Saturday, January 26, 2019

विष्णुसहस्त्रनाम आणि तुळशी अर्चनाचे महत्व

विष्णुसहस्त्रनाम आणि 
तुळशी अर्चनाचे महत्व
श्रीक्षेत्र करवीर येथे धर्मदत्त नावाचा सत्शील ब्राह्मण राहत हाेता. बालपणापासूूनच ताे विष्णुभक्त हाेता. माता पित्याच्या मृत्यूनंतर संसाराचा पाश मागे लावून न घेता त्याने ब्रह्मचारी राहून प्रभु सेवेचे व्रत घेतले. पंचगंगेवर त्रिकाल स्नान, संध्या करून ताे नामस्मरणात दंग असे. त्यासाठी त्याने िवष्णुसहस्त्रनामाचा अाश्रय घेतला. जागृत अवस्थेत त्याच्या मुखात सदैव िवष्णुसहस्त्रनाम असे. अगदी भिक्षा मागताना, इतकेच नव्हे तर रस्त्याने चालताना देखील ताे विष्णुसहस्त्रनामाचा घाेष करीत असे. विविध उपवनांमधून तुलसी मंजिरी जमा करून सायंकाळी विष्णुसहस्त्रनामासह श्री लक्ष्मीनारायणास सहस्त्र मंजिरी अर्पण करण्याचे त्याचे व्रत अखंड चालू हाेते. त्यासाठी ताे पंचगंगेवर सायं संध्या करून हाती पळी-पंचपात्र व गंगेत बुडवून स्वच्छ केलेल्या सहस्त्र तुलसी मंजिरी घेऊन अाेल्याने विष्णुसहस्त्रनामाचा घाेष करीत लक्ष्मीनारायण मंदिरात जात असे.
ताे ज्या मार्गाने मंदिराकडे जात असे त्या मार्गावर एक माेठा पुरातन अश्वत्थ वृक्ष हाेता. त्याच्या अाश्रयाने एक शापभ्रष्ट पिशाचिनी वास्तव्य करीत असे. ती लहान मुलांना त्रास देत असे. लाेक त्या मार्गाने जात नसत.  त्यामुळे ताे मार्ग निर्जन हाेता. सायंकाळी तर त्या मार्गाकडे काेणी फिरकतही नसे. तुलसी अर्चनाचा धर्मदत्ताचा हा क्रम वार्धक्यापर्यंत चालू हाेता. त्याच्या येण्याकडे ही पिशाचिनी डाेळे व कान लावून असे. कारण दृष्टिपथात अालेल्या धर्मदत्ताचे विष्णुसहस्त्र नाम कानावर पडल्याने तिला खूप बरे वाटे. हळूहळू तिची पिशाच्च वृक्ष पालटू लागली. अनेक वर्षे नामस्मरण श्रवण झाल्याने त्या पुण्याने तिच्या मुक्ततेची वेळ जवळ अाली अाणि एके दिवशी धर्मदत्त समाेरून येताना पाहूून तिने मनात निश्चय केला. ताे अश्वत्थाजवळ येताच तिने त्याच्या पायी लाेटांगण घातले व ती रडू लागली. तिच्या रडण्याने धर्मदत्ताला तिची दया अाली. त्ययाने तिला रडण्याचे कारण विचारले. तेव्हा तिने अापली अवस्था सांगून या पिशाच्च याेनीतून मुक्ती देण्याची विनंती केली. धर्मदत्ताने तिला सांगितले, की मी एक साामन्य ब्राह्मण अाहे. वेद, शास्त्र, पुराण मंत्र, तंत्र काहीही जाणत नाही. बालपणापासून केवळ स्नान संध्या, पूचाअर्चा व सायंकाळी  तुलसी अर्चन एवढेच करताे. 
मी तुझा उद्धार कसा करणार? यावर पिशाचिनीने त्याला सांगितले की तुझ्याजवळ विष्णुसहस्त्रनामाचे पुण्य अपार साचले अाहे. त्यात तुलसी अर्चनाच्या पुण्याची भर पडली अाहे. या सर्व पुण्याचे मला दान करून तुम्ही माझी मुक्तता करा. तुम्ही दानाचा संकल्प साेडताच माझी या पिशाच्च याेनीतून  मुक्तता हाेईल, असे सांगून तिने धर्मदत्ताचे पाय धरले व दीनपडे रडू लागली. तिच्या या ह्रदयद्रावक रडण्याने धर्मदत्ताला तिची दया अाली. त्याने विचार केला अापल्याकडूून जर तिचे दु:ख दूर हाेत असेल तर काय हरकत अाहे असा विचार करून त्याने हातात पाणी घेऊन त्याने अापले अाजवरच्या विष्णुसहस्त्र नामपाठाचे व सहस्त्र तुलसी अर्चनाचे पुण्य तिला अर्पण करीत असल्याचा संकल्प केला व त्या पाण्याचे तिच्यावर सिंचन केले. त्या बराेबर तिला दिव्यस्वरुप प्राप्त झाले. हा चमत्कार पाहून धर्मदत्त अाश्चर्यचकित झाला. पण दुसऱ्याचक्षणी त्याला अापली शक्ती नष्ट झाल्यासारखे वाटू लागले व त्याच्या मनात विचार अाला की, माझ्या अाजवरच्या अायुष्यातील सर्व पुण्य मी या पिशाचिनीला दिले व मी पुण्यहीन झालाे. वार्धक्यामुळे मी ही लवकरच मरणार; पण पुण्य क्षय झाल्यामुळे अापली अवस्था काय हाेईल? कुठल्या नीच याेनीत, कदाचित नरकातही अापली रवानगी हाेईल. या विचाराने ताे रडूू लागला. त्याला अाता खराेखरच अापण भिकारी झालाे असे वाटू लागले. त्याच्या मनात नैराश्यामुळे अात्मघाताचे विचार येऊ लागले. त्याची अशी अवस्था पाहून त्याचे अाराध्य दैवत भगवान विष्णुंना त्याची कणव अाली. 