भगवद् गीता:
"""""""""""""
जर का भगवद् गीतेचा अर्थ समजत नसेल किंवा लक्षात राहत नसेल तरीही आपण भगवद् गीता का वाचतो????
याबाबत एक गोष्ट तुम्हाला नक्कीच प्रेरणा देणारी ठरू शकेल..
एक वयोवृद्ध शेतकरी डोंगराळ प्रदेशातील शेतावर त्याच्या नातावासोबत राहत होता.
रोज पहाटे आजोबा लवकर उठून भगवद् गीता वाचत बसत. त्यांच्या नातवाची त्यांच्यासारखेच बनण्याची इच्छा होती आणि तो प्रत्येक गोष्टीचे अनुकरण करण्याचा शक्य तितका प्रयत्न करीत असे.
एके दिवशी नातवाने विचारले,
" आजोबा, मी तुमच्यासारखाच गीता वाचण्याचा प्रयत्न केला पण मला ती समजली नाही, आणि जे काही थोडेफार समजले ते पुस्तक बंद करताच विसरले जाते. भगवद् गीता वाचून काय फायदा होतो? "
आजोबा शेगडित कोळसे टाकण्या आधी थोडे थांबले आणि म्हणाले, "ही कोळशाची टोपली घेउन नदीवर जा आणि माझ्यासाठी टोपली भरून पाणी घेउन ये."
नातवाने सांगितल्या प्रमाणे केले पण घरी पोहोचण्या पुर्वीच सर्व पाणी गळून गेले. आजोबा हसले आणि म्हणाले," पुढच्या वेळी तू थोडी घाई कर "आणि पुन्हा एक प्रयत्न करण्या साठी त्याला टोपली घेउन नदीवर पाठविले. या वेळी तो मुलगा जोरात पळत आला पण तरीही घरी पोहोचण्यापुर्वी टोपली रिकामी झाली होती. धापा टाकत त्याने आजोबाना सांगितले की टोपलीतून पाणी आणणे अशक्य आहे आणि तो बादली घेण्यासाठी गेला.
आजोबा म्हणाले," मला बादली मध्ये पाणी नको आहे; मला टोपली मध्येच पाणी हवे आहे. तू पुरेसे प्रयत्न करत नाहीस," आणि तो नातू पुन्हा कसा प्रयत्न करतो हे पाहण्या साठी घराबाहेर आला.
या वेळी, त्या मुलाला ही गोष्ट अशक्य आहे हे माहित असुनही त्याला आजोबाना दाखवून द्यायचे होते की तो कितीही जोरात धावत आला तरीही घरी पोहोचण्यापूर्वी पाणी गळून जाइल.
त्या मुलाने पुन्हा एकदा टोपली पाण्यात बुडविली आणि जोरात धावत आला. परंतु आजोबापर्यंत पोहोचण्यापूर्वी टोपली रिकामी होती. धापा टाकत तो म्हणाला," बघा आजोबा, हे निष्फळ आहे"
आजोबा म्हणाले," तर तुला हे निष्फळ वाटते मग जरा टोपली कडे बघ"
मुलाने टोपली कडे बघितले आणि पहिल्यांदाच त्याला टोपली वेगळी दिसत असल्याचे लक्षात आले. ती कोळशाने काळी झालेली टोपली आता आतून बाहेरून स्वछ झाली होती.
"मुला, तू जेव्हा भगवत् गीता वाचतो तेव्हा असच घडते. तू प्रत्येक गोष्ट समजू शकणार नाही किंवा लक्षात ठेवू शकणार नाही, पण जेव्हा तू गीता वाचशील तेव्हा तू देखिल अंतर्बाह्य बदलून जाशील.
आपल्या आयुष्यात इश्वराचे हेच तर वैशिष्ट आहे."
🙏🙏
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"