Monday, February 4, 2019

कारंजा येथिल श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे जन्म स्थान

श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज 

कारंजा येथिल श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे जन्म स्थान .

श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज 
नरसी चा चातुर्मास आटपून वाशीम मार्गे
श्री दत्तात्रेयाचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या जन्मगांवी आले तो पर्यत हे स्थान नृसिंह सरस्वती स्वामींचे जन्म स्थान आहे हे कारंजा गाववासीयांना माहित नव्हते स्वामी महाराजांचा मुक्काम हातोटीपूरा येथिल काळ्या मारोती मंदीरात होता .कारंजा येथिल वास्तव्यात स्वामी महाराजांना श्री घुडे यांच्या वाड्यातील ऊजव्या बाजूच्या माडीवर एक रात्र व्यतीत करण्याचा योग आला त्यावेळी स्वामी महाराजांनि श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री वासुदेवानंद सरस्वतींना साक्षात दर्शन दिले आणि माझे वास्तव्य येथे आहे  असे सांगितले  यानंतर स्वामी महाराजांनी काळजीपुर्वक तपास करून एक विशिष्ट ठिकाणच महाराजांचे जन्मस्थान आहे असे निश्चित केले त्याप्रमाणे तेथिल गाववासीयांना हे श्री गुरूमहाराजांचे जन्म स्थान आहे त्या जागी तुलसीवृंदावन 
बांधून त्याची पुजा अर्चा करावी म्हणजे आपणावर सदगुरूकृपा होईल असे सांगितले .पुढे श्री ब्रम्हानंद सरस्वती स्वामी महाराजांनी श्री दत्त आज्ञेने गाववासियांच्या 
मदतीने पादुका स्थापन करून मंदीर बांधले व मुर्तीची प्रतिस्थापना केली .
              ।। श्री गुरूदेव दत्त ।।

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"