Friday, March 29, 2019

तेजोवलय (Aura)

*तेजोवलय (Aura)*

ऑरा ..किंवा मराठीत ज्याला तेजोवलय हा छान शब्द आहे, 

मानवी शरीर universal life force जिला प्राणशक्ती म्हणू शकतो अश्या ऊर्जेने बनलेले आहे.  या शक्तीमुळे जिवंत राहण्यासाठी, वाढ, maintenance आणि इतर अनेक क्रियांसाठी संपूर्ण शरीरात असंख्य घडामोडी आपोआप घडत असत्तात ज्याचा आपल्याला पत्ताही नसतो. या क्रियांमुळे आपल्या शरीरा भोवती एक ऊर्जाक्षेत्र (इलेक्ट्रो- मॅग्नेटिक फील्ड) सतत तयार होत असते. आपल्या शरीरा लागत ऊर्जेचे असणारे हे वलय म्हणजेच ऑरा किंवा तेजोवलय. प्रत्येक सजीव जीवाला, मानव, प्राणी, वनसंपत्ती यांना तेजोवलय असते. Quantum physics नुसार शास्त्रज्ञानी सिद्ध केल्या प्रमाणे सगळं विश्व ऊर्जेने बनलेलं आहे, आणि त्या सिद्धांता नुसार निर्जीव वस्तूंना ही तेजोवलय असतं.

माणसाचे हृदय हे सर्वात जास्त उर्जाक्षेत्र निर्माण करत असते...आणि त्या खालोखाल मेंदू. यामुळेच तुम्ही कधी बघितलं असेल, की एखाद्या अनोळखी व्यक्तीला प्रथमच भेटता तेव्हा काही बोलणं न होताही तुम्हाला वाटतं .. हा माणूस काही चांगला वाटत नाही.किंवा ह्या उलट सुद्धा..एखाद्याबद्दल त्याच्याशी न बोलताही प्रथम दर्शनी आपले अतिशय चांगले मत तयार होते.. याचे कारण आपले आणि त्याचे हृदय चक्र (अनाहत चक्र) जी तेजोवलये बाहेर सोडत असतात ती एकमेकांना स्पर्शतात आणि सूक्ष्म पातळींवर माहितीची देवाणघेवाण करतात.. आणि आपण त्याप्रमाणे त्याच्याशी आपले वागणे बोलणे ठरवतो.
  
मानवाला मिळालेली सर्वात मोठी देणगी म्हणजे विचार करण्याची शक्ती. आपल्या मनात दिवसाला सरासरी 70000 विचार येतात.. विचार सुद्धा  ऊर्जा रुपातच उत्सर्जित होत असतात.. त्यांचा ही प्रभाव आपल्या तेजोवलयावर पडत असतो. सकारात्मक विचारांमुळे आपले तेजोवलय नेहमी स्ट्रॉंग रहातं. जर आपण सतत निराशेच्या, द्वेषाच्या किंवा रागाच्या विचारात राहात असू तर आपल्या तेजोवलायवर त्यांचा विपरीत परिणाम होतो. आपले विचार आपल्या भावनांना जन्म देतात. आणि त्यानुसार तेजोवलय बदलत राहातं. 

जर दोन्ही हात पसरून आपण उभे राहिलो तर जो अंडाकृती आकार आपल्या शरीरासभोवती तयार होईल तेवढे सर्वसाधारण निरोगी माणसाचे तेजोवलय त्याच्या शरीराबाहेर सर्व दिशांनी  पसरलेले असते. या ह्द्दीत आपली आवडती किंवा जवळची व्यक्ती आली तर आपल्याला आवडतं..पण ज्यांच्याशी आपलं फारसं पटत नाही किंवा वर सांगितल्या प्रमाणे एखाद्या अनोळखी व्यक्तीबद्दल आपले प्रथमदर्शनी चांगले मत नाही अशी व्यक्ती आली , तर आपण नकळतच 2 पावलं मागे सरकतो.. कदाचित यावरूनच Keeping someone at arm's length" किंवा "2 पावलं दूर रहा " वगैरे वाकप्रचार निघाले असावेत.

