*छत्रपती शिवरायांनी समर्थ रामदास स्वामींना सद्गुरु म्हणून शरण जाण्याबाबत संत तुकाराम महाराजांनी केलेला उपदेश*
राया छत्रपती ऐकावे वचन ।
रामदासी मन लावी वेगी ।।
रामदास स्वामी सोयरा सज्जन ।
त्यासी तनमन अर्पी बापा ।।
मारुति अवतार स्वामी प्रगटला ।
उपदेश केला तुजलागी ।।
रामनाम मंत्रतारक केवळ ।
झालासे शीतळ उमाकांत ।।
उफराटे नाम जपता वाल्मिक ।
झाला पुण्यश्लोक तात्कालिक ।।
तोचि बीजमंत्र वसिष्ठ उपदेश ।
याहुनी विशेष काय आहे ।।
आता धरु नको भलत्याचा संग ।
राम पांडुरंग कृपा करी ।।
धरु नको आशा आमुची कृपाळा ।
रामदासी डोळा लावी आता ।।
तुझी चाड आम्हा नाही छत्रपती ।
आम्हीं पत्रपती त्रैलोक्याचे ।।
चारी दिंशा आम्हा भिक्षेचा अधिकार ।
नेमिली भाकर भक्षावया ।।
पांडुरंगी झाली आमुची हे भेटी ।
हातात नरोटी दिली देवे ।।
आता पडु नको आमुचिये काजा ।
पवित्र तू राजा रामभक्त ।।
विठ्ठलाचे दास केवळ भिकारी ।
आम्हा कधी हरी उपेक्षीना ।।
शरण असावे रामदासालागी ।
नमन साष्टांगी घाली त्यासी ।।
तुका म्हणे राया तुज असो कल्याण ।
सद्गुरुशरण राहे बापा ।।
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"