आजकाल मला सारखे प्रश्न विचारतात,माझी साडेसाती कधी सूरु होत आहे? मला साडेसातीत काय त्रास होईल?हे मी फक्त राशीवरून कसे सांगू शकणार?मुळात साडेसातीत शनिचा त्रास होतो ही कल्पनाच अज्ञानमूलक आहे.त्रास हा पूर्व कर्मांमुळे होत असतो आणि दुःख ही दोष-कर्मांची फलित अवस्था असते.साडेसाती ही परीक्षा आहे.वर्षभरात किती अभ्यास केलात,वर्गात किती वेळा गैरहजर होतात त्यावर तुमचा पेपर सोपा जाणार आहे की अवघड हे ठरते.शनि फक्त
परिक्षक आहे.पेपर कठीण गेले तर त्यात साडेसातीचा काय संबंध!पण न करत्याचा वार शनिवार हेच खरे.आपले अपयश झाकण्यासाठी 'माझे ग्रहमान बरोबर नव्हते 'ही सबब अगदी
लंगडी असते.शनिमहाराज कधीच त्रास देण्यासाठी येत नाहीत
तर इन्स्पेक्शनसाठी येतात.जसे प्रयत्न तसे यश.म्हणून आपण परीक्षा कधी आहे ते बघून अभ्यास करू नये तर वर्षभर करावा
जीवतोड मेहनत आणि प्रयत्न करणा-च्या दारात यशश्री कायम तिष्ठत असते.पण परीक्षा जवळ आली की पुस्तके उघडायची,सिध्दीविनायकाला जायचे,नवस बोलायचे हा नेभळटपणा असतो.परमेश्वर चमत्कार करीत नाही,प्रयत्न करावयास शक्ती देतो.प्रतिकूल ग्रहमानाला परमेश्वरी उपासनेने
आणि पराकाष्ठेच्या प्रयत्नाने अनुकूल करून घेण्यात महान
पुरुषार्थ आहे.ऋतुमान अनुकूल-प्रतिकूल येतच असते आणि आपण त्याला तोंड देण्यासाठी उपाय करीत असतो.पाऊस आला की छत्री,थंडी आली की स्वेटर,उन्हाळा आला की पंखा.
तसेच ग्रहमानालाही तोंड देण्यासाठी नित्योपासना उत्तम उपाय आहे.दुःखाची थंडी आली की नामाची बंडी घालावी.मुखी नाम आणि हाती आनंद असा रोकडा अनुभव येतो.मात्र प्रयत्न न करता,कर्तव्ये न करता केवळ फलाषेने केलेली उपासना फलहीन होते.प्रयत्नाला प्रथम प्राधान्य द्यावे,नंतर मला प्रयत्न
करण्यासाठी शक्ती आई जगदंबा तू दे,वेळच्यावेळी सर्व अभ्यास पुरा होऊन पेपर लिहीताना सारे व्यवस्थित आठवू दे,कारण तुझ्या कृपेशिवाय माझे कर्तृत्व झळाळणार नाही ही श्रध्दा व नम्रताही महत्वाची.पाउलो पाउली परमेश्वर आपले बोट धरून चालवतो म्हणूनच मुक्कामावर आपण सुरक्षित पोहोचतो.कधीही अहंकाराने बोट सोडू नये.प्रत्यक्ष गुरुनाथाना क्षणभर अहंकार झाला म्हणून फार कष्टातून जावे लागले.रामचंद्रांना,सीतादेवींनाही वनवास भोगावा लागला होता.ते अवतार कार्य म्हणून त्यांनी भोगले.रावणाला अहंकार नडला.हरिश्चंद्र राज्यभ्रष्ट झाला.इंद्रदेवांना वासनेमुळे फार दुःख झाले होते.वसिष्ठांना पुत्रक्षय बघावा लागला.पांडवाना कष्टमय वनवास भोगावा लागला.प्रत्यक्ष श्रीकृष्णांना स्यमंतक मणी चोरल्याचा डाग सहन करावा लागला होता.हरिविजय ग्रंथात ती सविस्तर कथा आहे.मित्रमैत्रिणींनो ही सारी थोर थोर माणसे सुध्दा साडेसातीच्या प्रभावातून गेली आहेत पण हातपाय न गाळता धीरोदात्तपणे त्यांनी अख॔ड *प्रयत्नांनी* मार्ग शोधला.आपणही प्रयत्नाची पराकाष्ठा केली आणि भगवंताचे बोट घट्ट धरून ठेवले तर अपयश नाही.आईच्या कडेवर बसून मस्ती करणारे मुल कधी खाली पडत नाही.नमस्कार......
कृपया शेअर करा..........शरद उपाध्ये............
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"