Tuesday, March 19, 2019

मृत्यूपश्चात दिवसांचे स्मशानविधी केले की संपले ?

श्री. शरद उपाध्ये यांची फेसबुक पोस्ट...

मृत्यूपश्चात दिवसांचे स्मशानविधी केले की संपले अशी अनेकांची समजूत असते ती योग्य नाही.तज्ञ ज्योतिषी जेंव्हा
जातकाच्या समस्येच्या मुळाशी जातो तेंव्हा त्याला, कुलदेवतेच्या दर्शनाला न जाणे, पितरांचे श्राध्दविधी न करणे, बोललेले नवस न फेडणे, घरांतील देव पूजा न करता पारोसे ठेवणे अशी अनेक कारणे सापडतात.कुंडली तपासणे म्हणजे नुसते ग्रहबदल आणि दशाबदल पाहून भविष्य वर्तवणे नव्हे.लग्न किंवा संतती न होण्याला वरील कारणे असू शकतात.पण काही ज्योतिषी गुरुपालट पाहून कालनिर्णय करतात व जातकाची दिशाभूल होऊन त्याचा विश्वास उडतो.मूळ कारण तपासून त्यांचा उपाय केला पाहीजे.ब-याच जणांचा श्राध्दविधींवर विश्वास नसतो त्यांनी श्रीगुरुचरित्रांतील 36 वा अध्याय अभ्यासावा.श्रीदशरथराजांचे श्राध्द चालू असताना भोजनाला आलेल्या ऋषींच्या ठिकाणी सीतामाईंना त्यांचे दर्शन झाल्याचा उल्लेख आहे.अहंकारी ब्राह्मणांनी श्राध्दावर बहिष्कार टाकल्यावर एकनाथ महाराजांनी प्रत्यक्ष पितरांनाच भोजनाला आवाहन केले होते.आपल्या दक्षिण दिशेला पितृलोक असून त्याची प्रमुख देवता *अर्यमा* आहे.पितृतिथीला तसेच सर्वपितरी अमावस्येला तज्ञ गुरुजींनी शास्त्रोक्त आवाहन करून पितरांना भोजनाला बोलवायचे असते.ते पीतर श्राध्दाच्या ब्राह्मणांच्या माध्यमामधून भोजन स्वीकारत असतात ही नुसती समजूत नाही तर अनेकांचा अनुभव आहे.आपले घर सोडून परलोकी जाताना जीवात्म्याची ओढ घराकडे आणि अतृप्त वासना मनामध्ये असतातच.म्हणून मृत्युतिथीला तसेच सर्वपितरी अमावस्येला त्यांचे आपल्या घरात आगमन होत असते.भाद्रपद महिन्यात तर प्रतिपदेपासून अमावस्येपर्य॔त पंधरवडाभर त्यांना पृथ्वीतलावर येण्याची मुभा असतेच.*पुत्र* या शब्दाचा अर्थच 'पुं' नावाच्या नरकापासून तारतो तो पुत्र असा आहे.म्हणून पुत्राला गुरुजी विचारतात की तुमच्या वडीलांना कुठला पदार्थ आवडायचा तो श्राध्दान्नात बनवा.त्यांच्या वासना तृप्त करणे हा हेतू असतो.सर्वपितरीअमावस्येला तर पितरांची यादीच बनवून ठेवावी.गेलेल्या सर्व नातेवाईकांचे शास्त्रोक्त पिंडदान करतात.पितरांची संतुष्टता खूप समाधान देते.अडचणी नाहीशा होतात.म्हणून कुळाचार आणि पितृश्राध्द यांचा कधीही कंटाळा करू नये.बहुतेक धर्मांत मृत्युपश्चातल्या जगाचे वर्णन व गेलेल्या माणसांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्याची पध्दत आहे.आपले ऋषी-मुनी फार अभ्यासू विद्वान होते.अगदी विश्वास नसला तरी वर्षातला एक दिवस पितरांची सेवा करावीच.त्या दिवशी वडीलांचा फोटो बाहेर काढून पुसून त्यांच्या कपाळाला गंथ आणि तुळशीचे पान लावावे.जमल्यास तुळशीचा हार घालावा.एरवी मृत व्यक्तीचा फोटो भिंतीवर दर्शलानीभागी लावत नाहीत.  आतमध्ये आपल्यापुरता लावायचा असेल तर त्या फोटोला चंदनाचा हार घालावा.मित्रमैत्रिणींनो, आपण एवढे प्रसंग साजरे करतो.अफाट खर्च करतो.पितरांसाठीही एक दिवस काढावा.वर्षा-दोन वर्षांतून कुलदेवता आणि कुलस्वामिनीचे
दर्शन करावे.खूप समस्या नाहीशा होतात.फकत शांत्या करणे किंवा कालसर्प करून मूळ समस्या तशाच राहतात.कुंडली सखोल अभ्यासली की *अपायां*वर *उपाय* ही बरोबर सांगता येतील.श्री गुरुदेव दत्त.स्वामी समर्थ.🙏🙏🙏

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"