Friday, March 1, 2019

कर्म सिद्धांत

*कर्म सिद्धांत*

डोळ्यांनी झाडावरचा आंबा पाहिला.  खाण्याची ईच्छा जागृत झाली.  डोळे तर फळ तोडू शकत नाहीत. म्हणून पाय गेले फळ तोडायला ! पण जवळ पोहोचूनही पाय आंबा तोडू शकले नाहीत. मग हात गेले आंबा तोडायला. हाताने आंबा तोडला ! पण हात-पाय व डोळे तो खाऊ शकले नाहीत.  आंबा खाल्ला तोंडाने,  पण तो तोंडात राहीला नाही. तो गेला पोटात. आता माळ्याने ते पाहिले आणि त्याने  दांड्याने मार दिला पाठीवर.  
पाठ म्हणाली , मला का मारता..? मी कुठे आंबा खाल्ला..?  दांड्याने मार मिळाला पण अश्रू आले डोळ्यात ! कारण पहिला दोष डोळ्यांचा होता ! डोळ्यांनी प्रथम आंबा पाहिला होता !! 

हाच आहे कर्म सिद्धांत !!!
 

*श्री गुरूदेव दत्त*

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"