Wednesday, February 27, 2019

श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज.

श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज.

स्वामी महाराज पवनी वरून श्री नृसिंहवाडीत .

स्वामी महाराज पवनी वरून मार्गक्रमण करीत श्री नृसिंह वाडी कडे निघाले  स्वामी महाराजांना सामोरे जाण्यासाठी श्री दिक्षीत स्वामी महाराज एक दिंडी घेऊन अर्जूनवाड ला आले होते स्वामी महाराजांना पाहताच श्री दिक्षीत स्वामींना प्रेमाने भरून आले त्यांनी महाराजांना साष्टांग दंडवत घातला .
दुसरे दिवशी सर्व भक्त मंडळी सोबत कृष्णास्नान करून स्वामी महाराजांनी भिक्षा आणली.आणि विश्रांती नंतर वाडीस प्रस्थान केले वाटेत शिरोळला भोजनपात्राचे दर्शन घेतले .सायंकाळचे स्वामी महाराज वाडीत पोहचले  वाडीत आल्यावर पुर्वीप्रमाणे पाठ पठण विद्यार्थांना ब्रम्हकर्म दुपारी स्नान व भिक्षा सायंकाळी शिक्षात्रयी या ग्रंथावर भाष्य नंतर पालखी सोहळा असा वाडीतील स्वामी महाराजांचा दिनक्रम असे वाडीला स्वामी महाराज आपल्या निमंत्रणाचा स्विकार करून आल्यामुळे समस्त वाडीकरांनी व तेथिल वैदिक  मंडळींनी संहिता स्वाहाकार करण्याचे ठरवले .आणि महाराजांची अनुज्ञा घेतली  हा समारंभ ही पंधरा दिवस चालला .या शिवाय लोकांच्या 
असलेल्या विविध व्याधीवर ही ते ऊपचार  करी व ऊपाय ही सुचवित असे मंत्र तंत्राद्वारे अनेकांचे आजार दुर केले .
       ।। श्री गुरूदेव दत्त ।।

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"