Saturday, January 26, 2019

राशीभविष्य

'राशीभविष्य' हा एक बिनबुडाचा,अशा-स्त्रीय,आणि दिशाभूल करणारा विषय असूनही प्रतिष्ठित वृत्तपत्रे,दूरदर्शन वाहिन्या वर्त
मान पत्राचा खप किंवा वाहिन्यांचा टी.आर.पी.वाढविण्यासाठी बेमालुमपणे प्रसिध्दी देत आहेत.एकेका राशीचे कोट्यावधी लोक,त्यांचे वेगवेगळे व्यवसाय वेगवेगळे स्वभाव,कोणी संकटा
ला संधी मानतो तर कोणी संधीला संकट,त्यांची वाईट-मध्यम किंवा उत्तम आर्थिक स्थिती,कोणी दुर्धर व्याधी पीडित तर कोणी जगत्जेता धावपटू असे असताना भविष्याच्या चार ओळी छापून लोकांच्या भावनांशी खेळण्यात काय अर्थ आहे!
वर्तमानपत्राचे तेच अर्धे पान किंवा चॅनलचा तोच वेळ एखाद्या शास्त्रज्ञाला, संताला,विचारवंताला दिला तर केवढे समाज प्रबो
धन होईल! पण बुध्दीवादी संपादक,चॅनेल हेड सुध्दा 'राशीभवि
ष्याच्या' कुबड्या हातात घेऊन तत्वांना गलिच्छ मुरड घालतात.
'राशीभविष्य' लिहीणा-यांना तर अभ्यासू ज्योतिषी म्हणताच
येणार नाही.ठोक॔ठोक कशी करावी यात ते महातरबेज.ज्या
भोंगळ लिहीण्याने वाचकांना काहीही मार्गदर्शन होणार नाही
उलट वैचारिक गोंधळच निर्माण होईल ते खरडणे किती लज्जा
स्पद! मूळ कुंडलीचे बलाबल,सुरू असणारी महादशा, अंतर्दशा
जन्मकालीन लग्न कशाचीही माहिती नसताना मनाला वाटेल ते
खरडणे ही फसवाफसवीच असते.ज्योतिषी हा सल्ले देणारा वकील नसावा,रस्ता दाखविणारा मार्गदर्शक असावा.गुरू शुभ भ्रमणाने आला म्हणून तुमचे सर्व चांगले होईल हे भविष्य वर्तविणारा ज्योतिषी वाचकांना निष्क्रीय बनवतो.असे सांगीतले
पाहिजे की हा काळ प्रयत्नांना यश देणारा असल्याने प्रयत्नात
कसूर ठेवू नका.विद्यार्थ्याला पाचवा शनि आला म्हणजे "यश मिळणे अवघड आहे" असे सांगून त्याचे पंख कापू नयेत तर 
"आता यश मिळवण्यासाठी जरा जास्तच प्रयत्न करावे" ह्या
सल्ल्याने यथोचित मार्गदर्शन होईल.स्वतःच्या अपु-या ज्ञानाच्या अहंकारापेक्षा किंवा मोठेपणा मिरवण्याच्या हौशीपेक्षा मार्गदर्शनाला आलेल्या व्यक्तीचा आत्मविश्वास वाढविणे,त्याला उमेद देणे,विधायक उपाय सुचविणे,अपाय आहे तेथे उपायही आहे ही ग्वाही देणे हे ज्योतिष्याचे कर्तव्य आहे.*राशीभविष्य* सांगण्यासाठी किंवा लिहीण्यासाठी आलेल्या सर्व विनंत्या मी नाकारल्या आहेत.गम्मत किंवा 
टाईमपास म्हणूनही हे बिनबुडाचे राशीभविष्य वाचू नये.
मित्रमैत्रिणिंनो कृपया आपापल्या ग्रुप्सवर शेअर करा.🙏
                           *श र द   उ पा ध्ये.*

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"