Very nice story...
एका गावात एक श्रीमंत कुटुंब राहत असते. नवरा बायको भरपूर दानधर्म करायचे. पण त्यांचा मुलगा देवधर्म काही करत नव्हता. लहान होता तेव्हा काही वाटले नाही.
पण जसा मोठा झाला तशी घरच्यांना चिंता पडली की पुढे याचे कसे होणार ? हा तर देवाचे काहीच करत नाही....
एकदा गावात एक साधू येतात, त्यांना हे कुटुंबिय विनंती करतात.
एकदा तरी त्याच्या मुखातून श्री गुरुदेव दत्त नाम येऊ द्या......!
साधू महाराज खूप वेळ विचार करून त्यांना म्हणतात मी सांगेल तेव्हा त्याला माझ्याकडे घेऊन या, मी त्याच्या कडून दत्त गुरूंचे नाव वदवून घेईल......!
ठरलेल्या दिवशी ते कुटुंबिय त्यांच्या मुलाला घेऊन साधू महाराजां कडे येतात.
तेव्हा साधू महाराज मुलाला प्रश्न विचारतात एकदा श्री गुरुदेव दत्त म्हंटले तर काय होईल.......?
मुलगा त्यांनाच उलट प्रश्न विचारतो....
एकदा श्री गुरुदेव दत्त म्हंटले तर काय होईल......?
मुलाच्या तोंडून दत्तगुरुंचे नाव आले, हे बघून घरच्यांना आनंद होतो आणी ते निघून जातात. कालांतराने वयोमानानी त्या मुलाचे निधन होते आणि तो यम धर्मापुढे उभा असतो.
तेव्हा तो यमाला म्हणतो. तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची असेल ती द्या, पण आधी माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या......
यम म्हणतो विचार काय प्रश्न आहे........
मुलगा :- एकदा श्री गुरुदेव दत्त म्हंटले कि काय होते..?
यम :- मला दत्त गुरुंबद्दल माहित आहे पण एकदा श्री गुरुदेव दत्त म्हंटले कि काय होते, हे मला नाही सांगता येणार यासाठी आपण ब्रह्म देवाकडे जाऊ तेच ह्या प्रश्नाचे उत्तर देतील.
मुलगा :- मी ब्रह्म देवाकडे येईल पण तुम्हाला माझ्या प्रश्नाचे उत्तर आले नाही, म्हणून तुम्ही मला पालखी मध्ये बसवून ब्रह्म देवाकडे घेऊन जायचे......
त्या पालखी चे भोई तुम्ही होणार.........
यमदेव तयार होतात. दोघे ब्रह्म देवाकडे जातात. ब्रह्म देवाला पण तोच प्रश्न विचारला जातो. ब्रह्म देवाला पण उत्तर माहित नसते. मग ते म्हणतात आपण भगवान विष्णू कडे जाऊ त्यांना हा प्रश्न विचारू. तेव्हा तो मुलगा म्हणतो.....
माझ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आले नाही, म्हणून तुम्ही पण पालखीचे भोई होणार.
ब्रह्म देव तयार होतात....
असे तिघे ते भगवान विष्णू कडे जातात. भगवान विष्णूं ना पण तोच प्रश्न विचारतात.
एकदा श्री गुरुदेव दत्त म्हंटले तर काय होते....?
विष्णू उत्तर देतात दत्त गुरुं बद्दल मला पण खूप माहिती आहे. पण एकदा गुरुदेव दत्त म्हंटले कि काय होते ते मला पण सांगता येणार नाही......
आपण भगवान शिवांकडे जाऊ त्यांना नक्की माहित असेल. आता पालखी चे दोन भोई झाले असतात.
मुलगा विष्णू ना म्हणतो तुम्हाला माझ्या प्रश्न चे उत्तर आले नाही, म्हणून आता तुम्ही पंखा घेऊन मला हवा घालणार.....
असे करत ते भगवान शिवा कडे पोचतात. भगवान शिवांना पण या प्रश्न चे उत्तर येते नाही, म्हणून ते म्हणतात आपण हा प्रश्न स्वतः गुरुदेव दत्तांनाच विचारू..... असे म्हणून सगळे दत्त गुरुं कडे येतात.
श्रीगुरुदेव दत्तां ना बघून मुलगा पालखीतून खाली उतरतो. अन् दत्त गुरुं ना प्रश्न विचारतो एकदा श्री गुरुदेव दत्त म्हंटले तर काय होते...?
तेव्हा गुरुदेव त्याच्या कडे बघून हसतात आणि सांगतात.......
एकदा श्रीगुरू देव दत्त म्हंटले कि काय होते....?
हा प्रश्न घेऊन तू आयुष्यभर बेचैन राहिलास आणि न कळत पणे किती तरी वेळा माझे नाव घेतले. त्याने काय होते हे तर तुला बघायचे असेल तर बघ......
तू नाम घेत राहिला म्हणून प्रत्यक्ष यम, ब्रह्मा - विष्णू आणि शिव हे तुला जन्म मरणाच्या फेऱ्यातून काढून माझ्या पायापाशी घेऊन आले, तू ह्या सगळ्यातून मुक्त झाला आता कायम माझ्या चरणा जवळ राहशील.......!!
हेच ते फळ एकदा श्री गुरुदेव दत्त म्हंटले कि मिळते.....!
!! ..... श्री गुरुदेव दत्त ..... !!
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"