Sunday, February 17, 2019

भगवंत शरणागती पाहतो

🌹🌹🌹🌹🌹🔥🌹🌹🌹🌹🌹

*आपले दोष भगवंताकडे सांगणे हा भजन पूजनाचा हेतू आहे. ते प्रेमार्थ करावे. भगवंत शरणागती पाहतो. विद्वत्ता, श्रीमंती पहात नाही. भगवंताचे दर्शन होण्यास शरणागती हा एकच मार्ग आहे. नाम हे सर्व सत्कर्माचें लोणी आहे. ज्या घरात सद्भावनेनें अखंड नामस्मरण चालतें तेथें भगवंत रमतो आणि ते घर गोकुळ बनतें. भारतीय युद्धामध्यें परमात्मा पीतांबर नेसून, अर्जुनाच्या रथावर बसून, रणांगणावर अर्जुनाला गीता सांगते झालें. पुढें हजार वर्षांनीं भगवंत कपडे बदलून आलें आणि त्यांनीं ज्ञानेश्वरी सांगितली.*

🌹🌹🌹🌹🌹🔥🌹🌹🌹🌹🌹

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"