तेजोवलय जर clean आणि strong असेल तर आपल्या आरोग्यावरच नव्हे तर सम्पूर्ण  आयुष्यावरच त्याचा चांगला परिणाम होतो. तुमचं सगळं व्यक्तिमत्व दुस-यांवर प्रभाव पडणारं बनतं..आपसी संबंध चांगले रहातात.. उच्च पदा वरील व्यक्ती, अभिनेते, देशप्रमुख किंवा इतरही क्षेत्रातील अशा व्यक्ती ज्यांना नेतृत्वगुण आणि mass  influence ची सवय असते  त्यांचे तेजोवलय खूप स्ट्रॉंग असते. 

प्राचीन योग शास्त्रात देखील तेजोवलयाचं महत्व सांगितलं आहे.  आपण जर देवदेवतांची चित्र पाहिली तर त्यांच्या मस्तका भोवती गोल तेजस्वीप्रकाश दाखवलेला असतो.  ते तेजोवलय असते. उर्जा स्वरूपात असल्याने साध्या डोळ्यांना तेजोवलय बघता येत नाही. पण काही विशिष्ठ पद्धतीने नियमित अभ्यास आणि सराव केला तर ते शक्य आहे.  

तुम्ही शब्दांनी, वागण्याने आपल्या भावना किंवा intentions  लपवू शकता. पण तुमचे तेजोवलय काही ही लपवून ठेवत नाही.. तुमच्या बद्दलची सर्व माहिती तुमचं तेजोवलय देत असते. आपण पाहिले की तेजोवलय उर्जास्वरूपात असल्याने ज्यांचे आज्ञाचक्र किंवा तृतीय नेत्र विकसित झाला आहे, जसे थोर संत, योगी, किंवा अध्यात्मातील अधिकारी व्यक्ती, यांना ते सहज बघता येते. 

1939 साली सायमंड कीर्लियन या एका रशियन शास्त्रज्ञाला इतर काही संशोधन करत असता अपघातानेच अशा  एका तंत्राचा शोध लागला ज्या योगे त्याला मशिनद्वारे तेजोवलय बघता आले. त्याने त्या तेजोवलयाचे छायाचित्र (photograph) घेतले.  व तेजोवलयावर आणखी संशोधन करून Aura किंवा तेजोवलय खरोखर अस्तित्वात असते हे सिद्ध केले.  ह्या तंत्राला कीर्लियन फोटोग्राफी असे नाव पडले.  

भारतात प्राचीन काळी ऋषीमुनींना त्यांच्या यौगिक सामर्थ्याने तेजोवलयाचे सर्व ज्ञान होते व ते त्यांना सहज पहाता येत असे.  तेजोवलयाला सुद्धा विविध रंग असतात आणि त्या रंगांना अर्थ असतात, किंवा रंगांमधून आपल्याला तेजोवलयाबद्दल अधिक माहिती मिळते ह्याचे सखोल ज्ञान आपल्या अंतर्चक्षूंद्वारे त्यांना होते.  यावर अनेक पौराणिक आणि इतर ग्रंथांमध्ये माहिती उपलब्ध आहे. कीर्लियन फोटोग्राफीने घेतलेल्या तेजोवलयाच्या छायाचित्रात सुद्धा असे विविध रंग आढळून आले.  आणि अखेर आधुनिक विज्ञानाने तेजोवलयाचे अस्तित्व मान्य केले.   गुगल वर कीर्लियन फोटोग्राफी या विषयावर सर्व माहिती उपलब्ध आहे. 

