*श्रीयंत्र माहिती ( मराठी व हिंदी मध्ये )*
धनसंपत्ती प्राप्त करण्यासाठी श्रीयंत्र
वास्तु मध्ये श्रीयंत्राची महत्वपूर्ण माहिती
माझ्याकडे श्रीयंत्र उपलब्ध आहेत
संपर्क करावा
अति प्राचीन काळापासून आपल्या शास्त्रात दिव्य शक्ति व मौल्यवान वस्तु मनुष्याला प्राप्त करण्यासाठी मंत्र साधना,
यंत्र पुजा व रत्नाचा वापर करण्यास सांगितले आहे. माघील 8 जानेवारीच्या
लेखा तिजोरी धनसंपत्तीची वाढ होण्यासाठी तिजोरी अनेक वस्तु ठेवण्यास सांगितल्या आहेत .
आज आपण या श्रीमहालक्ष्मी प्रतिक श्रीयंत्र या बद्दल माहिती पाहू
श्रीयंत्र स्थापन करण्यासाठी मुहूर्त:-
दिपावली, पौणीमा, होळी, मकर संकाॅति, अक्षय्य तृतीय, वगैरे
हे उत्तम असे मुहूर्त आहे या सोबत
गुरुपुष्यामृत योग
या मुहूर्तावर आपल्या वास्तु मघ्ये श्रीयंत्र
स्थापना करावी
आज आपण यातील श्रीयंत्राची सखोल माहिती घेऊ. श्रीयंत्र म्हणजे साक्षात
श्रीमहालक्ष्मी चे स्वरूप आहे. जो मनुष्य
आपल्या श्रीवास्तु मधील देवघरात श्रीयंत्र ची स्थापना करतो त्याच्या श्रीवास्तु
मध्ये साक्षात श्री अष्टलक्ष्मी प्राप्त होते
यंत्र म्हणजे विशिष्ट ईश्वरी शक्तीचा आविष्कार प्राप्त करण्याचे साधन. धनसंपत्ती प्राप्त करण्यासाठी श्रीयंत्र, महालक्ष्मी, लक्ष्मीगणेश, श्रीसुक्त यंत्र तसेच दुष्ट शक्तींपासून संरक्षण होण्यासाठी महामृत्युंजय यंत्र, रामरक्षा यंत्र, दत्तात्रय यंत्र या यंत्रांची विधीवत पूजा केल्यास त्याचे निश्चित असे फळ मिळते. यंत्रामध्ये विशिष्ट प्रकारच्य रेषा,त्रिकोण,वर्तुळे,पुष्पदल,बीजाक्षरे,बीजमंत्रांच्या विविध रचना असतात. यंत्र घडविण्यासाठी लागणारे साहित्य, घडविण्याची पद्धत, वेळेचे पावित्र्य, शुद्धीकरण, प्राणप्रतिष्ठा आणि सिद्धिकरण या सर्व महत्वपूर्ण गोष्टी आहेत.
त्यामुळे बाजारातून किंवा तीर्थक्षेत्र स्थानातून यंत्र आणून देवघरात ठेवण्या अगोदर तज्ञांची मदत अथवा सल्ला घेणे आवश्यक आहे. यंत्राची शास्रोक्तरीत्या प्राणप्रतिष्ठा झाल्याशिवाय त्याच्या शक्तीचा पूर्ण आविष्कार प्राप्त होऊ शकत नाही. महत्वाची सूचना - यंत्राची रोज पूजा अर्चा करणे आवश्यक आहे कमीतकमी दिवा-अगरबत्ती ओवाळणे आवश्यक आहे.
वेळेची उपलब्धता व आवडीनूसार रोज यंत्राचे पूजनअर्चन,षोडषोपचार किंवा पंचोपचार पूजा,अभिषेक आराधना मंत्रोच्चारण,जप आराधना,बीज मंत्र उपासना,होम यज्ञात्मक उपासना अशा प्रकारे चढत्या क्रमाने आराधन पद्धती त्याअनुसरुन फलप्राप्ती यंत्राच्या माध्यमातून होत असते.
