|| श्रीराम समर्थ ||
देहाची हेळसांड करूं नये. त्याची काळजी घ्यावी. त्याचा सांभाळ करावा. पण तो सर्वस्व आहे असें धरून चालून नये. असें केलें म्हणजे कर्तव्याची जागृति राहील पण आसक्तीचा जोर राहणार नाही. मग देहाच्या बाबतीत होणारे चढउतार, उदा : दोष नसतांना निंदा ऐकणें, गुण नसतांही उत्कर्ष होत राहणें, वगैरे सर्व गोष्टी मजेनें पहात राहतां येतील. पण त्याकरतां देहाच्या तीरावर राहतां आलें पाहिजे. त्याचा अभ्यास म्हणजे भगवंताचें अनुसंधान हा होय.
|| जानकी जीवन स्मरण जय जय राम ||
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"