तुमचे तेजोवलय ही तुमची पर्सनल सिग्नेचर म्हणता येईल. जो माणूस आंधळा आणि बहिरा आहे, तो सुद्धा त्याच्या जवळ येणाऱ्या इतर लोकांचे अस्तित्व बरोब्बर ओळखतो.. सांगू शकाल, कसे..?  कारण, देवाने दिलेल्या पंचेंद्रियांपैकी जेव्हा एखादे काम करत नाही तिथे बाकीची व इंद्रिये अतिसंवेदनशील होतात. ही लोकं इतरांचे अस्तित्व त्यांच्या तेजोवलया वरून ओळखतात.  प्रत्येक माणसाकडे तेजोवलय बघायची, ते ओळखायची, त्याचा अर्थ जाणून घ्यायची जन्मजात क्षमता आहे. फक्त ती विकसित करावी लागते. 

तेजोवलय Clean आणि Strong का ठेवावं..? कारण याचे  खूप फायदे आहेत.

1. आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम रहातं.
2. आपलं आपल्या भावनां वर नियंत्रण रहातं. व्यक्तिमत्व balanced रहातं.
3. व्यक्तिमत्व अतिशय प्रभावी होतं. नातेसंबंध.. जो आपल्या आयुष्याचा महत्वाचा भाग आहे.. ते छान रहातात.  सर्व आघाड्यां वर यशप्राप्ती होते.
4. तुमची Intuitive Power वाढते.
5. तुम्ही तुमच्या स्वतःच्या प्रकाशात रहाता. Victim होण्यापासून किंवा इतरांच्या प्रभावा पासून दूर राहता.

पहिल्या भागात बघितल्या प्रमाणे कुठल्याही interaction किंवा नातेसंबंधां मध्ये (personal, professional, social) ऊर्जेची देवाणघेवाण होत असते.   

अगदी दैनंदिन आयुष्यात बघायचं झालं तर आपण सकाळी उठून आवरून आपल्या ऑफिसला जायला निघतो.. (घरातल्या कटकटी असतील तर त्याही आल्या) जाताना रस्त्यात ट्रॅफीक मधे इतर वाहन चालकांबरोबर  वाद होतो..किंवा ट्रेन मध्ये गर्दीत उभे असताना कोणी ओळखीचा भेटतो आणि तो आपल्या अडचणींचा पाढा वाचतो.. ऑफीस मधे बॉस किंवा सहकाऱ्यांबरोबर अनबन होते..असं बऱ्याच लोकांशी आपलं interaction होत असतं..सकारात्मक संवाद असेल तर ठीक पण बऱ्याचदा नकारात्मक बोलणं होतं आणि  लोकांच्या विचारां मधली, बोलण्यातली ऊर्जा आपल्या तेजोवलयामधे येते.....आपली त्यांच्याकडे जाते. अशा प्रकारे तुम्ही जेव्हा रात्री घरी येता तेव्हा विचार करा की किती जणांची नकारात्मक ऊर्जा तुम्ही घेऊन येता. 

खालील कारणां मूळे तेजोवलय संक्रमित किंवा दूषित होऊ शकतं..

1. नकारात्मक विचार, भावना, शब्द, कृती, आपली किंवा इतरांचीही
2.भीती (Social conditioning, Beliefs)
3. Low Self Esteem, Low Self Confidence, Lack of Self Love...
4. कुसंगत...
5. कोमा, ऑपरेशन, ऍक्सिडेंट, मानसिक धक्का
6. दुसऱ्याचे जाणीवपूर्वक फेकलेले वाईट विचार किंवा Intentions
7.वाईट जागा, अपवित्र स्थळे
8. नशा, इतर वाईट सवयी

All internal and external  factors beyond our control.

तेजोवलय दूषित असेल तर पुढील लक्षणे आढळतात..

