Wednesday, February 27, 2019

वास्तुशास्त्र 2

🌅💐🌹🙏🏻🚩 🚩🚩
॥ श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली ॥
>>🏠 वास्तुशास्त्राचे काही खास पॉईट्स 🏠 :-
■ घराच्या उत्तर दिशेला व्हाईट, ऑफ व्हाईट असे हलके रंग दयावेत त्यामुळे घरामध्ये आर्थिक स्थैर्यता आणि लक्ष्मी आगमन सोपे होते.
■शुक्रवारी घरामध्ये श्री यंत्राची स्थापना करावी यामुळे सुख - समृद्धी व धन स्थैर्यता वाढते व कर्जा पासुन मुक्ती होण्यास मदत होते.
■कोणत्याही शुभ कामासाठी काळ्या रंगाचा वापर करू नये उदाहरणार्थ पेन, पर्स, बॅग, बुट, चप्पल, कपडे. घराच्या उंबऱ्यावर कोणतेही स्टिकर लावु नये त्यापेक्षा रांगोळीने किंवा हळदी - कुंकवाने स्वस्तिक, लक्ष्मीची पद चिन्हे काढावीत.
■ घराच्या मुख्य दरवाजावरती लाल रंगाचा दिवा लावु नये.
■मुख्य दरवाजाच्या बाहेर पाय पुसणे हिरव्या किंवा निळ्या रंगाचे असावे.
शु रॅक मुख्य दरवाजाला आडवे येईल असे ठेवु नये.
■नवीन घर विकत घेताना किंवा बांधताना उत्तर आणि पुर्व दिशेला भरपुर खिडक्या असणे खुप महत्त्वाचे आहे त्यामुळे कायमस्वरूपी घरामध्ये 
सुख - समृद्धी राहते.
■घरामध्ये धनवृद्धी साठी घराच्या उत्तरेला किंवा ईशान्येला फिश पॉट किंवा तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवावे.
■फिश पॉट घराच्या आग्नेय दक्षिण, नैऋत्य किंवा पश्चिम दिशेमध्ये ठेवु नये.
■ घराच्या सुख समृद्धी आणि आरोग्यदायी जीवनासाठी फिश पॉट हा लहान आकाराचा ठेवावा खुप मोठा किंवा भव्य उंचीचा ठेवु नये.
घराच्या सुख-समृद्धी साठी फिश पॉट मध्ये आठ सोनेरी फिश आणि एक काळी फिश ठेवावी.
■फिश पॉट हा भिंतीमध्ये कप्पा करून किंवा खोचून ठेवु नये जमिनीला समांतर असा ठेवावा.
■घराच्या सुख - समृद्धी साठी आणि फायनानशियल पोझिशन स्ट्रॉंग होण्यासाठी वॉटर फॉल घराच्या उत्तर आणि ईशान्य दिशेमध्ये लावावा.
घराच्या उत्तर व ईशान्य दिशेमध्ये फुलांच्या कुंड्या, रोपटी किंवा कोणतेही आर्टिफ़िशियल झाड लावु नये.
■घराच्या ब्रम्हस्थळामध्ये म्हणजेच घराच्या सेन्टर मध्ये भरपुर मोकळी जागा ठेवावी फ्रिज, कपाटे, किचन, टॉयलेट, कॉलम, बिम हे येऊ देवु नये.
■ब्रम्हस्थळामध्ये ( घराचा सेन्टर ) असणाऱ्या कोणत्याही वास्तुदोषामुळे घरामध्ये आजारपण, नैराश्य, वाईट विचार, अपयश या गोष्टी वाढीस लागतात त्यामुळे ब्रम्हस्थळामध्ये कोणताही वास्तुदोष येऊ देवु नये.
■ किचन मध्ये ब्रम्हस्थळ ( घराचा सेन्टर ) आल्यास त्यावरती फ्रिज, ओटा, डायनिंग टेबल, देवघर येऊ देवु नये त्यामुळे घरात शुभ ऊर्जा प्रवाहित होण्यास अडथळा निर्माण होतो.
■बंगला, इंडस्ट्री, दुकान, मेडीकल, हॉस्पिटल किंवा कमर्शियल कॉम्पलेक्स बांधताना प्लॉटचे,वास्तुचे ब्रम्हस्थळ नेहमी मोकळे सोडावे.
