☆ वास्तुदोष निवारणार्थ दिक्प्रणाम ☆
ज्यांच्या घरी वास्तुदोष प्रकर्षाने जाणवतो त्यांनी नित्य आह्निक करताना खालीलप्रमाणे दिक्प्रणाम केला असता वास्तुदोषाचे परिणाम तितक्या तीव्रतेने जाणवत नाहीत असा अनुभव आहे.
पूर्वादी आठ व ऊर्ध्व-अधर अशा एकूण दहा दिशांना त्या-त्या दिशेच्या अनुषंगाने दिशापतींची नियुक्ती केलेली आहे. दिशा व त्यांचे स्वामी पुढीलप्रमाणे आहेत.
१) पूर्व - इंद्र, २) आग्नेय - अग्नी, ३) दक्षिण - यम, ४) नैऋत्य - निर्ऋती, ५) पश्चिम - वरूण, ६) वायव्य - वायु , ७) उत्तर - सोम, ८) ईशान्य - ईशान, ९) ऊर्ध्व - ब्रह्मा, १०) अधर - अनंत.
हे दिशापती दाही दिशांनी आपल्या वास्तुचे रक्षण करत असतात. दिशापती प्रसन्न असतील तर वास्तु प्रसन्न राहते. त्यामुळे त्यांचे स्मरण ठेवणे हे गृहपतीचे आद्यकर्तव्य ठरते. किंबहुना दररोज त्यांचे नमस्कारपूर्वक स्मरण करणे आवश्यक आहे. म्हणूनच नित्य संध्येत दिक्प्रणामाचा समावेश केलेला आहे.
दिक्प्रणाम पुढीलप्रमाणे करावयाचा असतो -
१) पूर्वेस - ॐ सुराधिपाय विद्महे ।। वज्रहस्ताय धीमहि ।। तन्नो इंद्रः प्रचोदयात्।। प्राच्यै दिशे इंद्राय च नमः।
२) आग्नेयेस - ॐ जातवेदाय विद्महे ।। सप्तहस्ताय धीमहि ।। तन्नो अग्निः प्रचोदयात् ।। आग्नेय्यै दिशे आग्नये च नमः ।
३) दक्षिणेस - ॐ पितृराजाय विद्महे ।। दंडहस्ताय धीमहि ।। तन्नो यमः प्रचोदयात् ।। दक्षिणायै दिशे यमाय च नमः ।
४) नैऋत्येस - ॐ रक्षोधिपाय विद्महे ।। खड्गहस्ताय धीमहि ।। तन्नो निर्ऋतिः प्रचोदयात् ।। नैर्ऋत्यै दिशे नैर्ऋतये च नमः।
५) पश्चिमेस - ॐ जलाधिपाय विद्महे ।। पाशहस्ताय धीमहि ।। तन्नो वरूणः प्रचोदयात् ।। प्रतीच्यै दिशे वरूणाय च नमः।
६) वायव्येस - ॐ प्राणाधिपाय विद्महे ।। महाबलाय धीमहि ।। तन्नो वायुः प्रचोदयात् ।। वायव्यै दिशे वायवे च नमः ।
७) उत्तरेस - ॐ नक्षत्रेशाय विद्महे ।। अमृतांगाय धीमहि ।। तन्नो सोमः प्रचोदयात् ।। उदीच्यै दिशे सोमाय च नमः ।
८) ईशान्य - ॐ तत्पुरूषाय विद्महे ।। महादेवाय धीमहि ।। तन्नो रूद्रः प्रचोदयात् ।। ईशान्यै दिशे ईश्वराय च नमः ।
९) ऊर्ध्व (वरती) - ॐ लोकाधिपाय विद्महे ।। चतुर्वक्त्राय धीमहि ।। तन्नो ब्रह्म प्रचोदयात् ।। ऊर्ध्वायै दिशे ब्रह्मणे च नमः ।
१०) अधर (खाली) - ॐ नागराजाय विद्महे ।। सहस्त्राक्षाय धीमहि ।। तन्नो नागः प्रचोदयात् ।। अधरायै दिशे अनंताय च नमः ।।
स्त्रोत :- "शास्त्र असे सांगते!" या ग्रंथातून उद्धृत!
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"