1.अकारण भीती, सतत चिडचिड, राग, चिंता, मत्सर, Depression.. Emotional imbalance.
2. Strained relationships
3. Accidents, अडचणी. 
4. Imbalanced personality and life.
5. अनारोग्य

वरील लिस्ट वाचल्यावर आपल्या लक्षात येईल की जशी आपण दररोज शरीराची स्वच्छता ठेवतो तसेच तेजोवलय Clean ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. कारण हे केलं नाही तर उर्जारूपात जो नकारात्मक कचरा तिथे साठत जातो, त्याने हळूहळू आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

तेजोवलय clean ठेवणं अतिशय सोपं आहे. आपल्या पूर्वजांनी यासाठी वागण्याचे खूप छान नियम,  रीतीरिवाज घालून दिले आहेत. आपण आजही त्यातील बरेचसे नियम पाळतो. बदलत्या काळानुसार काही पाळणं शक्य नसतं. पण तरीही आधुनिक जीवनशैलीशी सांगड घालून, याविषयीचे आवश्यक ज्ञान घेऊन, आपण काही छोटे बदल केले, नियम केले, तर आपण आपले तेजोवलय रोजच्या रोज नक्कीच clean आणि strong  ठेवू शकतो.

तेजोवलय अंतर्गत आणि बाह्य अशा विविध गोष्टीनी प्रभावित होत असतं आणि त्यामुळे सतत बदलत असतं. दिवसभरात बऱ्याच घटना, गोष्टींचा सामना आपल्याला करावा लागतो ज्यांच्यावर आपले नियंत्रण नसते. आणि आपले तेजोवलय संक्रमित होत राहाते.  

आपण आपले तेजोवलय खालील उपायांनी  रोजच्या रोज शुद्ध ठेऊ शकतो. 

1.मीठाचा वापर. 

हा फार छान त्वरित results देणारा उपाय आहे. बाजारात खडा मीठ (sea salt) मिळतं. अतिशय स्वस्त असतं आणि सहज उपलब्ध आहे. नाहीच मिळालं तर साधं मिठ सुधा चालेल. मिठामधे नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची मोठी शक्ती आहे. घरात खूप कलह, वादविवाद चाललेत, आजारपणं संपत नाहीयेत, नकारात्मकता जाणवतेय, अडचणी येतायत, किंवा यापैकी काहीही नसल्यास प्रतिबंधात्मक म्हणून रोज सुद्धा.. हे मीठ काचेच्या छोट्या छोट्या बाऊल्स मधे भरून घरात/ऑफिस मध्ये प्रत्येक खोलीच्या कोपऱ्यात ठेवा. आजारी माणसाच्या उशाशी, पायाशी ठेवा. जर नकारात्मक ऊर्जा असेल तर मिठाला लगेच पाणी सुटेल, ते काळं पडेल, किंवा खराब होईल. आशा वेळेस ते इतरत्र कुठेही न सांडवता टॉयलेट मधे टाकून द्या. कमीतकमी 3 महिने हा उपाय सतत करत राहावा. मिठाच्या पाण्याने रोज लादी ही पुसू शकता. जेव्हा कधी खूप depress किंवा अकारण उदास, दुःखी, एकटेपणा, भीती, चिंता, किंवा कसलं वाईट वाटत असेल त्या वेळेस दोन्ही मुठीं मधे खडा मीठ घ्या, आणि दोन्ही पाय साधारण गुडघ्यांपर्यंत (खडा मीठ घातलेल्या) गरम पाण्यात बुडवून डोळे बंद करून 10 मिनिट बसा. मनातल्या मनात "माझं तेजोवलय पूर्णपणे शुद्ध झालं आहे आणि सर्व नकारात्मक ऊर्जा ह्या मिठात आणि पाण्यात उतरून निघून गेली आहे" असं म्हणत राहा.. आणि फरक बघा. वर सांगितल्या प्रमाणे, हे पाणी आणि मीठ त्वरित टॉयलेट मधे फेकून द्यावे. खूपच negative वाटत असेल, किंवा कधी अशा negative वातावरणात जायची, किंवा अशा लोकांशी interact करायची वेळ आली, तर घरी आल्यावर स्नानाच्या अर्धी बादली पाण्यात मूठभर मीठ टाकून त्याने स्नान करावे. मनात वर सांगितलेले intention म्हणावे आणि  नंतर नेहेमी सारखे साबण लावून स्नान करावे. हा पण खूप परिणामकारक उपाय आहे.. फक्त ज्यांची त्वचा sensitive आहे त्यांनी रोज करू नये. अशा लोकांनी मिठा ऐवजी पाण्यात apple cider vinegar चा वापर करावा. 