श्रीयंत्र हे त्रिपुराशक्तीचे प्रतीक आहे. भगवती, श्रीविद्या, त्रिपुरासुंदरीच्या साधनेमध्ये श्रीयंत्र हे एक अत्यंत प्रभावी उपयोगी यंत्र आहे. किंबहुना श्रीयंत्राशिवाय श्री लीलता महात्रिपुरासुंदरी देवतेच्या साधनेचे उत्तम फळ मिळू शकत नाही. ब्रह्माण्ड पुराणातील उल्लेखाप्रमाणे जिच्या गर्भामध्ये ३३ कोटी देवदेवताचा वास आहे अशा श्रीललिता महात्रिपुरासुंदरी देवीचे श्रीयंत्र हे निवासस्थान आहे. ती त्या निवासस्थानामध्ये महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती परब्रह्म, परविष्णू परशिवासहित निवास करते. म्हणूनच श्रीयंत्राची पूजा करणार्यास विश्वातील समस्त देवदेवतांची पूजा केल्याचे पुण्य लाभते व त्याला सर्व स्तरांवरील समृद्धी प्राप्त होते.
श्रीयंत्रात अत्यंत अद्भुत तर्हेने संपूर्ण ब्रह्माण्डाची संरचना करण्यात आली आहे. याकरिता विशिष्ट पद्धतीचा वापर करून अनेक भौमितिक रचना एकमेकांत गुंफण्यात आल्या आहेत. या यंत्रातील ९ चक्रे ही मनुष्य देहांतील, ९ आध्यात्मिक चक्रासमान आहेत. यामुळे अनेक साधनांचे पुण्य या एकाच श्रीयंत्र साधनेमुळे प्राप्त होते. श्रीयंत्राचे मनोहर रूप न्याहाळताना जाणवते की याच्या मधोमध एक बिंदू आहे आणि सर्वांत बाहेरच्या बाजूला भूपूर आहे. भूपुराच्या चारी बाजूंना चार द्वारे असतात., बिंदूपासून जर विचार केला तर तेथपासून भूपुरापर्यंत एकूण त्याचे दहा विभाग असतात ते अशाप्रकारे. १) केंद्रबिंदू (सर्वानंदमय चक्र), २) त्रिकोण (सर्वसिद्धिपद चक्र), ३) आठ त्रिकोण (सर्वरक्षक चक्र), ४) दहा त्रिकोण (सर्वरोगहर चक्र – अन्तर्दशार), ५) पुन: दहा त्रिकोण (सर्वार्थसाधक चक्र – बीहर्दशार), ६) चौदा त्रिकोण (सर्वसौभाग्यदायक चक्र – चतुर्दशार), ७) आठ पाकळ्यांचे कमळ (सर्वसंभोक्षण चक्र – अष्टदल, ८) सोळा पाकळ्यांचे कमळ (सर्वाशापरीपूरण चक्र – षोडशदल), ९) तीने वृत्ते (त्रैलोक्यमोहन चक्र), १०) तीन भूपूर (भूपूरचक्र).
श्रीयंत्रातील रचना एकानंतर एक अशा जोडलेल्या असतात त्यामुळे सहजच कोन व रेषा तयार होतात. चतुर्दशार कोनांची टोके बाहेरील अष्टदलाला जोडलेली असतात. अष्टदलांची टोके षोडसदलाबरोबर व षोडसदलाची टोके प्रथम वृत्ताला मिळालेली असतात. या कारणामुळे आणखी कितीतरी कोन तयार होतात ज्याला 'स्पंदीचक्र' असे म्हणतात. यामध्ये बिंदू अष्टदल, त्रिवृत्त आणि चतुरस्त्र यांना शिवाचा अंश मानतात आणि त्रिकोण, अष्टकोन, दोन दशकोन आणि चतुर्दशारला शक्तीचा अंश मानले आहे. बाहेरच्या बाजूला जे भूपूर आहे ते एक प्रकारचे तटकुंपण किंवा किल्ल्यासारखे दिसते. अशा प्रकारे श्रीयंत्राची रचना अतिशय मनोहर तरीही गहन आहे.
