Friday, February 8, 2019

पितृदोष असेल तरच जीवनात दुःख येते असे नाही 


श्री स्वामी समर्थ 

पितृदोष असेल तरच जीवनात दुःख येते असे नाही 
आणि पितृदोष शांती,नारायण नागबली वगैरे केल्यावर कायमचे दोष जातात असे पण नाही 

आपले संचित कर्म असतात जे पूर्वजन्मातील कर्मामुळे आपल्याला भोगावेच लागतात 
शांती होम केला तर त्याची शुभ ऊर्जा जो पर्यंत आहे तो पर्यंत बरे वाटते 
नंतर पूर्वी जसे आहे तसेच जीवन चालत राहते 

पण आपण स्वतःचे परिवर्तन केले 
रोज नामस्मरण, ध्यान, दान पुण्यकर्म केले तर या सर्वा पासून नक्कीच सुटका होते 

श्री गुरुदेव दत्त आणि श्री स्वामी समर्थ याच्या नामस्मरनाणे तर अफाट फरक पडतो 
स्वामी यातून तुम्हाला नक्की बाहेर काढतात 
आपले जे भोग आहेत ते भोगल्या शिवाय संपत नाहीत म्हणून स्वामी ते भोग  भोगायला लावून लवकर संपवतात 
त्यांच्यावर आपण भार टाकला की तेच सर्व करतात 
असे माझे मत आहे आणि अनुभव सुद्धा आहेत 
स्वामी जागृत आहेत ते आपल्या बरोबर असतात नेहमी 

श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"