कदाचित हेच कारण असावे की, समुद्राच्या लाटा आणि आपण सागराच्या किना-यावर गेलो की मनाला भुरळ पडते, प्रसन्न, आनंदी आणि उत्साही, मनाची विशालता जाणवायला लागते.

2.ध्यान (Meditation)

ध्यानाचे फायदे अपरिमित आहेत. याने तुमचे तेजोवलय तर नेहेमी शुद्ध (clean) आणि strong राहतच, पण तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्या वर चांगला परिणाम होतो. ज्यांनी ध्यान आधी केलं नाहीये, किंवा ध्याना बद्दल माहिती नाही, त्यांच्या साठी अतिशय powerful "1 minute meditation" काल ग्रुपवर पोस्ट केलं होतं. 

3.सकारात्मक विचार..... जिवनात प्रेरणादायी उर्जा

ईश्वराने माणसाला विचार करण्याची फार मोठी शक्ती दिली आहे ज्याने तो आपल्या जीवनाचं शिल्पं हवं तसं घडवू शकतो. पण बहुतेक वेळा आपण ही शक्ती नकारात्मकते मधे वाया घालवतो. घडणाऱ्या घटना, आजूबाजूची माणसं, किंवा बाह्य परिस्थिती कशीही असली तरी आपण बाह्य जग बदलू शकत नाही. आपण फक्त स्वताला बदलू शकतो.  सकारात्मक विचारांनी  तुमचं तेजोवलाय नुसतं शुद्धच होत नाही तर ते अधिकाधिक strong होत रहातं आणि त्याला natural protection मिळत राहात.  हा माझा स्वतःचा अनुभव आहे, की समोरची माणसं त्यांच्या विचारातून, बोलण्यातून कितीही नकारात्मकता तुमच्यावर फेकत असली, तरीही तुमच्या सकारात्मक विचारां मूळे,  तुम्ही त्याने प्रभावित होत नाही.  सततच्या सकारात्मक (positive) विचारां मुळे बाह्य परिस्थिती सुद्धा हळूहळू बदलत जाते. 

4.संगत, सोबत.... सहवास महत्वाचे

आपण नेहेमी नकारात्मक लोकांच्या संगतीत, सोबतीला राहतो का....कोणाशी बोलुन ती व्यक्ती निघून गेल्यावर अचानक आपल्याला मरगळ, उदासी, दुःखी, एकटं, किंवा depress वाटतं का..तसं असेल तर आपली ऊर्जा त्या व्यक्तीने नकळत शोषून घेतलेली आहे. जवळच्या नात्यात अशी व्यक्ती असेल किंवा अशा व्यक्तींशी टाळता येत नाही असा रोजचा संबंध येत असेल तर त्यांच्याशी बोलताना त्यांच्या negative emotions ना बढावा देऊ नका, त्यांच्या बरोबर त्यांचं दुःख हलकं करताना तुम्ही रडू नका......किंवा दुःखाशी स्वतःला relate करू नका. नाहीतर तुमची ऊर्जा ते नकळत शोषुन घेतील आणि तुमच्याशी बोलून गेल्यावर त्यांना खूप बरं वाटलं आणि तुम्ही मात्र down व्हाल. 