श्रीयंत्र प्रतिमेची पौराणिक कथा अशी – एकदा लक्ष्मी अप्रसन्न होऊन पृथ्वीवरून वैकुंठाला निघून गेली त्यामुळे पृथ्वीवर अनेक समस्या निर्माण झाल्या. वसिष्ठऋषींनी लक्ष्मी मातेला पृथ्वीवर आणण्याचा निश्चय करून ते वैकुंठाला पोहोचले पण त्यांचे प्रयत्न अयशस्वी झाले नंतर वसिष्ठमुनींनी तपश्चर्येला प्रारंभ केला व श्रीमहाविष्णूंना आवाहन केले. श्रीमहाविष्णू प्रकट झाले. श्रीविष्णूंनी वसिष्ठमुनींसह महालक्ष्मीच्या आलयामध्ये प्रवेश केला आणि त्यांनी तिची प्रार्थना केली; परंतु देवीने आपला तोच पृथ्वीवर न जाण्याचा आग्रह धरून ठेवला. वसिष्ठमुनी खिन्न मनाने पृथ्वीवर परतले. सगळ्यांच्या समोर त्यांनी एक गोष्ट प्रतिपादन केली ती म्हणजे आता श्रीयंत्र निर्मितीशिवाय मार्ग उरलेला नाही. त्याप्रमाणे त्यांनी आपल्या आश्रमामध्ये दीपावलीमधील धनत्रयोदशीला विधिपूर्वक श्रीयंत्र प्रतिमेची प्राणप्रतिष्ठा केली. या श्रीयंत्र प्रतिमेच्या निर्मितीचे ज्ञान आणि उपासनाक्रम मुख्य गुरू बृहस्पतींनी वसिष्ठ ऋषींना दिग्दर्शित केले. त्यांच्या निर्देशानुसार श्रीयंत्र प्रतिमा तयार झाली. प्रतिमेची शोडषोपचारे पूजन होताच श्रीलक्ष्मी आपल्या सर्व सिद्धीसह त्या श्रीयंत्र सिंहासनावर प्रकट झाली. तिने सर्वांना आशीर्वाद दिला व ती म्हणाली की आपण जो श्रीयंत्र प्रयोग केला त्याने मी प्रभावित झाले असून या श्रीयंत्रामध्ये मी अखंड वास करेन. ज्या साधकाच्या वास्तूमध्ये श्रीयंत्राची विधिवत स्थापना करण्यात येते त्या साधकाने व घरातील सर्वांनी श्रीयंत्राची समाराधना प्रेमपूर्वक भक्तियुक्त अंत:करणाने करावी. प्रात:काली स्नानादी कर्मे पार पाडून शूचिर्भूत होऊन श्रीयंत्रप्रतिमेसमोर नंदादीप लावून आसनस्थ व्हावे. न्यास, संकल्प ध्यानाचे श्लोक म्हणून श्रीयंत्राची पंचोपचारे पूजा करावी. पूजा पूर्ण झाल्यानंतर श्रीललितासहस्त्रनाम स्तोत्र पाठाने श्रीयंत्रप्रतिमेवर कुंकुमार्चन करावे. तद्नंतर बीजमंत्राचा जप करावा. जप पूर्णतेनंतर आरती व क्षमा प्रार्थना म्हणावी. सायंकाळीसुद्धा धूप-दीप प्रज्वलित करून प्रात: पूजेप्रमाणेच समाराधाना करावी.
