Saturday, January 26, 2019

दत्त गुरू बद्दल थोडक्यात माहिती

दत्ताच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी आणि चार श्वान म्हणजे चार वेद.औदुंबराचा वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे. कारण
त्यात दत्त तत्त्व जास्त प्रमाणात असते....

दत्त गुरूंनी पृथ्वीला गुरु केले आणि पृथ्वी प्रमाणे सहनशील आणि सहिष्णु असावे अशी शिकवण घेतली. तसेच अग्नीला गुरु करून, हा देह क्षणभंगूर आहे, अशी शिकवण अग्नीच्या ज्वाले पासून घेतली.

अशाप्रकारे चराचरांतील प्रत्येक वस्तू मध्ये ईश्वराचे अस्तित्व पहाण्यासाठी म्हणून दत्त गुरूंनी चोवीस गुरु केले.....

`श्रीपाद श्रीवल्लभ' हा दत्ताचा पहिला अवतार आणि `श्री नृसिंह सरस्वती' हा दुसरा अवतार होय. तसेच `माणिकप्रभु' तिसरे आणि 
`श्री स्वामी समर्थ महाराज' हे चौथे अवतार होत.

हे चार पूर्ण अवतार असून अंशात्मक अवतार अनेक आहेत....
जैनपंथीय दत्त गुरूंकडे `नेमिनाथ' म्हणून पहातात आणि मुसलमान `फकिराच्या वेशात' पहातात. दत्त दररोज खूप भ्रमण करीत.

ते स्नाना साठी वाराणसीला, चंदनाची उटी लावायला प्रयागला जात, तर दुपारची भिक्षा कोल्हापूरला मागत आणि दुपारचे जेवण पांचाळेश्वर, बीड जिल्हा येथे गोदावरीच्या पात्रात घेत असत....

तांबुल भक्षणासाठी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात राक्षस भुवन येथे जात, तर प्रवचन आणि कीर्तन ऐकण्या साठी नैमिष्यारण्यात बिहार येथे पोहोचत.

निद्रेसाठी मात्र माहूरगडावर जात आणि योग गिरनार येथे करीत.....
दत्त पूजेसाठी सगुण मूर्ती ऐवजी पादुका आणि औदुंबरवृक्ष यांची पूजा करतात. 

पूर्वी मूर्ती बहुदा एकमुखी असायची. हल्ली त्रिमुखी मूर्ती जास्त प्रचलीत आहे...

दत्त हा `गुरुदेव' आहे. दत्तात्रेयांना परमगुरु मानले आहे. त्यांची उपासना गुरु स्वरूपातच करावयाची असते.

`श्री गुरुदेव दत्त'श्री गुरुदत्त' असा त्यांचा जयघोष करतात.

"दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा" 

ही नाम धून आहे... दत्तात्रेयाच्या खांद्याला एक झोळी असते. तिचा भावार्थ याप्रमाणे आहे - झोळी हे मधु मक्षिकेचे (मधमाशीचे) प्रतीक आहे. मधमाशा जशा ठिक ठिकाणी जाऊन मध गोळा करतात आणि तो एकत्र जमवितात, 

तसे दत्त दारोदारी फिरून झोळी मध्ये भिक्षा जमवतो. दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहं लवकर कमी होतो. म्हणून झोळी ही अहं नष्ट झाल्याचेही प्रतीक आहे....

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"