काहीवेळेस आपण काही समूहांशी विविध कारणांनी जोडलेले असतो. यात फेसबुक वरचे virtual समूह सुद्धा आले बरं का. जर समूहात काही लोकं नकारात्मक विचार प्रसारित करत असतील, किंवा सतत बोलत असतील तरीही सावध. अमेरिकेत तिथल्या निवडणुकी नंतर राष्ट्राध्यक्षां विरुद्ध असे खूप virtual आणि प्रत्यक्ष समूह बनवले गेलेत. आपला त्यावर चांगले किंवा वाईट बोलण्याचा विषय नाही. पण Mass influence खाली येऊन लोकं अप्रत्यक्ष पणे ही नकारात्मकता स्वताच्या आयुष्यातही आमंत्रित करतात हे त्यांना समजतच नाही.

आपल्या मनात विचार हे बाहेरील विचार विश्वामधून येत असतात.. आपल्याला वाटलं की मी हा विचार केला तरी आपण ज्या vibrations वर आहोत त्यांच्याशी मिळते जुळते विचार आपल्या पर्यंत बाहेरून येतात आणि आपण ते ग्रहण करत असतो. जर तुम्ही सतत नकारात्मक संगतीत राहिलात, तर कुठले विचार घ्याल हे तुम्हीच ठरवा. पूर्वीं लोकं यासाठीच म्हणत "सुसंगती सदा घडो". 

5. नामस्मरण (mantra chanting) 

आपल्या ऋषी मुनींनी तप साधनेच्या बळावर कुठले स्वर, शब्द रचना एकत्रित करून विशिष्ठ संख्येत म्हटल्या की त्याचा काय परिणाम आपल्या स्थूल आणि सूक्ष्म शरीरावर, वातावरणावर, विशिष्ठ कारणासाठी होतो हे शोधून मंत्र शास्त्र विकसित केले. नामस्मरण किंवा एखादा विशिष्ठ मंत्र जेव्हा आपण विशिष्ठ संख्येत रोज म्हणतो, तेव्हा तो तुमच्या तेजोवलयाला शुद्ध आणि strong करत रहातो. Natural protection देत रहातो. आधुनिकतेच्या नावाखाली आपण नामस्मरणाकडे दुर्लक्ष करतो पण याचे प्रचंड फायदे आहेत.

6. पवित्र स्थळे/ तीर्थक्षेत्रे

काही जागांची स्पंदनं चांगली नसतात. स्मशान, मद्यालये, किंवा तत्सम इतर वाईट कृत्ये होत असणाऱ्या जागा. या ठिकाणी आपले तेजोवलय पटकन संक्रमित किंवा दुषित होऊ शकते. याउलट काही जागा अतिशय पवित्र आणि उच्च स्पंदने असलेल्या असतात. पृथ्वीच्या पाठीवर अशी 7 मुख्य ठिकाणे (power spots) आहेत ज्यांना पृथ्वीची सप्तचक्रे म्हणतात. भारतात हिमालयात कैलास पर्वत हे असे ठिकाण आहे की जिथे उच्चतम सकारात्मक स्पंदने आहेत आणि त्याला पृथ्वीचे सहस्त्रार चक्र म्हणतात. जागांची स्पंदने विचारात घेऊन पूर्वजांनी मंदिरांची स्थापना केली. प्राचीन काळी तीर्थयात्रेला जायची प्रथा याचसाठी होती की आपले तेजोवलय शुध्द व्हावे.  तुमच्या घराजवळ असलेल्या मंदिरात जाण्याचा नेम ठेवा.

7. प्राणायाम/ योगासनं/ व्यायाम.

प्राणायाम हा तेजोवलय clean आणि स्ट्रॉंग ठेवण्याचा अतिशय परिणामकारक उपाय आहे. पण तज्ञानकडून शिकून मगच करावा.
योगासने आणि त्यातही सुर्य नमस्कार हा ही अतिशय प्रभावी आहे. 

