*🌹श्री🌹स्वामी🌹समर्थ
*आम्ही सर्वच ठिकाणी असतो... हि सर्व स्थाने आमचीच आहे..!!*
*अलवणी बुवा म्हणून एक अतिशय सात्विक आणि आध्यात्मिक व्यक्ती बडोद्यास रहात होती... एकदा शिष्यांना सोबत घेवून ते तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले..* *तीर्थयात्रा करत करत ते जगन्नाथपुरीस येतात..* *जगन्नाथपुरी मध्ये आल्यानंतर तेथे सर्वांची तब्येत अचानक खराब होते.. अलवणी बुवांसह त्यांच्या सर्व शिष्यांच्या शरीरात भयंकर ताप भरलेला होता.. जेवण करण्यासाठी बाजारात जावून शिधा आणण्या इतकी सुद्धा शक्ती कोणामध्ये नव्हती..* *अलवणीबूवा ह्यांचा मनोमन ईश्वराचा धावा सुरु होता.. अतिशय व्याकुळतेने ते ईश्वराचा धावा करत होते.. स्वामी भक्त हो !! जो कधी राम होतो.. जो कधी कृष्ण होतो.. तोच आता ह्या कलियुगात भक्तांचा उद्धार करण्यासाठी प्रत्यक्ष परब्रम्ह श्री स्वामी समर्थ झालेला आहे..* *अलवणीबूवा ह्यांनी व्याकुळतेची प्रार्थना करताच.. स्वामी महाराज अचानक तेथे प्रगट झाले.. स्वामी महाराज कटीवर हात ठेवून त्यांच्या समोर उभे राहिले.. स्वामींची आजानुबाहू तेज:पुंज मूर्ती बघून अलवणी बुवांची क्षणभरासाठी समाधीच लागली..* *आणि शरीरात इतका ताप आला असतांना सुद्धा ते खडबडून जागेवरून उठले आणि जवळ जावून स्वामींच्या चरणाचे दर्शन घेतले.. आणि संस्कृत भाषेत स्वामींची पुष्कळ स्तुती केली.. आणि त्या नंतर त्यांनी स्वामींना विचारले कि "आपण कोण आणि कोठे असता ?" असा प्रश्न विचारताच स्वामींनी त्यांस उत्तर दिले कि "आम्ही सर्वच ठिकाणी असतो... हि सर्व स्थाने आमचीच आहे..!!" आणि स्वामी असे बोलत बोलत दिसेनासे झाले..* *बुवांस मोठे आश्चर्य* *वाटले.. आणि बाजूला बघता तर काय कि पंचपक्वांनांनी भरलेले मोठे ताट भरून ठेवलेले होते.. हे बघताच बुवांस खूप धन्य वाटले.. आणि सोबत असलेल्या शिष्यां सोबत त्यांनी पोटभर जेवण करतात..*
*एक दोन दिवसांत सर्वांच्या तब्येतीस सुधार आल्या नंतर बुवांनी पुढील यात्रेस सुरुवात केली.. आणि यात्रा करत करत ते अक्कलकोट मध्ये आले..* *अक्कलकोट मध्ये आल्या नंतर तेथे स्वामींच्या लीलांचे श्रवण करतात.. स्वामी लीलांचे श्रवण केल्यानंतर त्यास स्वामी दर्शनाची ओढ लागली... आणि ते स्वामींच्या दर्शनासाठी वटवृक्षस्थळी येतात..* *तेथे येताच स्वामींची आजानुबाहू तेज:पुंज मूर्ती बघताच.. बुवांना लागलीच आठवते कि जगन्नाथपुरीस आपल्याला दर्शन देणारी मूर्ती ती हीच आहे.. मग काय म्हणता.. बुवांचे भान हरपले.. आणि बुवा थेट धावत गेले आणि स्वामींचे चरण घट्ट पकडले... आणि स्वामींची स्तुती सुरु केली.. त्यांचे डोळ्यातून भक्तीचे अश्रू अनावर झाले होते.. आणि त्या नंतर बुवा भानवर आल्यानंतर स्वामींनी त्यास प्रेमाने कुरवाळले..*
*सभोवताली असलेल्या मंडळीना हा काय प्रकार सुरु आहे ह्याचे आश्चर्य वाटले.. त्या नंतर मात्र बुवांनी सर्वांस जगन्नाथपुरीस घडलेली सर्व हकीकत सांगितली.. स्वामींच्या अद्भुत लीलेचे सर्वांना आश्चर्य वाटले आणि सर्वांनी एकाच स्वरात स्वामींचा जय घोष केला..*
*बोला अनंतकोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!*
*🌹स्वामीगुरूमाऊली🌹*🙏🏻🙏🏻
*आजची स्वामी कथा*🙏🏻☝🏻
*बोध सांगावे*🙏🏻☝🏻
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"