'न वासुदेव भक्तांनां अशुभं विद्यते क्वचित' या फलश्रुतीतील वचनाचा प्रयत्य अाणून देण्यासाठी महाविष्णु वृद्ध ब्राह्मणाच्या रुपाने तेथे अाले व धर्मदत्ताला त्यांनी रडण्याचे कारण विचारले. घडलेल्या सर्व घटनेचे वर्णन करताच ब्राह्मणरुपी विष्णू हसू लागले. धर्मदत्ताला त्यांच्या अनाठायी हसण्याचा राग अाला. ताे राेषाने म्हणाला, मी इथे दु:खाने रडताे अाहे अाणि तुम्ही माझ्या रडण्याला हसता अाहात! जणू माझी चेष्टा करता अाहात. त्यावर ब्राह्मणरुपी विष्णु म्हणाले, 'हसू नकाे तर काय करू? कारण तुम्ही नेमके उलटे करीत अाहात. तुम्हाला ज्या गाेष्टीने अानंद हाेण्याएेवजी तुम्ही रडत अाहात व दु:ख करीत अाहात'.
दिङमुढ हाेवून पाहत असलेल्या धर्मदत्ताकडे दयार्द्र दृष्टीने पाहत त्यांनी स्पष्टीकरण केले की, 'अहाे या पिशाचिनीला दान केल्याने तुमचे सर्व पुण्य नष्ट झाले, असे तुम्ही म्हणालात व त्यामुळे दु:खी हाेवून शाेक करीत अाहात हेच मुळी चुकीचे अाहे. या उलट या पिशाचिनीला दान केल्यामुळे तुमचे पुण्य शतपटींनी वाढले अाहे. ते किती वाढले ते मी भविष्यवेत्ता असल्याने मला समजले व अानंद झाल्याने मी हसू लागले. धर्मदत्ताला हायसे वाटले. त्याला अापले भविष्य जाणून घेण्याची उत्सूकता वाटू लागली. त्याने क्षमा मागूून ब्राह्मण रुपधारी विष्णुला नमस्कार केला व अापले भविष्य सांगण्याची विनंती केली. तेव्हा श्री विष्णु सांगू लागले की, या पिशाचिनीला तू पुण्यदान केल्याने तुझे व तिचे पुण्य एवढे वाढले अाहे की, पुढील जन्मात तुम्ही पती-पत्नी हाेवून प्रत्यक्ष महाविष्णु तुमच्या पाेटी पुत्ररुपाने अवतार घेतील. धर्मदत्ता तुझा पुढील जन्म अयाेध्येचा राजा अज व त्याची पत्नी इंदुमती यांचे पाेटी हाेवून तू दशरथ या नावाने ख्यात हाेशील. ही पिशाचिनी पुढील जन्मात काेशल राजाची कन्या काैसल्या हाेवून तुम्हा दाेघांचा विवाह हाेईल. तुमच्या पाेटी महाविष्णु राम हा सातवा अवतार घेतील. धर्मदत्ताच्या मनात शंका अाली ती त्याने बाेलून दाखविली की मी ब्राह्मण असता पुढील जन्मी मला क्षत्रियत्त्व कसे प्राप्त हाेईल. त्यावर हसून महाविष्णु म्हणाले की, तुलसी अर्चनासाठी सहस्त्र तुलसी जमा करताना तूू काही वेळा लघू शस्त्रांचा वापर केलास त्या पापाने तुझे ब्राह्मणत्व जाऊन तुला क्षत्रीयत्व प्राप्त हाेत अाहे. तसेच तू ब्रह्मचारी असल्याने तुला पूत्र प्रेमाचा अनुभव नाही. पुढील जन्मात श्रावणाच्या पित्याकडून पूूत्रप्रेम कसे असते तेही तुला माहिती हाेईल. ही पिशाचिनी तर मुक्त झालीच अाहे याेग्य काळी तिला जन्म प्राप्त हाेईल. तूही अायुष्याच्या अंतापर्यंत असेच विष्णुसहस्त्रनामस्मरण व विष्णुभक्ती करती रहा म्हणजे तुझे कल्याण हाेईल, असा अाशीर्वाद देवून महाविष्णु गुप्त झाले. विष्णुसहस्त्रनामाच्या पुण्याने प्रत्यक्ष भगवंताचे माता-पिता हाेण्याचे भाग्य लाभते असे अाहे विष्णुसहस्त्रनामाचे महात्म्य.

संग्राहक विजय दत्तात्रय सुवर्णकार

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"