2019

!!! कधीतरी सदगुरुंजवळ नुसते बसावे !!!

!!! कधीतरी सदगुरुंजवळ नुसते बसावे !!!

असे वाटते
देवघरातल्या
सदगुरुंच्या तसबिरीला पहावे
व कधीतरी सदगुरुंजवळ
नुसते बसावे

मुलगी जशी दिवसभरातून
थोडा वेळ आईजवळ बसते
दिवसभराचा थकवा
आई नुसत्या प्रेमळ नजरेने घालवते
तसे या गुरूमाऊलीचे प्रेम
हृदयात साठवावे
कधीतरी सदगुरुंजवळ
नुसते बसावे

काही मागू नये
काही सांगू नये
सारे संभाषण
नुसत्या नजरेतून व्हावे
कधीतरी सदगुरुंजवळ
नुसते बसावे

आपल्या गुरूमाऊलींकडून डोक्यावरून
पाठीवरून हात फिरवून घ्यावे
मनाला विलक्षण शांती देणार्‍या स्पर्शाला अनुभवावे
कधीतरी सदगुरुंजवळ
नुसते बसावे

शांतपणे
सदगुरुंकडे पहात रहावे
या सगुणरूपी चैतन्यातील
आनंद व समाधान अनुभवावे
कधीतरी सदगुरुंजवळ
नुसते बसावे

सदगुरुंजवळ बसून
नामस्मरण करावे
अद्वैताचा अनुभव घेऊन
त्यात विलीन होऊन जावे
आपोआपच आपल्या "मी" चे
विसर्जन व्हावे
कधीतरी सदगुरुंजवळ
नुसते बसावे

त्यांच्याजवळ
नुसत्या बसण्याने काय मिळते
हे ज्याचे त्यानेच अनुभवावे
दररोज थोडा वेळ तरी
आपल्या सदगुरुंजवळ बसावे!               🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"