*श्री कुरवपूर* अग्रहार ६०० वर्षांपूर्वी कसे होते सांगणे कठीण', काही सांगितले तरी असे असले तसे असेल म्हणून सांगायचे ना ? अग्रहार अवशेष झाल्यानंतर सुद्धा आता असलेला श्रीपाद स्वामींचा मठ दोनच खोल्यांचा होता या दोन्ही खोल्यांना प्रदक्षिणा घालण्यासाठी एक उंच कट्टा होता तो आताही आहेत पुढच्या खोलीला उत्तराभिमुख दार आहे आणि यातील खोलीला पूर्वाभिमुख दार आहेत या खोल्या मोठ्या एक एक अंकांच्या आहेत गर्भाच्या खाली तळघर आहे असे म्हणतात तेथे जाण्यासाठी पायऱ्या आता गर्भाच्या चौकटच्या उजव्या बाजूला जो कट्टा आहे त्याच्या होत्या असे म्हणतात . आता तेथे संगमरवरी दगडाच्या फरशा सगळीकडे बसवलेल्या आहेत. आणि कट्ट्यावर वेदमूर्ती" केशव भट्ट पुजारी" यांनी एक सुंदर संगमरवरी दगडात कोरलेली गणपती मूर्तीचीप्रतिष्ठापना केली आहे . गणपतीच्या उजव्या बाजूला स्वामींची उत्सव मूर्ती ठेवलेली आहे .उत्तरेकडील दरवाजाच्या समोरील भिंतीला लागून या मूर्ती आहेत आतल्या खोलीत सुद्धा संगमरवरी दगडाची फरशी करून पीठा भवती त्याच पांढऱ्या दगडांनी एक अरुंद लहान कट्टा बांधला आहे दिसायला हे फार सुंदर दिसते यांच्यामध्ये सोमसूत्री आकाराची शिळा आहे तिच्यामध्ये पीठासारखे एकावर एक अशा दोन पट्ट्या या सोम सूत्रातच उठवल्या आहेत चौरस एक वीतभर लांबीचा आहे. तो दिसायला एकनाथ संप्रदायांच्या समाधी प्रमाणे दिसतो. ते चित्र पाहा हेच स्मारक यांच्यावर कोणतेही चिन्हे नाहीत अक्षरेही नाहीत म्हणून त्याला निर्गुण पीठ म्हणतात पूजा अर्चा प्रार्थना आदी या पीठाला चालतात हे चिन्हच येथील देवत. हे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे प्रतीक या खोलीत दहा बारा जण बसून रुद्राभिषेक करू शकतील एवढी जागा आहे या गर्भावर चालुक्य पद्धतीचे शिखर आहे पुढच्या खोलीला आता उत्सवमूर्तीचे मंदिर म्हणतात. श्रीपाद स्वामींचा एक अलंकृत मुखवटा येथे नेहमी आसनावर ठेवलेला असतो हे मंदिर श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या काळचा मठच असावा .ते तेथेच राहत असावेत यापेक्षा जास्त माहिती मिळत नाही .आता पन्नास( ५०) वर्षांपूर्वी सभोवती फक्त मैदान होते मागच्या बाजूस पुजाऱ्यांची दोन घरं होती पुढे रायपूरचे दिवंगत धामापूरचे देसाई शंकरराव यांनी दोन्ही खोल्यांना लागून उत्तरेस दहा आकाराचा सभामंडप बांधला आहे. या मंडपात पूर्वाभिमुख एक व्यासपीठ बांधले आहे. पुराणिक आणि प्रवचनकार येथे असतात .व्यासपीठ आणि कासव शुभ्र संगमरवरी दगडांनी झालेले आहे . सभामंडप नसताना प्रदक्षिणेच्या वाटेवर पायऱ्या सहित कट्टे तसेच राखले आहेत कट्ट्यावर असलेल्या वाटेवर खिडकी लावून प्रदक्षिणेचा मार्ग बंद केला आहे. खोल्यांच्या भाेवती उंच कट्टा होता तसाच आहे आता सगळे लोक खालून अश्वत्थ कट्ट्याचा उपयोग करून प्रदक्षिणा घालतात . "श्रीपाद राज शरणं प्रपद्ये" ॥ श्री गुरुदेव दत्त ॥
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"