■घर बांधताना प्लॉट च्या मध्यभागी म्हणजेच ब्रम्हस्थळा मध्ये विहीर, खड्डा, बोअरिंग, पाण्याची टाकी येऊ देवु नये.
■नवीन घर विकत घेताना घराचा (सेंटर पॉइंट) ब्रम्हस्थळ हे घराच्या बाहेर जात असेल किंवा टॉयलेट मध्ये येत असेल तर ते घर विकत घेऊ नये.
■जवळ जवळचे दोन फ्लॅट एकत्र जोडुन एक मोठा फ्लॅट तयार करण्यासाठी वास्तु तज्ञाच्या सल्याने फ्लॅटचे एकत्रीकरण करावे त्यामुळे ब्रम्हस्थळाचा दोष निर्माण होऊ शकतो.
■ शेतीच्या ब्रम्हस्थळात विहीर, खड्डा, शेत तळे असल्यास मालकाला नुकसान संभवते.
■घराच्या छपराचा उतार उत्तर किंवा पुर्वेला असावा, दक्षिण - पश्चिमेला उतार असल्यास हानिकारक असते.
घराच्या उत्तर, पुर्व दिशेमध्ये असलेले टेरेस शुभ असते, दक्षिण किंवा पश्चिमेला असलेले टेरेस हानिकारक असते.
■टेरेस वर सोलर पॅनल घराच्या आग्नेय किंवा दक्षिण दिशेला लावावे. ईशान्य - उत्तरेमध्ये सोलर पॅनल लावु नये.
■घरामध्ये जिना हा गोलाकार नसावा आयताकृती, चौकोनी आकाराचा आणि पायरी चढताना उजवीकडे वळणारा असावा.
■वास्तुशास्त्रा नुसार घर असणे किंवा करून घेणे म्हणजेच आपल्या कुटुंबियांना भक्कम सुरक्षा कवच प्रदान करण्यासारखे आहे त्यामुळे योग्य वास्तुतज्ञाकडून व्हिझिट करून घेणे महत्वाचे आहे.
■कोणतेही शुभ काम करताना काळ्या रंगाचा वापर कमी करावा उदाहरणार्थ - कपडे, बॅग, पेन, चप्पल.
■घरामध्ये तुटलेली फरशी, तुटलेले फर्निचर अशा वस्तु घरामध्ये असतील तर त्यामध्ये त्वरित बदल करून घ्यावा त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
■ बेडरूममध्ये बेड हा शक्यतो लाकडी सागवानी असावा लोखंडी असेल तर त्याला लाकडी अथवा रबरी गट्टु बसवुन घ्यावेत त्यामुळे हेल्थ प्रोब्लेम कमी होतात.
■बेडच्या खाली नऊ मोर पिस ठेवावीत त्यामुळे शांत झोप लागते आणि आजुबाजूच्या वातावरणातील वाईट प्रभाव कमी होऊन आरोग्य सुधारते.
■मास्टर बेडरूम च्या गादी खाली बँकांचे पासबुक, कोर्टाच्या नोटीसा, फाईल आणि कोणतेही नकारात्मक कागद पत्रे ठेवु नये.
■भोजन करताना घराच्या उत्तर किंवा पुर्व दिशेला तोंड करून भोजन करावे दक्षिण किंवा पश्चिमेला तोंड करू नये.
डायनिंग टेबल किचनच्या उत्तर किंवा पुर्व दिशेमध्ये असावा पश्चिम किंवा दक्षिण दिशेमध्ये डायनिंग टेबल ठेवु नये.
■नवीन घर किंवा कमर्शियल कॉम्पलेक्स बांधताना घराच्या दक्षिण व पश्चिमेला मोकळी जागा सोडुन बांधकाम करू नये उत्तर - पुर्व या शुभ दिशांना मोकळी जागा सोडुन बांधकाम करावे.
■वास्तु मध्ये पूजा, होम - हवन, सत्यनारायण करताना आपले तोंड उत्तर - पुर्व या शुभ दिशांना करावे त्यामुळे चांगली फल प्राप्ती मिळते.
घराच्या आग्नेय दिशेला कोठेही पाण्याचे पिंप, हांडे अशा कोणत्याही गोष्टी ठेवु नयेत.