श्रीयंत्रप्रतिमेला नित्य स्नानविधी अभिषेक नाहीत, फक्त शुद्ध जलाने पौर्णिमेच्या दिवशी शूचिर्भूततेने ललितासहस्रनाम स्तोत्र पाठाने त्या प्रतिमेला अभिषेक करावा व तद्नंतर पंचोपचारे पूजा करून ललितासहस्रनाम स्तोत्र पाठाने कुंकुमार्चना करावे. ज्या वास्तूमध्ये श्रीयंत्र स्थापना तसेच श्रीललितासहस्रनाम स्तोत्राचा पाठ वाचला जाऊन कुंकुमार्चना होते त्या वास्तूमध्ये श्रीललिता महात्रिपुरासुंदरी देवतेचा नित्य वास असतो हे पक्के धानात ठेवावे. श्रीयंत्र स्थापना आपल्याला व्यापारवृद्धी, ऋणमोचन, संतानलाभ, अतूट संपत्ती, दरिद्रता नाश, भौतिक सुखसंपदा आणि अद्भुत ऐश्वर्यासिद्धी प्रदान करते.
अत्यंत प्रभावी श्रीयंत्रामुळे घरात समृद्धी नांदते. सर्व प्रकारचे भय नाहीसे होते. विद्या, शक्ती, यश, मानसन्मान, ऐश्वर्य आणि सकलसमृद्धी प्राप्त होते. श्रीयंत्र म्हणजे सर्व संकटातून मुक्त होऊन यशाकडे जाण्याचा राजमार्ग आहे. अखंड पंचधातूमधील अनेक वजनांमधील श्रीयंत्रे उपलब्ध आहेत. प्रात: पूजेमध्ये व सायंकालीन पूजेमध्ये श्रीयंत्र प्रतिमेला कोणत्याही प्रकारचे अभिषेक करू नयेत. नित्य सहस्रनामाने कुंकुमार्चना हेच तिचे अभिषेक होय.
*हिन्दी भावार्थ:-*
श्री यंत्र देवी लक्ष्मी का यन्त्र होता है यह कष्टनाशक होने के कारण यह सिद्धिदायक और सौभाग्यदायक माना जाता है. लक्ष्मी कृपा हेतु श्रीयंत्र साधना के बारे में बताया जाता है. श्रीयंत्र की रचना पांच त्रिकोण के नीचे के भाग के ऊपर चार त्रिकोण के संयोजन से जिसमें 43 त्रिकोण द्वारा होती है. इन त्रिकोणों को दो कमल घेरे हुए होते हैं, पहला कमल अष्टदल का होता है और दूसरा बाहरी कमल षोडशदल का होता है.
इन दो कमलों के बाहर तीन वृत हैं इसके बाहर तीन चैरस होते हैं जिन्हें भूपुर कहते हैं. इस यंत्र को तांबे, चांदी या सोने पर बनाया जा सकता है श्रीयंत्र पूजा विधि शुक्रवार या प्रतिदिन की जा सकती है. श्रीयंत्र पूजा से पूर्व कुछ बातों को ध्यान में रखना आवश्यक होता है. इनकी पूजा में स्वच्छ्ता का पूरा ध्यान रखना चाहिए, प्राण-प्रतिष्ठित द्वारा श्रीयंत्र की ही पूजा कि जानी चाहिए.
लक्ष्मी का स्मरण कर सुख, सौभाग्य और समृद्धि की कामना की पूर्ति के लिए श्रीयंत्र पूजा की जाती है. श्री यंत्र की पूजा नवरात्रि में बहुत ही शुभ फलदायी मानी जाती है. व्यावसाय में सफलता, सुखी जीवन, आर्थिक मजबूती एवं पारिवारिक सुख-समृद्धि की वृद्धि होती है.
