Wednesday, February 27, 2019

निरपेक्ष* भक्ती

अंतरबाह्य शुध्द असलेल्या आपल्या कमालीच्या तेजःपुंज पतिव्रता मातेला अध्यात्माच्या सर्वोच्च शिखरावर असुनही दत्तमहाराज म्हणाले,"माते,तुझ्या पदरी पुण्याचा अफाट साठा
आहे पण त्याने तू जीवनमुक्त होणार नाहीस.त्या पुण्याईच्या जोरावर फार तर पुढील जन्म उत्तम कुळात मिळेल पण तुला
आत्मदर्शन अजून झाले नाही.ते गुरुकृपेशिवाय शक्य नाही. म्हणून तू परम निष्ठेने सद्गुरुंना शरण जा.ते तुला जन्म-मरणा-
च्या यातायातीतून सोडवतील.मन निर्विकार,निर्भय,निर्विकल्प,
निर्मोह,निःसंशय, निरहंकार,निरपेक्ष झाल्याशिवाय सद्गुरू भेटत नाहीत आणि सद्गुरुंवाचून कधीही आत्मोध्दार होत नाही.
मित्रमैत्रिणींनो, कणभर उपासनेचा माणसाला केवढा मणभर
अहंकार असतो.मुळात *निष्काम* उपासना करणारे थोडेच.
प्रत्येक स्तोत्र म्हंटल्यावर,पूजा केल्यावर फळाची अपेक्षा असते
च."माझ्याकडे लक्ष असूदे रे बाबा" असे तरी म्हणण्याची गरज
काय? "सकल जगाचा करितो सांभाळ! तुज मोकलील ऐसे नाही!"दुर्मिळ मनुष्य योनी ही जीवनमुक्त होण्यासाठी मिळाली
आहे.त्यासाठी प्रखर उपासना करून आपली अध्यात्मिक बॅन्क पूर्ण पुण्याने भरायची असते.पण आपण सारखे सारखे
ऐहिक कारणासाठी उपसा करीत राहिलो तर आत्मदर्शनासाठी
सद्गुरु कसे भेटणार? "मनःशांती साठी कोणते स्तोत्र म्हणू?"
" लक्ष्मीप्राप्तीसाठी काय उपासना करू?" " किती वेळा स्तोत्र
म्हणू?" हे सारे निरर्थक प्रश्न आहेत. अध्यात्माची केमिस्ट
सारखी दुकाने नसतात.हा त्रास झाला की हे स्तोत्र.तो रोग झाला की ती पूजा.अशी कामनिक उपासना पुण्यक्षय करते.
प्रेमाने भगवत् चरित्र वाचले की *तो* कल्याण करतोच. "हरी 
मुखे म्हणा!हरी मुखे म्हणा! पुण्याची गणना! कोण करी!" 
म्हणून अध्यात्मात *निरपेक्ष* भक्ती असावी.अजपाजप श्रेष्ठ.
एक वेळ अशी येईल की "राम जपे नाम! हम बैठे आराम" 🙏

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"