8.पौष्टीक आहार, rest आणि पूर्ण झोप. याबद्दल वेगळे सांगायची गरज एव्हढ्याचसाठी की ह्या तीन अतिशय basic गोष्टी सुधा आपण आजकाल न पाळल्यामुळे तुमचे तेजोवलय weak होऊ शकते.

9.निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे. आपण सर्व निसर्गातील पंचतत्वातून जन्मलो आणि परत तिथेच जाणार आहोत. निसर्गातून, झाडं, हिरवळ, डोंगर, नद्या, यातून प्राणशक्तीचा खजिना आपल्याला मिळत असतो. आपले तेजोवलय नैसर्गिकरित्या clean आणि strong ठेवायला निसर्ग खूप मदत करतो.

वर दिलेले जास्तीत जास्त उपाय रोजच्या रोज आपल्या आचरणात ठेवले तर आपले तेजोवलय आपण रोजच्या रोज शुध्द ठेऊ शकतो. पण काही कारणाने जर तेजोवलय खूपच damage झाले असेल आणि मोठ्या प्रमाणात त्याची लक्षणं दिसत असतील तर खालील उपाय तज्ञ व्यक्तीकडून करून घेतल्यास खूप फायदा होतो.

10.Holistic Healing Methods..

1. रेकी किंवा इतर ऊर्जा उपचार
2. Crystal थेरपी
3. Sound थेरपी
4. Aroma थेरपी
5. Flower थेरपी

पूर्वी आपली आजी किवा आई, आपल्याला काही झालं की किंवा शुभकार्यानंतर दृष्ट काढायची, आठवतं..? तेजोवलय स्वच्छ किंवा शुद्ध करण्याचाच तो प्रकार आहे. मीठ आणि मोहरी या दोन्हीमध्ये नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची ताकद आहे. तसेच बाहेरून घरी आल्यावर चप्पल घराबाहेर काढून बाहेरच विहिरीवर डोक्यावरुन आंघोळ करून मग घरात यायचं अशी पद्धत होती... त्यांचं कारण लक्षात आलंय..? बाहेरील नकारात्मक ऊर्जा निघून जाऊन आपल तेजोवलय शुद्ध रहावे जेवायच्या आधी जेवणाच्या ताटाला नमस्कार करून एखादा श्लोक म्हणून जेवायची पद्धत, जेणेकरून जेवण बनवणाऱ्याची नकारात्मक विचारस्पंदन निघून जावीत. या खूप लहान गोष्टी आहेत पण तेजोवलय शुद्ध ठेवायला खूप मदत करतात. आता सुद्धा आपण यातलं जेवढं पाळता येईल तेवढं पाळायचं.

गौतम बुद्धांचे तेजोवलय त्यांच्या शरीरा सभोवती 3 मैल पसरलेलं असायचं. ज्या यशस्वी प्रभावी व्यक्ती आपल्याला इतरत्र दिसतात, त्यांचे तेजोवलय सुद्धा अतिशय strong असते. तेजोवलय हे साध्या डोळ्यांना दिसत नसल्याने आपण त्याकडे दुर्लक्ष करतो किंवा अविश्वास दाखवतो. पण त्याचे सखोल ज्ञान घेऊन आपणही आपले आयुष्य यशस्वी आणि प्रभावी बनवू शकतो.

आशा आहे की ह्या ज्ञानाचा उपयोग सर्वाना होऊन आपले आयुष्य आनंदी, आणि यशस्वी होईल. 

- ह्या पोस्ट च्या मूळ लेखक वैशाली देशपांडे आहेत. आज ह्या माहितीची अत्यंत गरज आहे, पण त्याची जाणीव मात्र नाही. समाजात ठिकठिकाणी नकारात्मक विचार असतात, त्याचा प्रभाव आपल्यावर पडत असतो. आपले नेमकं काय चूकले हेच कळत नसल्याने त्रागा वाढतो.🙏🏻🌹

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"