*श्री यंत्र पूजन विधि |*
प्रात: काला स्नान इत्यादि से निवृत्त होकर श्रीयंत्र पूजा की तैयारी करनी चाहिए. श्रीयंत्र को लाल कपड़े पर स्थापित करके इसे गंगाजल और दूध द्वारा पूजना चाहिए. श्री यंत्र को पूजा स्थान या व्यापारिक स्थान तथा अलमारी में शुद्ध स्थान पर रखा जा सकता है. श्रीयंत्र का पंचामृत, दुग्ध, दही, शहद, घी और गंगाजल से स्नान करा कराएं.
तत्पश्चात लाल चंदन, लाल फूल, अबीर, रोली, अक्षत से उसकी पूजा करें फिर श्री यंत्र पर लाल चुनरी चढ़ाएं तथा धूप, दीप से श्री यंत्र की आरती उताएं. लक्ष्मी मंत्र, श्रीसूक्त, दुर्गा सप्तशती का पाठ करें तथा बोग लगाएं. श्रद्धापूर्ण एवं भक्ति भाव द्वारा पूजा संपन्न करें और श्री यंत्र की स्थापना करें. स्थापना होने पर नियमित रुप से श्री यंत्र के समक्ष पूजा पाठ किया करें.
*श्री यंत्र मंत्र |*
श्रीयंत्र के समक्ष। श्रीं ह्रीं श्रीं नम:" एवं "ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्री ह्रीं श्री ॐ महालक्ष्म्यै नम:"मंत्रों का जाप करना चाहिए. श्रीयंत्र को श्रेष्ठ माना गया है इनकी अधिष्ठात्री देवी मां लक्ष्मी जी हैं. श्रीयंत्र को सभी यंत्रों में श्रेष्ठ स्थान प्राप्त है.
*श्रीयंत्र का महत्व |*
मंत्रों से सिद्ध श्रीयंत्र असीमित धन-संपत्ति प्रदान करता है. श्रीयंत्र लक्ष्मी को आकर्षित करने वाला शक्तिशाली यंत्र है. श्री यंत्र को दक्षिण भारत के विश्वप्रसिद्ध मंदिर तिरूपति बालाजी भी स्थापित किया गया है. श्रीयंत्र के माध्यम से आर्थिक स्थिति मजबूत होती है. पूजा पाठ एवं नियमित मंत्र साधना द्वारा श्रीयंत्र को क्रियाशील बनाया जा सकता है, श्रीयंत्र को ज्यादा शक्तिशाली बनाने के लिए नवरात्रों, शिवरात्रि, होली, दीवाली जैसे समय में मंत्रों द्वारा इसे अभिमंत्रित एवं उर्जावान बनाया जा सकता है.
महालक्ष्मी की कृपा प्राप्ति के लिए श्रीयंत्र की पूजा प्रभावशाली होती है. इस यंत्र की पूजा करने से समृद्धि एवं ऎश्वर्य की प्राप्ति होती है. श्रीयंत्र चांदी, सोना या तांबे पर बनवाना उत्तम होता है. इस यंत्र को भोजपत्र पर भी बनवा सकता है. शुभ मुहूर्त में यंत्र का निर्माण गुरू या रवि पुष्य योग या नवरात्र, दीपावली में किया जाए तो शुभ फलदायक होता है. श्रीयंत्र को घर, ऑफिस में बने पूजा स्थान पर रख सकते हैं तथा प्रतिदिन इसके सम्मुख धूप, दीप एवं मंत्र जाप करने से समृद्धि, वैभव, सौभाग्य की प्राप्ति होती.
श्रीयंत्र मेरू पंचधातूमधील विक्रीसाठी उपलब्ध आहे
श्रीयंत्र उपलब्ध हे 301/501/1100/2100/3100/4100/5100
7100/ रूपये आहेत आणि
श्रीयंत्र, श्रीकुबेर, श्रीलक्ष्मी संपूर्ण 11000/-
उपलब्ध आहे.
श्री कुबेर पुजा भंडार.
संपर्क:- 8733929646
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"