■आग्नेय दिशेमध्ये वॉटर स्टोरेज, अंडर ग्राउंड पाण्याची टाकी, बोअरिंग, विहिर येऊ देवु नये.
घरामध्ये उत्तम सुख समृद्धी, लक्ष्मी आगमन आणि आर्थिक भरभराट होण्यासाठी मुख्य दरवाजा समोर दोन हत्ती ठेवावेत.
■घरामध्ये सुख समृद्धी साठी घराच्या ईशान्य किंवा उत्तर दिशेला कासव ठेवावा.
■ देवघरामध्ये उदबत्ती, निरंजन, कापुर आग्नेय दिशेमध्ये लावावे.
■दुकान, फॅक्टरी, कार्यालय आदी ठिकाणी वर्षांतून एकदा तरी पूजा अवश्य करावी.
■स्वतःच्या मालकीचे कोणतेही वाहन( कार, ट्रक, टु - व्हिलर )मोठ्या प्रवासावरून आल्यावर गाडीच्या चाकांवरती गोमुत्र शिंपडावे आणि महिन्यातुन एकदा खडे मिठाच्या पाण्याने गाडी स्वच्छ करावी.
■ नवीन घर बांधताना टेरेसवर पाण्याची टाकी घराच्या नैऋत्य दिशेला उंचावरती ठेवावी आग्नेय - ईशान्येला ठेवु नये.
■टाॅयलेटची टाकी ईशान्य, मध्य - पुर्व, आग्नेय, ब्रम्ह्स्थळ आणि नैऋत्य दिशेमध्ये येऊ देवु नये.
■घराच्या टेरसवरती तुटलेल्या कुंड्या, जुने फ़र्निचर, बंद पडलेल्या सायकली अशा कोणत्याही नकारात्मक गोष्टी ठेवु नयेत.
■घराच्या आसपास बाभळीचे किंवा कोणतेही काटेरी वृक्ष नसावे.
■घराच्या आजुबाजुला चिक येणारे किंवा ज्या झाडाला दुध येते असे कोणतेही झाड लावु नये.
■कोणत्याही काटेरी वृक्षाची सावली घरावर पडू देवु नये.
■ नवीन घर विकत घेताना शक्यतो रोड जवळचे म्हणजेच रहदारीचे हायवे, भरपुर ट्रॉफिक असणारे रस्ते, मोठे रेल्वे स्टेशन यांच्या जवळचे घर विकत घेणे टाळावे त्यामुळे गोंगाट निर्माण होऊन मन शांती बिघडते धन स्थेर्यतेसाठी घरामध्ये होम हवन, सत्यनारायण पुजा, उदक पुजा, दान - धर्म, जप अशा गोष्टी नेहमी करत रहाव्यात.
■कंपनी, फार्म हाउस, शेती साठी जमिनी विकत घेताना उत्तर किंवा पुर्व दिशेला डोंगर किंवा उंच टेकडी असेल तर अशी जमीन विकत घेवु नये , डोंगर दक्षिण पश्चिमेला असेल तर ती जमीन शुभ असते.
■आर्थिक प्रगती चांगली होण्यसाठी घराच्या उत्तर दिशेला रेड, मरून असे कोणतेही डार्क रंग देवु नये व्हाईट, ऑफ व्हाईट, क्रीम असे रंग दयावेत. उत्तरेला जड कपाट, शो-केस, बेड, किचन अशा गोष्टी आल्यास आर्थिक प्रगती होत नाही त्यासाठी उत्तर दिशा हलकी, मोकळी आणि कोणतेही वजन नसणारी असावी.
■ ईशान्य दिशेमध्ये बाथरूम किंवा स्टोरेज ची खोली नसावी त्यामुळे आरोग्यहानी,धनहानी आणि सर्व प्रकारे नुकसान होते.
■ईशान्येच्या दोष निवारणासाठी सुंदर आकर्षक कारंजे ठेवावे किंवा पांढऱ्या संगमरवरी बाऊल मध्ये पाणी भरून ठेवावे यामुळे ईशान्य दिशेमध्ये
सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
■मुख्य दरवाजाच्या डाव्या किंवा उजव्या बाजुला बांबु - ट्री किंवा तुळस कुंडी मध्ये लावल्याने घरामध्ये सुख – समृद्धी व फायनानशियल प्रगती होते.
