स्वतःचे असे पसाभर (ज्ञान)
दुसऱ्याचे असे मूठभर
तरी नसे मान्य त्यासी
काय म्हणावे ह्या वृत्ती
स्वामीराया
आदिमाया आदिशक्ती
हसतसे कैलासी
पाहुणी मानवाची मती
असे सर्व मायेची महती
स्वामीराया
कैसी प्रपंच्याची प्रगती
कैसा प्रपंच्याचा नाश
केवळ असे मायापाष
त्याचे कैसे सुख- दु:ख
स्वामीराया
दुराग्रही,अहंकार ग्रस्त
लोकांना करुनी त्रस्त
स्वतःचे ज्ञान पाजळती
त्यांची काय गती होय
स्वामीराया
जैसे राजहंसाच्या वंशी
क्षीर तितुके प्राषुनी
उदक सांडुनीया देती
आम्हा तैसे ची वागवी
स्वामीराया
आध्यात्म असे गूढ,प्रगाढ
त्याची कशी मोजावी गति
आम्ही केवळ अल्पमती
हे केवळ तुमच्याच हाती
स्वामीराया
शेवटी एकची प्रार्थना आता
पहावे लेकराकडे स्वामीनाथा
हे सकल जग पालन हारा
चरण प्रसाद मज द्यावा आता
स्वामीराया
श्री स्वामी समर्थ
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"