Sunday, February 17, 2019

पारद शिवलिंग..

|| श्री गुरु देव दत्त || 
  ॐ गुरु ॐगुरु अवधूता 
तुही ॐ तुही ॐ श्री दत्ता

पारद शिवलिंग..

पारद शिवलिंग हा तसा एक गुढ विषय आहे. 
पारा हा प्रामुख्याने धातू असुनही प्रवाही असतो, पारा हा तेजतत्व आणि अविशनाशित्वाचे प्रतिक मानले जाते. 
भगवान शिवशंकर हे समस्त सृष्टीचे महादेव आहेत. उत्पत्ती,स्थिती आणि लय यापैकी लय किंवा शेवटाचे प्रतिक म्हणजे भगवान शंकर होय. अत्यंत उग्र, उन्मनी अवस्थेतील, शूर, धीरोदात्त आणि संहारक असं हे दैवत असलं तरीही भक्तवत्सल, प्रेमळ आणि आत्ममग्न असणारेही आहेत. 
पारा हा भगवान शंकरांचे वीर्य मानला जातो....
अभ्रकस्तव बीजं तू, ममं बीजं तू पारद:
 अनर्योर्यमिलनं देवि मृत्यु दारिद्रय नाशनं...

असा उल्लेख रसेश्वरदर्शनात आढळतो. 
विशिष्ट गुढतंत्रे आणि काही वनस्पतींचे रस यांचे पाऱ्यासोबत मिश्रण करुन ठराविक मुहुर्तावर (विजयमूहुर्त) पारा स्थिर करुन त्याला आकार देऊन शिवलिंग बनविले जाते.
पारा घनिभूत करुन स्थिर करणे, त्याला आकार देणे हे यातील सर्वात महत्वाचे तंत्र आहे. 
शुध्द पारद शिवलिंगात पाऱ्याचे प्रमाण ७५% पेक्षा अधिक असावेच लागते.

१)भगवान शंकर हे संरक्षक स्वरुपी परमेश्वरी रुप असल्याने पारद शिवलिंगाची स्थापना व पूजन केल्यास मनातील भिती, भयगंड, कोणतेही कॉम्प्लेक्स दूर होऊन मन शांत व स्थिर होते असा अनुभव आहे. 
२)घरातील मंडळींचे आरोग्य सुधारते. पत्रिकेतील काही अशुभ ग्रहयोगांमुळे कुटुंबातील कुणावर कसलेही गंडांतर येत असेल किंवा आले असेल तर त्यालाही अटकाव केला जातो...
३)घरात समृध्दी नांदणे, घरातील क्लेश कमी होणे. एखाद्याच्या नकारात्मक स्पंदनांमुळे घरातील वातावरण बिघडले असेल तर ते पारद शिवलिंगाच्या स्थापनेने व उपासनेने सुधारते असा अनुभव आहे. 
४)थोडक्यात काळीविद्या, करणी, किंवा तत्सम भयकारक व भितीदायक गोष्टींचा बिमोड या पारद शिवलिंगामार्फत होतो हे नक्की. 
टीप:-
 यासाठी शिवलिंग शुध्द पाऱ्याचे व शिवउपासक गुरुजींकडून आपल्या राहत्या वास्तुत सिध्द करावे हे लक्षात ठेवा

५)पारद शिवलिंग हे भयनाशक, शिवपूजकांसाठी श्रेष्ठ, अविद्यानाशक, शत्रू-गुप्तपीडा नाशक व अशुभत्वाचा एकंदरीत समूळ नाश करणारे आहे. 

६)पण त्याचबरोबरीने ते प्रामुख्याने समृध्दीकारक व धनसंपदेची वृध्दी करून पैसा टिकून रहाणे, अनाठायी धनव्यय न होणे, अडकलेली रक्कम परत येणे वगैरे आनुषंगिक लाभाचेही कारक आहे. 
७)श्रीसूक्तामधील ऐश्वर्य, संपत्ती, संपन्नता, श्री, यश, जयविजय, आरोग्य, सत्ता व दीर्घायुष्यप्राप्ती या संकल्पनांना मूर्तरूप देण्याचे कार्य पारद शिवलिंगाच्या पूजनाने होते असं म्हणले जाते.

स्थापना कशी करावी 

१)देवघरात शिवलिंगाचा निमुळता भाग उत्तर दिशेकडे करून गुरुजींकडून आपल्या देवघरात स्थापित करावे. 

२)रोजच्या पूजेच्या वेळी पारद शिवलिंग निराळ्या ताम्हणात घेऊन अभिषेक करून, नंतर पुन्हा मुळ जागी ठेवले तरी चालते किंवा मग नुसती कोरडी पंचोपचार पूजा केली (धूप, दीप, गंध, पुष्पार्पण/बिल्वार्चन, नैवेद्य ) तरी चालेल. 

३)शंकराला बेल व पांढरी फुले प्रिय आहेत. 

४)स्थापना तांदूळावर असली तरी वरून अक्षतार्पण करू नये.

५) अगदीच काही जमलं नाही तर नुसती अगरबत्ती ओवाळून रोज
 १०८ वेळा ||ॐ नमः शिवाय || 
जप केला तरी हरकत नाही. 
मात्र रोज काहितरी पूजन, मंत्रजप, संस्मरण होणे क्रमप्राप्त आहे हे ध्यानात ठेवावे. 

५)बाहेरगावी गेल्यास, सोयरसुतकात खंड पडला तरी चालेल पण तेव्हा मनात जप व मानसपूजा करावी. 
गंध कोणतेही चालेल. हळदीकुंकू मात्र वर्ज्य आहे. चंदन, अष्टगंध, भस्मलेपन उत्तम....

६)स्त्रीया पूजन करू शकतात मात्र मासिकऋतूचक्र काळात ५ दिवस पूजा नको. घरातील इतरांनी करावी. शिवाशिवीचे बंधन नाही (पण या काळात शिवलिंगाला स्त्रीस्पर्श नको. त्याचप्रमाणे अस्वच्छ अवस्थेत कोणीही स्पर्श करू नये).

७) पारद शिवलिंगास सोन्याचा स्पर्श नको आणि पारद शिवलिंगांवर अभिषेक केल्यास तीर्थप्राशन करू नये. 
ओंजळीत घेतल्यास नेत्रास व मस्तकी किंचित लावावे. बाकी कोणतीही बंधने नाहीत......

 सोमवार ,शिवरात्री,पूर्णिमा , सोमप्रदोष , महाशिवरात्री यापैकी कोणत्याही दिवशी शिव उपासक असणाऱ्या गुरुजींकडून सिद्ध करून घ्यावे. धनप्राप्ती, धनसंचय, आरोग्यसंपन्नता, कौटुंबिक संरक्षण यासाठी पारद शिवलिंगाचे पूजन केले जाते. याच्या स्थापना व पूजेसाठी कोणतेही बंधन नाही

 आपल्या वास्तुत 90 ग्रॅम पासून 200 ग्रॅम पर्यंत वापरू शकता. आपली परिस्थिती चांगली असेल तर जास्त वजनाचे वापरू शकता जितके वजन जास्त असेल तितके जास्त फलदायी असते
|| ॐ नमः  शिवाय ||

               श्री गुरु देव दत्त

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"