🏵🌻🌺🙏🏼🌺🌻🏵
*!! जय श्रीराम !!*
*शनिवार व श्री हनुमान*
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
सप्ताहातील प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित केला आहे मंगळवारी हनुमानाचा जन्म झाला, मंगळवारी श्रद्धाळू हनुमान चाळीसा व सुंदरकांडाचा पाठ करतात परंतु त्यांची पूजा शनिवारी का केली जाते यामागे एक धार्मिक पौराणिक कथा आहे . रावण मोठा ज्योतिषी पण होता .
एकदा त्याने सर्व देवतांना हरवून सर्व नऊ ग्रहांना आपल्या कैदेत ठेवले तो सर्व ग्रहांना जमिनीवर पालथे झोपवून त्यांच्या वर पाय ठेवून उभा राहत असे रावणाने त्याच्या पुत्र जन्माच्या वेळेस सर्व ग्रहांना शुभ स्थितीत ठेवले ज्याकरवी पुत्राच्या पत्रिकेत सर्व ग्रह उच्च असतील यामुळे सर्व देवताना भय वाटू लागले कि रावणपुत्र इंद्रजीत अजेय होवून जाईल परंतु रावणाच्या पायाखाली दबलेले असल्याने ते काही करू शकत नव्हते शनी आपल्या खराब दृष्टीने रावणाची शुभ स्थिती नष्ट करू शकत होते परंतु रावणाने त्यांना जमिनीवर पालथे पाडले असल्याने त्यांची दृष्टी रावणावर पडू शकत नव्हती.
त्यावेळी नारदमुनी लंकेत आले व त्यांनी रावणाची खूप तारीफ केली नारद म्हणाले रावणा तुझी जीत ह्या सर्व ग्रहांना दिसली पाहिजे म्हणून त्यांच्या पाठीवर नको तर पोटावर पाय देवून उभा राहा रावणाने नारदांचे सांगणे ऐकले व त्यांच्या पोटावर पाय देण्यासाठी त्यांना उलट केले त्याबरोबर शनिची मारक दृष्टी रावणावर पडली व त्याने रावणाची दशा खराब केली हि गोष्ट ताबडतोब रावणाच्या लक्षात आली व त्या ने शनीला सुंदरबनातील कारागृहात उलटे टांगून ठेवले व कारागृहाच्या प्रवेशद्वारावर शिवलिंग लावून ठेवले ज्याने शनीची दृष्टीपासून अपाय होणार नाही व शिव लिंगा वर पाय दिल्याशिवाय शनी पळून जावू शकत नाही..
जेव्हा सीतेला सोडवायला हनुमान लंकेत आला तेव्हा त्याने शानिदेवाना आपल्या डोक्यावर बसवून त्यांची लंकेतून सुटका केली , पण शनीच्या डोक्यावर बसण्याने हनुमान अनेक संकटांच्या चक्रात फसले असते म्हणून शनीने त्यांना त्याच्या मारक कोपातून मुक्त राहण्याचाi आशीर्वाद दिला व वर मागण्यास सांगितले हनुमानाने आपली भक्ती करणार्यांना नेहमीच शनी कोपातून मुक्ती मिळू दे असा वर मागितला म्हणून असे म्हणतात कि जे शनिवारी हनुमानाची उपासना करतात त्यांच्यावर शनीची पाप दृष्टी पडत नाही..!!
*************
शनिप्रदोष, या दिवशी क्षेत्रातील तपोवृद्ध अभ्यासकांच्या मते भीमरुपी स्तोत्राच्या सिद्धतेसाठी व उपासनेसाठी शनिपुष्य हा अद्वितीय योग मानला जातो. तरी ह्या दुर्मिळ संधीचा अवश्य लाभ घ्यावा
पठणाची पद्धती पुढील प्रमाणे. ..
श्री रामरक्षा स्तोत्र - 1 पाठ
"रां रामाय नमः " - 108 वेळा
"ओम् हं हनुमते नमः"-108 वेळा
भीमरुपी स्तोत्र - 11 पाठ
"ओम् हं हनुमते नमः"-108 वेळा
"रां रामाय नमः" - 108 वेळा
श्री रामरक्षा स्तोत्र - 1 पाठ
याप्रमाणे पारायण पूर्ण झाल्यावर श्री मारुतीरायांना एक पांढरे फूल वहावे.
भीमरुपी स्तोत्राच्या मागे ज्यांची 13 कोटी रामनामाची तपश्चर्या उभी आहे, त्या समर्थ रामदास स्वामींच्या चरणी कळकळीची विनंती. .....
उपासनेवर विश्वास असलेल्या प्रत्येकाकड़ून एक पारायण स्वतःच्या कल्याणासाठी व एक पारायण भारत देशासाठी केले जावे.
*श्री हनुमानजी महाराज की जय ...*
🕉🕉🕉🕉🕉🕉🕉
*ॐ!!संकलक:-(अनंत शंकर देव वाई।)*
✴✳✴✳✴✳✴
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"