■ऑफिस किंवा दुकानामध्ये कायम स्वरूपी म्युझिक सिस्टीम बसवुन घ्यावे आणि रोज कामाच्या वेळे मध्ये एफ.एम चालु असावे यामुळे ऑफिस मधील कर्मचारी वर्गांना काम करण्यास उत्साह येतो व कामा वरती लक्ष केंद्रीत होते आणि त्यामुळे कंपनीची भरभराट होते.
■स्वयंपाक करताना किचन मध्ये म्युझिक सिस्टीम, एफ.एम सतत चालु ठेवावे यामुळे स्वयंपाक करताना चैतन्य दायी वातावरण निर्माण होऊन आपले अन्न पौष्टिक व सात्विक होते त्यामुळे आरोग्य उत्तम रहाते.
■सकाळच्या वेळेमध्ये गायत्री मंत्र, श्री सुक्त, पुरुष सुक्त, आरत्या यांची सी.डी घरामध्ये लावल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
घराची रचना करताना घरात आलेल्या व्यक्तीला देवघर, किचन, बेडरूम, तिजोरी न दिसेल अशा पद्धतीने घराची रचना करावी.
■प्लॉट च्या उत्तर किंवा पुर्व दिशेला डोंगर, इमारत किंवा कोणतेही उंच बांधकाम असेल तर असा प्लॉट विकत घेवु नये.
■घराचे मुख्य सेफ्टी डोअर लाकडाचे असावे असा वास्तु नियम असला तरी आपण घराला लोखंडी सेफ्टी डोअरच बसवावे, त्यामुळे परक्या व्यक्तीने दरवाजा उघडला तरी आवाज होऊन आपल्याला कळू शकते.
■देवघरामध्ये दोन शिवलिंग, दोन शंख किंवा एकाच देवांच्या दोन मुर्त्या ठेवुन त्यांचे पुजन करू नये.
■कुल दैवतांचे किंवा गुरूंचे नामस्मरण, जप किंवा पठन नित्यनियमाने १०८ वेळा केल्यास कार्यसिद्धी होते आणि आत्मबल, आत्मसामर्थ्य वाढते.
■घराच्या, ऑफिसच्या मुख्य दरवाजासमोर लिफ्ट, उतरता जिना किंवा डक्ट येत असेल तर असे घर किंवा ऑफिसऑफिस विकत घेणे टाळणे यामुळे शुभ उर्जेची हानी होते.
■सर्व कामांना सिद्धीस जाण्यासाठी इच्छापुर्ती होण्यासाठी आणि कोणत्याही संकटातुन मुक्ती होण्यासाठी गणपती अथर्वशीर्ष वाचावे आणि उपासना, नामस्मरण करावे.
■घरामध्ये रोज देवाची पुजा श्लोक पठण, दिवा - उदबत्ती, निरंजन, धुप - दीप लावणे अशा अध्यात्मिक गोष्टींचा नित्यनियमाने वापर केल्यामुळे घराला चांगले सुरक्षा कवच मिळते आणि आघातांची तीव्रता कमी होते.
■कोणतेही शुभ काम करताना, प्रवासाला निघताना दिवसाचा राहु काळ पाहणे आवश्यक आहे आठवड्याचे राहु काळ खालील प्रमाणे.
सोमवार – ७.३० am ते ९ .०० am
मंगळवार – ३.०० pm ते ४.३० pm
बुधवार – १२.०० pm ते १.३० pm
गुरुवार – १.३० pm ते ३.०० pm
शुक्रवार – १०.३० am ते १२.०० pm
शनिवार – ९.०० am ते १०.३० am
रविवार – ४.३० pm ते ६.०० pm
■घराच्या पश्चिम दिशेला टेरेस, खड्डा, खुप मोठा उतार किंवा खोल दरी असेल तर कलह, व्याधी, त्रास, मनस्ताप किंवा दिर्घ आजारपण येऊ शकते त्यामुळे पश्चिमेला कोणताही खड्डा ठेवु नये.
■जमिनीमध्ये अंडर ग्राउंड पाण्याची टाकी पुर्व, आग्नेय, दक्षिण, नैऋत्य आणि पश्चिम या दिशा मध्ये येऊ देवु नये.
🚩🚩॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्येत् ॥🚩🚩

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"